विश्वकरंडक मायबोली विशेषांक घोषणा

Submitted by विकवि_संपादक on 12 April, 2011 - 13:36

जगभरात पसरलेल्या मायबोलीकर बंधूभगिनींना नमस्कार! जगाच्या कुठल्या तरी एका कानाकोपर्‍यात आपण वावरत असतो आणि आपल्या देशाची विजयगाथा जेंव्हा आपण ऐकत असतो-बघत असतो-लोकांना सांगत असतो- तेंव्हा ऊर कसं अगदी आनंदानं भरभरुन डोळ्यांवाटे सांडायला लागतं. माझ्या भारताने, माझ्या देशाने, माझ्या मायभूमीने, माझ्या बांधवांनी, माझ्या देशातील क्रीडापटूंनी सन २०११ चा विश्वकरंडक अंतिम क्रिकेट सामना जिंकला तो क्षण कुणी मित्रांच्या भल्या मोठ्या समूहात वाजत-गाजत साजरा केला असेल तर कुणी दूरवर परदेशी गेलेल्या भारतीयांनी अगदी एकट्यानेच आपल्या फुलून आलेल्या हृदयात वाजणार्‍या स्पंदनांसोबत साजरा केला असेल! 'मायबोली'च्या विश्वात रमलेल्या मायबोलीकरांसाठी हा विजयाचा क्षण भर्रकन येऊन जरी गेला तरी कुठल्या ना कुठल्या तरी 'बाफ'वर तो आपले ठसे सोडून गेला आहे. वेगवेगळ्या 'बाफ'ची ती पाने मागे उलटून पाहिली की कळतं खूप काही मनमोकळेपणांन व्यक्त करायचं होतं, खूप खोलवर काहीतरी लिहायचं होतं, अनेक विषयांवर बोलायचं होतं, थोड भूतकाळातं शिरुन डुंबायचं होतं तर थोडं वर्तमानकाळासोबत गायचं होतं. मित्रहो, तुमच्या ह्या भावनाचं तर आम्हाला ह्या उपक्रमापर्यंत घेऊन आल्या आहेत. काळ अगदीचं खूप मागे पडून निसटून नाही गेला. तो अजून आपल्याच सोबत, आपल्याच निशी, आपलाच हात धरुन चालला आहे. आता कुठेच न भरकटता १ मे २०११ ची आपण वाट पाहू कारण याच दिवशी म्हणजे आपल्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपण 'विश्वकरंडक मायबोली विशेषांक' चे स्वागत करु. ह्या विशेषांकाची माहिती अशी आहे:

संपादक मंडळ - १) दोस्ती २) मास्तुरे ३) लालू ४) प्रज्ञा९ ५)वैद्यबुवा ६) बी

विशेषांकाचे विषय:

१) चाळ आणखीनच वाजते
चाळीत क्रिकेट खेळताना कुणाच्या खिडकीची काच फुटली, तर कुणाच्या टीव्हीची काच तडकली, तर कुणाचा चष्मा फुटला, तर कुणाचा माठ, कुणाच्या घरातला आरसा - असे नुकसान व्हायचे. मग त्या त्या घरातील स्त्रियांचा आरडाओरडा, चेंडू न देणे, असे प्रकार व्हायचे. हे सर्व प्रकार रंगवून सांगणारा विनोदी लेख इथे अपेक्षित आहे.

२) मी सामना पाहताना पाळलेल्या (अंध) श्रध्दा
तुम्ही बघितले असेल कोहली आउट झाला तरी खाली नव्हता पहात ! अंधश्रद्धा.. दुसरे काय हो?.. सचिन म्हणे प्रथम डाव्या पायातच पॅड घालतो. आमिर खानने सेमि-फायनल आणि फायनला सेम टी-शर्ट घातला. परत तेच हो. अंधश्रद्धा..!! आमच्या घरी बायकोला वाटतं ती बेडरुममधे असली तर विरोधी गटाची विकेट जाते मग ती दिवाणखान्यात मॅच पहायला येतच नाही. बहिणीला लाल सलवार लकी वाटतो. मग मॅच असली की ती लालच सलवार घालते. सुशिक्षित जरी असलो तरी क्रिकेटबद्दल प्रत्येकाच्या काही श्रद्धा तर काही अंधश्रद्धा आहेतच असे दिसते.

३) भावभावनांचा कोलाज
२८ वर्षानंतर भारतानी विश्वकरंडक सामना जिंकला. अशा वेळी तुम्हाला काय वाटतं हे १ ते ५ ओळीत लिहा.

४) विश्वकरंडकाचे सेलेब्रेशन
भारत जिंकणार अशी अपेक्षा खूप जण ठेवून होते. जेव्हा असे खरचं झाले तेव्हा लोकांनी विविध प्रकारे घरी-दारी, मित्रांमधे एकत्र जमून हा सोहळा साजरा केला. त्या सोहळ्याचे चित्र, सचित्र चित्रण या विषयामधे अपेक्षित आहे.

५) विश्वकरंडक चित्रातून
या विषयामधे आपण चित्रातून विश्वकरंडकाचा भूत-भविष्य-वर्तमान काळ दाखवू. क्रिकेट सुरु झाल्यापासूनचे जुने फोटो, त्यातून भूतकाळाचे दाखवलेले वेगवेगळे संदर्भ क्रिकेटचा भूतकाळ दर्शवेल. सन २०११ च्या विश्वकरंडकाचे फोटो आणि त्यावरची वेगवेगळी कॅप्शन वर्तमानकाळ दर्शवेल. तर आगामी सामने जसे की आता लवकरचं IPL येत आहे किंवा भारतात क्रिकेटचे भवितव्य ह्यावर कुणाला चित्र काढता येत असेल तर ते चित्र भविष्यकाळ दर्शवतील. हे सर्व चित्र कसदार कॅप्शनसहीत असणार आहे. त्यावर फार मोठे परिच्छेद लिहायची गरज नाही. जे काही सांगायचे आहे हे चित्रातून उतरवायला हवे. इथे चित्र म्हणजे फक्त हाताने काढलेलं चित्र नाही. जुनी गोळा केलेली प्रताधिकार मुक्त चित्रंही चालतील.

६) विश्वकरंडकातील अविस्मणीय सामना
या विषयामधे लेखकाला विश्वकरंडक सामन्यातील जो सामना अविस्मरणीय वाटला त्या सामन्याचे यथार्थ चित्रण अपेक्षित आहे. सामना हा २०११ मधीलच असायला हवा असे बंधन नाही.

७) असा घडला हा खेळाडू
या विषयामधे एखादा क्रिकेटपटू कसा घडला, त्याने केलेले विक्रम, त्याची जिद्द, मेहनत ही सर्व माहिती अपेक्षित आहे.

८) माझे आवडते स्टेडिअम
या विषयामधे त्या त्या स्टेडिअमचा इतिहास आणि तिथे झालेल्या सामन्यांबद्दल माहिती अपेक्षित आहे.

तुलनात्मक
९) ८३ च्या चषकामध्ये खेळलेले खेळाडू आणि चषक जिंकण्याची कारणं Vs २०११ मधले खेळाडू आणि जिंकण्याची कारणं.

१०) मागच्या १० वर्षात झालेले क्रिकेट खेळायच्या पद्दतींमधले बदल. पध्दती म्हणजे फक्त नियम असं नाही पण एकंदरीत खेळाडूंच्या बदललेल्या अ‍ॅटिट्युड्स आणि त्याचा स्कोअर्स, अंतिम निकालावर होणारा परिणाम.

मते-मतांतरे
११) UDRS चा वापर योग्य की नाही.

१२) ट२० फॉर्मॅट बॅटस्मन धार्जिणा आहे का?

अबब!!! केवढे तरी विषय ना! अजून एक विषय राहीलाचं की! तो विषय आहे तुमच्या आवडीचा. उत्स्फूर्तपणे तुम्हाला क्रिकेट ह्या विषयावर काही लिहायचं झालं तर अवश्य लिहा.

हे सर्व साहित्य तुम्ही worldcup2011@maayboli.com ह्या ईंमेल वर २५ एप्रिल, रात्री १२ पर्यंत (US PST) आमच्याकडे पाठवा. तुमचे साहित्य पोचल्यानंतर आम्ही तुम्हाला पोचपावती पाठवून साहित्य पोचले म्हणून कळवू. ह्या व्यतिरिक्त तुमचा कुठलाही प्रश्न असेल तर इथे याच बाफवर लिहा.
तुमच्या लिखाणासाठी तुम्हाला भरघोस शुभेच्छा.

धन्यवाद!
---- संपादक मंडळ (विश्वकरंडक मायबोली विशेषांक)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दे घुमाके !
मी पण मी माझी श्रद्धा ( अंधश्रद्धा) लिहिन Proud
विकवि_संपादक >>> मला आधी विकले संपादक अस वाचल्याचा भास झाला. Lol

आनंदानी ( ने) भरभरुन डोळ्यावाटें ( अनुस्वार इथे नकोय ) सांडायला लागतं. माझ्या भारतानी( ने) , माझ्या देशानी( ने) माझ्या मायभुमीने, ( भूमीने ) माझ्या बांधवांनी, माझ्या देशातील क्रिडापटूंनी ( क्रीडा ) सन २०११ चा विश्वकरंडक क्रिकेट सामना जिंकला तो क्षण कुणी मित्रांच्या भल्या मोठ्या समुहात ( समूहात ) वाजत-गाजत साजरा केला असेल तर कुणी दुरवर ( दूरवर ) परदेशी गेलेल्या भारतीयानी अगदी एकट्यानीचं ( एकट्यानेच ) आपल्या फुलून आलेल्या हृदयात वाजणार्‍या ( हृदयातल्या स्पंदनांसोबत - हे जास्त बरोबर ) स्पदंनांसोबत साजरा केला असेल!

परत एकदा सुद्दलेकण तपासणार का ?

संपादकांचे अभिनंदन. अंकासाठी शुभेच्छा. अंकाच्या प्रतिक्षेत.

अंकाला शुभेच्छा! Happy
शुद्धलेखनाबाबत शोनूला अनुमोदन. ते बघा जरा.

अंकासाठी खूप शुभेच्छा! वाचायला मजा येईल!!

पण खरंच शुद्धलेखन बघा! वाचायला फार विचित्र वाटतयं(अर्र)..
बाकी या वाक्याचा अर्थ काय? "तुम्ही बघितले असेल कोहली आउट झाला तरी खाली नव्हता फायनल ! " ? मला खरंच नाही कळलं! Sad

शुद्धलेखनाबाबत सहमत.

>>>तो अजून आपल्याचं सोबत आपल्याचं निशी आपलाचं हात धरुन चालला आहे. >>> कळलं नाही.

विश्वचषक विषेशांकात विश्वचषकेतर विषयांची भरताड का?
१२ मधले फक्त ५ च विषय विश्वचषकाशी डायरेक्ट संबंधित आहेत बाकीचे जनरल क्रिकेटविषयी आहेत... तरीही हा विश्वचषक विषेशांक का?

अंकासाठी शुभेच्छा!!!!
१९८४ मध्ये ऑस्ट्रेलियात गावस्करच्या नेतॄत्वाखाली भारताने मिनी वर्ल्ड कप जिंकला होता, त्यात सुद्धा काही सामने अविस्मरणीय झाले होते, त्यावरचे लेख चालू शकतील का अंकात?

Bumrang: विश्वचषकाशी संबंधीत तुम्हाला जर एखादा चांगला विषय सुचत असेल तर त्यावर तुम्ही लिहू शकता. वरील सर्व विषय हे फक्त आम्ही सुचवलेले विषय आहेत. विश्वचषकाशी संबंधीत विषय तुम्ही निवडू शकता. धन्यवाद.

वत्सला: पुर्वप्रकाशित साहित्य नका पाठवू. काहीतरी नवीन लिहिण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.

आशुतोष०७११: हो तुम्ही म्हणता त्या विषयावरचा लेख चालेल. धन्यवाद.

श्री, ऋयाम: तुम्ही लिहित असलेल्या साहित्याची आम्ही आतुरतेनी वाट बघत आहोत. धन्यवाद.

- संपादक मंडळ

,,,,

मायबोलीकरांनो, साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख आता अगदी जवळ आली आहे. माहिती आहे ना २५ एप्रिल पर्यंत साहित्य पाठवायचे आहे? त्वरा करा.. साहित्य लिहायला अद्याप घेतले नसेल तर लवकर लिहायला लागा. आमच्यातर्फे लिखाणाला शुभेच्छा.

विवेक, नाही चालणार. एकतर तुम्ही थेट कॉपी पेष्ट करुन पाठवा अथवा वर्ड मधे पाठवा.

मंडळी, त्वरा करा .. त्वरा करा!

.. ..जिव्हाळ्याच्या विषयाबद्दल लिहिण्यास प्रोत्साहन देण्यासाठी संपादक मंडळाचे हार्दिक अभिनंदन
Happy

मंडळी, साहित्य पाठविण्याची अंतिम तारीख दोन दिवस आणखी वाढवली आहे. साहित्य २८ एप्रिल पर्यंत रात्री १२ पर्यंत पाठवले तरी ते स्विकारण्यात येईल. धन्यवाद.

विकवि संपादक