मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा, मुंबई २०११ नावनोंदणी

Submitted by kanchankarai on 12 April, 2011 - 01:51

नमस्कार,

२०११ सालातील एक ब्लॉगर्स मेळावा दादर, मुंबई येथे ५ जून २०११ रोजी सायंकाळी ५:३० ते रात्रौ ८:३० या वेळात आयोजित करण्याचे ठरवले आहे. मेळाव्याच्या संयोजक आहेत ब्लॉगर सौ. कांचन कराई व आयोजक असतील ब्लॉगर श्री. महेंद्र कुलकर्णी, श्री. सुहास झेले व श्री. विशाल रणदिवे.

या मेळाव्यासाठी प्रत्येक सहभागी सदस्याकडून वर्गणी रू १००/- रोख अपेक्षित आहे. ही वर्गणी मेळाव्याच्या दिवशीच आयोजकांकडे जमा करता येईल. मेळाव्याची रूपरेषा, स्थळ व वेळ यांचा समन्व्य साधता यावा म्हणून जास्तीत जास्त ७५ सदस्यांनाच नावनोंदणी करू देण्याचे बंधन आयोजकांवर आहे. ज्यांना खरोखरीच मेळाव्याला येण्याची इच्छा आहे व शक्य आहे, अशा इच्छुक ब्लॉगर्स/वाचकांनी कृपया http://marathibloggersmeet.blogspot.com/2011/04/mbm-mumbai-2011-registration.html या लिंकवर जाऊन संपूर्ण पोस्ट वाचावी व फॉर्म भरावा.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.