'skeptic' चा योग्य मराठी प्रतीशब्द

Submitted by स्पॉक on 10 April, 2011 - 01:17

माझ्याकडे एक इंग्लीश टु मराठी डिक्शनरी आहे त्यानुसार -
स्केप्टिक - या शब्दाचा मराठी अर्थ, नास्तिक्यवादी, संशयखोर किंवा धर्माविषयी संशय घेणारा असा होतो.
आणि हे तिन अर्थ पुर्णपने बरोबर नसावेत असे वाटते.
मला आणि माझ्या एका मित्राला असे वाटते की स्केप्टिक साठी मराठीत अचुक पर्यायी शब्द असावा.
याबद्दल कुणाला काही माहिती आहे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार अभिजीत
भाषा ग्रूप बघीतलात तर तिथे बर्‍याच चर्चा वाचायला मिळतील. इथे सगळ्या ग्रूप्सची यादी आहे. पुढच्यावेळी धागा काढतांना कृपया विषयाशी संबंधित ग्रूपमध्ये काढा त्यामुळे त्याचे योग्य वर्गीकरण होते व भविष्यात ही चर्चा इतरांना सापडायला सोपे जाते.
धन्यवाद
-मदत समिती

career या शब्दाला योग्य प्रतिशब्द काय आहे मराठीत?
कारकीर्द हा शब्द राजे, राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्या कार्याला शोभून दिसतो,
कर्तबगारी हा शब्द फारशी वगैरे मधून आला आहे का?
career शब्दात, निवडलेल्या कर्तव्यात, अनेक वर्षे चांगले काम करून अधिकाधिक यश मिळवले, हा अर्थ मला अभिप्रेत आहे.