ईंग्रजी मराठीची सरमिसळ

Submitted by हर्ट on 9 April, 2011 - 09:14

मी जेंव्हा फ्रान्सला गेलो होतो तेंव्हा एक फ्रेंच सहकारी मला म्हणाला टेबलाच्या कप्प्यातून तू मला वही काढून देतोस का? हे तो असे म्हणाला: please draw that notebook for me. मला तो काय म्हणत आहे हे लगेचं लक्षात आले. कारण ईंग्रजी भाषा तोडकीमोडकी बोलताना मीही draw म्हणजे काढणे मग ते चित्र काढणे, एखादी वस्तू कप्प्यातून काढणे या अर्थी घ्यायचो. हे सर्व शाळेत असताना.

माझे काही मित्र माझ्याशी मराठीतून बोलताना, ईंग्रजीतून आपण जसे बोलतो तसे मराठी बोलतात. म्हणजे बघा:
१) मला भिती वाटते मी आज येऊ शकणार नाही. हे म्हणजे चक्क: I am afraid I cannot come/cannot make it today ह्या ईंग्रजी वाक्याचे सरळसरळ केलेले भाषांतर आहे.
२) माझे चुक असल्यास तू मला बरोबर कर. Please correct me if i am wrong. हेही ईंग्रजी वाक्याचे सरळसरळ भाषांतर आहे.
३)हल्ली माझे तुला आगावू आभार वा मी तुला आधीच धन्यवाद देतो - असेही वाक्य कानी पडतात आणि वाचायला मिळतात. हे मला thanks in advance चे भाषांतर वाटते.

हे कितपत योग्य आहे? तुम्ही जर असे काही वाक्य ऐकले असतील तर इथे लिहा. त्यातून कदाचित आपल्याला आपली भाषा कशी वळण घेते आहे हे कळेल आणि आपली चुक होत आहे हे उमजून योग्य मराठी आपण परत एकदा लिहू/बोलू. धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) वही हवी असेल तरी - "मला ते पुस्तक दे" (book)
२) तू माझी मदत करशील का? - "मला" मदत करशील का?" हे बरोबर!

असे बरेच लोक भेटतात सध्या... लिहीन अजून आठवलं की!

त्या त्या भाषेचं स्वतःचं म्हणून सौंदर्य असतं...

शिंच्या चा अनुवाद कसा करणार ?

संभाषणाची सुरूवात करताना आयला नावाचा भारदस्त शब्द वापरला जातो. इंग्रजीत त्याचा अनुवाद केला तर ? इंग्रजी बोलताना लोकांना याचं नेमकं भान असतं, पण मराठी तोडकंमोडकं बोलणं हे प्रतिष्ठेचं लक्षण समजल जातं

मला खुप दिवसांपासून पडलेला प्रश्न आहे.
माझ नाव अभिजित आहे आणि मी ते इंग्लीश मधे लिहीताना - abhijit असेच लिहितो - आणि इंग्लीश उच्चार पण - अभिजित असाच करतो. माझ नाव कुणि इंग्लीश माणसाने - abhijita - असे लिहिलेले मला चालेल का? आणि जरी तसे लिहीले तरी त्याचा उच्चार करताना - तो अभिजित असाच करायला मी सांगेन - अभिजिता असा नाही.
पण मी अनेक ठिकाणी बघितले आहे - विशेषतः दाक्षिणात्य लोकांमधे - ते राम, लक्ष्मण आणि तत्सम शब्द असे लिहितात - Rama , Lakshamana - आणि त्याचा उच्चार - रामा, लक्ष्मणा असा करतात - हे कितपत बरोबर आहे?
आपण जर त्यांच्या भाषेचे नियम संभाळुन उच्चार करतो - जसे आपन to ला टो असे न म्हणता टु असेच म्हणतो, मग त्यालोकांनी पण आपल्या भाषेचे नियम पाळायल नको का?