मैत्र जिवांचे : पहिल्या सर्वसाधारण सभेची घोषणा

Submitted by विशाल कुलकर्णी on 6 April, 2011 - 03:51

प्रिय मायबोलीकर,

यापूर्वीच श्री. हबा यांनी कल्पना दिल्याप्रमाणे "मैत्र जिवांचे" या आपल्या संस्थेच्या नोंदणीचे काम पुर्ण झाले आहे. कार्यकारी मंडळ सात जणांचे असून मायबोलीवरील दोन सन्मानणीय सदस्याना स्विकृत सदस्य म्हणून घेण्याविषयी बोलणी सुरू आहेत. दि. ०३/०५/२०११ ला सातारा धर्मादाय कार्यालयातून नोंदणी क्रमांक आपल्या हाती मिळेल. परंतू, उपाध्यक्षांशी व इतरांशी झालेल्या चर्चेनुसार त्याआधी आपली कामाची योजना तयार करणे सोयीचे होईल जेणेकरून नोंदणीचे पत्र मिळताच शुभारंभाच्या कार्यक्रमापासूनच कामाची सुरूवात करता येईल.

आपल्या सर्वांच्या उपस्थीती व मदतीशिवाय या संस्थेस लोकसेवा करण्याचे सामर्थ्य मिळणे केवळ अशक्य आहे. हे बीज आपल्याच परिवारातल्या काही सदस्यांनी पेरले आहे त्याची जोपासना करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य मानुन कृपया पहिल्या सर्वसाधारण सभेला अगत्य येणेचे करावे ही कळकळीची विनंती आहे.

पहिली सर्वसाधारण सभा :

समीतीवरील सर्वानुमते १० एप्रिल २०११, रवीवार हा दिवस संस्थेच्या पहील्या सर्वसाधारण सभेसाठी स्विकृत करण्यात आला आहे. स्थळ सद्ध्यातरी मुंबई अथवा नवी मुंबई एवढेच ठरले आहे. सभेला येवु इच्छिणार्‍यांची संख्या पक्की झाल्यावर त्यानुसार सर्वांना सोयीचे ठरणारे असे मध्यवर्ती ठिकाण व वेळ निवडून, दोन दिवसात कळवले जाईल.

या सभेत संस्थेची कार्यपध्दती, नियमावली, कार्यकारी मंडळ, कार्यक्षेत्र, कामांचे स्वरूप, विभागवार प्रतिनीधींची नियुक्ती, आर्थिक नियोजन व निधी संकलनाचे अवाहन, वार्षिक व आजीव सदस्य नोंदणी इ. गोष्टी स्पष्ट करण्यात येतील.

या पहिल्या सर्वसाधारण सभेतच संस्थेची वाटचाल निश्चीत होईल. या सभेला मायबोलीचा सदस्य असणारा कोणीही उपस्थीत राहू शकतो. काम करण्याची, तन, बुध्दी, धन आणि मनाने मायबोलीकरांच्या या प्रयत्नाला समर्थ करण्याची ज्यांची इच्छा आहे त्या प्रत्येकाने उपस्थीत रहावे ही विनंती आहे.

सभेस येण्याची व काम करण्याची, मदत करण्याची इच्छा असणार्‍या मायबोलीकरांनी आपली इच्छा maitrajivanche.ngo@gmail.com येथे कळविल्यानंतर सभेचे नेमके स्थळ आणि वेळ ठरवता येइल. प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

मायबोलीकर मित्रहो,

आत्तापर्यंत सभेसाठी उपस्थित राहण्याची तयारी दाखवलेल्या माबोकरांची संख्या सात झालेली आहे.

हणमंत शिंदे (हबा)
डॉ. कैलास गायकवाड
विशाल कुलकर्णी
प्रसाद गोडबोले (पंत)
राजेश सावंत (मानव)
मुग्धानंद
कोमल कुंभार (ठमादेवी)

यापैकी कोमल आणि मुग्धानंद यांचे कन्फर्मेशन उद्या संध्याकाळपर्यंत हातात येइल. यानुसार ही पहिली सर्वसाधारण सभा नवी मुंबईच्या परिसरात घ्यायचे ठरले आहे. सर्व इच्छुकांना नम्र विनंती की त्यांनी रवीवार दि. १० एप्रील रोजी, सकाळी १०.३० ते ११.०० वाजेपर्यंत नेरुळ स्टेशनच्या बाहेर एकत्र व्हावे. संख्या कमी असल्याने त्याच वेळी सर्वानुमते एखाद्या नजीकच्या हॉटेलमध्ये किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी (उद्यान वगैरे) जमून चर्चा करावी असा मानस आहे. वर दिलेल्या नावाव्यतिरिक्त आणखी कुणाला यायची इच्छा असल्यास कृपया मला दुरध्वनि करून कल्पना द्यावी ही विनंती.

आपला,

विशाल कुलकर्णी
सचिव, मैत्र जिवांचे सामाजिक संस्था. मायबोली.
भ्रमणध्वनि : ०९९६७६६४९१९

गुलमोहर: 

मुग्धानंद, कृपया आपला ईमेल व फ़ोन नंबर वर दिलेल्या इमेल पत्त्यावर कळवा. आपल्याला महिती पोचवली जाईल.
आभार !!

शुभेच्छा. Happy

"मैत्र जिवांचे सामाजिक संस्था. मायबोली." हे संस्थेचे अधिकृत नाव आहे का? "मायबोली" म्हणजे मायबोली या कंपनीचा यात कितपत सहभाग असणार आहे?

मानव तुम्हाला आधीच मेल केलीय. चेक करुन रिप्लाय द्या.

गजानन. "मैत्र जिवांचे सामाजिक संस्था" हे नाव आहे. मायबोलीकरांची संस्था म्हणुन मायबोली. आणि याला मायबोलीच्या अ‍ॅडमिनचा आक्षेप नाहीये बहुदा. धन्यवाद !!

"मायबोली" म्हणजे मायबोली या कंपनीचा यात कितपत सहभाग असणार आहे?
>>> विशालने स्पष्टीकरण दिलेच आहे. तरीही, मुद्दाम मी हे लिहीतो आहे.

'मायबोली' या कंपनी चा 'मैत्र जिवांचे' या सामाजिक संस्थेशी कसलाही कायदेशीर किंवा अधिकृत संबंध नाही व नसेल. परंतू, मायबोलीच्या श्री. अजय गल्लेवाले व श्री समीर यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मैत्र जिवांचे या मायबोलिच्या सदस्य असलेल्या काही लोकांनी मिळून सुरू केलेल्या संस्थेला आपल्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी, विविध माहितीपर लेख टाकण्यासाठी, लोकसंग्रहासाठी व इतर योग्य त्या कारणांसाठी मायबोलीचा पाठिंबा राहील.

मायबोलीसारखे मोठे व्यासपीठ मैत्र जिवांचे या संस्थेला उपलब्ध करून दिल्याबद्दल मी अजयजी, समीरजी व इतरांचा आभारी आहे!!!