आजच्या पाडव्याच्या सुमुहुर्तावर एका नवीन लेखमालिकेची सुरवात करायचा विचार करतोय.
माझ्या पहिल्या काहि लेखांपैकी एक होता, फ़लेषु सर्वदा. त्यावेळी पहिल्यांदाच भारताबाहेर पडलो होतो. अनेक अनोखी फळे चाखली, आणि त्यावेळी भारतात ती मिळतही नसत.
पण त्यानंतर पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले. अगदी एक्झॉटिक म्हणावीत, अशी फळेही भारतात मिळू लागली आहेत. आणि अर्थातच ती अपरिचित राहिली नाहीत.
पण तरिही, फळे हा आपल्या नेहमीच्या खाण्यातला महत्वाचा भाग झाला नाही. खरे तर फळे म्हणजे निसर्गाने प्रक्रिया करुन दिलेले अन्नच आहे. बहुतांशी फळांवर आणखी काही प्रक्रिया करावी लागत नाही. सोलली / कापली आणि खाल्ली. त्यातली पोषक तत्वेही तशी उपयुक्त.
तसा इतर भाज्यांच्या बाबतीत एक आक्षेप घेतला जातो, कि त्या खाऊन आपण हत्या करतो, तसे फळांच्या बाबतीत नाही. आपण ती खावीत, म्हणूनच झाडावर ती निर्माण होतात. ती खाउन, बियांचा प्रसार केला जावा, हि झाडाची अपेक्षा.
बिया तयार होईपर्यंत, बहुतांशी फळे रंगाने हिरवी व चवीला आंबट, तुरट असतात. पण बिया तयार झाली कि गर मधुर तर होतोच, शिवाय फळाचा रंग आकर्षक होऊन गंधाद्वारे त्याची जाहिरातही केली जाते.
तर अशा फळांवर एक लेखमालिका करायचा विचार आहे. हि फळे अगदी दुर्मिळ वा महाग अशीच न निवडता सर्वांना परिचित अशीच निवडायची आहेत.
अशा फळांवर नेटवर माहिती नाही असे नाही, पण त्यात भारतीय संदर्भ फ़ारच कमी आहेत. त्यासाठी मायबोलीवर संकलन व्हावे अशी इच्छा आहे.
हे अर्थातच माझ्या एकट्याच्या आवाक्याबाहेरचे काम आहे. बेसिक माहिती देण्याचा मी प्रयत्न करीनच, पण त्या अनुषंगाने प्रकाशचित्रे, जास्तीची माहीती, लागवडीसंबंधी माहिती, साहित्यातले उल्लेख, औषधी उपयोग, त्या फळापासून केले जाणारे पदार्थ व त्यांच्या कृति.
यासाठी मला सगळ्यांकडून मदत हवी आहे. हि पूरक माहिती, प्रतिक्रियांच्या रुपात न येता,
मूळ लेखातच त्याची भर पडावी अशी, इच्छा आहे.
यासंबधी काही सूचना असल्यास अवश्य़ कराव्यात. हे लेखन माझ्या नावे न राहता, एका वेगळ्या आयडीच्या नावे असावे. व चार पाच स्वयंसेवकांना त्याचा पासवर्ड देण्यात यावा, म्हणजे कुणालाही संपादन करता येईल, असाही एक विचार होता. तो कितपत व्यवहार्य आहे, तेही सांगा.
प्रायोगिक तत्वावर पहिला भाग पूर्ण केलाय
१ ) भाग १ - श्रीफळ (नारळ ) http://www.maayboli.com/node/24816
२) भाग २ - आंबा http://www.maayboli.com/node/25156
शुभेच्छा, उपयुक्त मालिका
शुभेच्छा, उपयुक्त मालिका ठरावी अशी!
-'बेफिकीर'!
अरे वा....येउद्या..!
अरे वा....येउद्या..!
माझ्याही 'शुभेच्छा'.
मस्त मालिका. लेखांची वाट
मस्त मालिका. लेखांची वाट पहातेय.:)
हो खरच, ही एक छान मालिका
हो खरच, ही एक छान मालिका होईल, मी पण लेखांची वाट पहात आहे.
लेखांची वाट पहात आहे
लेखांची वाट पहात आहे
छान, उपयुक्त अशी मालिका.
छान, उपयुक्त अशी मालिका. लेखांची वाट पहातेय
छान मुहुर्त निवडला दिनेशदा
छान मुहुर्त निवडला दिनेशदा
माझ्याकडुनही जी मदत होईल ती मी नक्कीच करणार
अरे सहीच! >> इतर भाज्यांच्या
अरे सहीच!
>> इतर भाज्यांच्या बाबतीत एक आक्षेप घेतला जातो, कि त्या खाऊन आपण हत्या करतो
काहिही... खरच असं मानतात का लोकं? मग सीडलेस फळांबद्दल काय मत आहे
अरे वा.. सुंदर कल्पना..
अरे वा.. सुंदर कल्पना..
मस्तच कल्पना दिनेशदा. >>हि
मस्तच कल्पना दिनेशदा.
>>हि पूरक माहिती, प्रतिक्रियांच्या रुपात न येता, मूळ लेखातच त्याची भर पडावी अशी, इच्छा आहे.
ह्यालाही अनुमोदन. वाचणं सोपं जाईल.
दिनेशजी मी पण यात हातभार
दिनेशजी मी पण यात हातभार लावेन..
दिनेशदा, ही उपयुक्त मालिका
दिनेशदा,
ही उपयुक्त मालिका लवकरात लवकर सुरु व्हावी,होईलच अशी खात्री वाटते ,त्यासाठी शुभेच्छा !
यासाठी माझ्याकडुन होण्यासारखी काही किरकोळ कामे/अपेक्षा (खारीचा वाटा) असतील नक्की (आदेश द्या) सांगा !
मदत तर सर्वांचीच हवी आहे.
मदत तर सर्वांचीच हवी आहे. काहीही सूचववेसे वाटले तर अवश्य कळवा.
श्रीफळाने सुरवात केलीय खरी. पण माझ्या कल्पनेपेक्षा जास्तच मोठा झालाय तो लेख. पुढचे लेख तेवढे लांबणार नाहीत म्हणा.
सुंदर कल्पना
सुंदर कल्पना
मस्त कल्पना ..दिनेश दादा.
मस्त कल्पना ..दिनेश दादा. शुभेच्छा.. :स्मितः
मला यासाठी पूरक माहिती, फोटो,
मला यासाठी पूरक माहिती, फोटो, अनुभव पाठवत रहा सगळ्यांनी.