मी नाही अभ्यास केला

Submitted by प्रभा on 3 April, 2011 - 09:26

आमची नात सीया (वय-६) हिच्या कल्पनेतून साकारलेले----
:घड्याळात वाजला एक--; यावर आधारित----

मी नाही अभ्यास केला
---------------------
घड्याळात वाजला वन,
डोक्यावर आला सन,
उन्हाचा खूप कन्टाळा आला
मी नाही अभ्यास केला
घड्याळात वाजले टू
हरवला माझा शू,
शोधण्यात त्याला एक तास गेला
मी नाही-------
घड्याळात वाजले थ्री,
आजी होती फ्री--
गोश्ट ऐकण्यात एक तास गेला
मी नाही-------
घड्याळात वाजले फोर,
बागेत नाचला मोर,
नाच पहाण्यात एक तास गेला
मी नाही------
घड्याळात वाजले फाइव्ह,
टी व्ही वर क्रिकेट्ची म्याच लाइव्ह,
म्याच बघ्ण्यात एक तास गेला
मी नाही-------
घड्याळात वाजले सीक्स,
ही तर खेळ्ण्याची वेळ फिक्स,
खेळ्ण्यात माझा एक तास गेला
मी नाही------
घड्याळात वाजले सेव्हन,
आईने बनवल जेवण,
खाण्यात माझा एक तास गेला
मी नाही------
घड्याळात वाजले एट,
जेवण झाल भरपेट
आळसात लोळण्यात एक तास गेला
मी नाही--------
घड्याळात वाजले नाइन,
आकाशात बघितल- तर मून्-शाइन,
चान्दण बघण्यात एक तास गेला
मी नाही -----
डोळे मिटले--, वाजले टेन,
आईने उचलले बूक नि पेन,
स्वप्न पहाण्यात सरली रात
नवीन वर्शाची झाली सुरवात,
गुढी तोरण लाऊ या
स्वागत त्याचे करू या
वेल्-कम, वेल्-कम
सुस्वागतम--- सुस्वागतम
------------------------
-------------------------

गुलमोहर: 

छान Happy

खुप सुंदर अभिनवं रुप...आजच्या पिढीला परफेक्ट भावणारं. मझ्या लेकीची एकदम आवडती कविता. हे नवं रुप तिला नक्किच भावेल.
खुप खुप धन्यवाद!