बीजिंग ची खाऊ गल्ली

Submitted by वर्षू. on 1 April, 2011 - 06:21

साधारण खाऊ गल्ली म्हटलं कि डोळ्यासमोर चाट,भेळपुरी,दोसे,मिसळ,भाजीपाव,आईसक्रीम,दहीभल्ले,बटाटेवड्यांचे दाटीवाटीने एकमेकांना खेटून असलेले स्टॉल्स येतात नं.. तसलेच स्टॉल्स बीजिंग च्या खाऊ गल्लीत आहे फकस्त पदार्थ वेग्गळे अगदी!!!

हे स्टीम होत असलेले क्रॅब्स

साते च्या काड्यांना लावलेली विविध फळे

काही ठिकाणी या फळांना साखरेच्या कडक पाकात बुडवून विकत होते

अ‍ॅनीबडी ?? फॉर भाजलेले विंचू आणी स्टार फिश??

मोठे विंचू नसतील आवडत..तर छोटेही आहेत मेन्यु वर Happy

स्क्विड्स, अँट ग्रब्स.. ऊप्स!!!

क्रॅब्स रेडी झालेत.. छान स्टीम निघतीय आता

अजून पण काही..बाही

आह्हा.. फायनली.. समथिंग फॉर वेजीज.. अ‍ॅपिटाईट उरलं असल्यास Wink

छोटे मोठे स्क्विड्स्,साप्(सोलून)

ही अतिशय टेस्टी गजक.. खमंग दाणे,तीळ ,गूळ घालून केलेली..

खाऊन झालं असेल तर या गिचिमिची ,अरूंद गल्ल्यांमधल्या या गच्च भरलेल्या सोविनिअर्स च्या दुकानांतून
काहीबाही विकत घ्या

हीच ती गल्ली.. लोकल लोकांनी, टूरिस्ट्स नी सदैव भरलेली

गुलमोहर: 

आई गं... जे ऐकलं होतं... ते तुझ्या कृपेने पहायलाही मिळालं वर्षू... डोळ्यांचे पारणे फिटले... एका वेगळ्या अर्थाने Lol

आडोच्या झब्बूनेतर मळमळायला झालंय... ट्रूली अ‍ॅपॅटायझिंग Wink Uhoh

वर्षू, फोटोंना छानही म्हणवत नाहीये.

ट्रॅव्हल चॅनलवर बिझार फूड्स न चुकता बघत असते म्हणून या फोटोंचं विशेष अप्रूप वाटलं नाही अजिबातच. वरचे फोटो कमी असल्यास हा व्हिडिओ पहा(च)

http://www.travelchannel.com/TV_Shows/Bizarre_Foods/Video/Making_King_Co...

Happy धन्स.. सर्वांना..
सायो,'फोटोंना छानही म्हणवत नाहीये.' अगा..बिझार फूड्स पाहतेस ना.. तो ये किस झाड की पत्ती??
Lol
मंदार, तुझा चीन चा विजा कँसल.. Happy

अरे वर्षूचा जरा विचार करा. तूम्हाला फोटो बघवत नाहीत, आणि त्या दोघांना त्या बाजारात फिरुन फिरुन खाण्याजोगे पदार्थ, शोधावे लागले असतील.

अरे गाववाल्यानू... आपल्याकडे पण ह्यातले काही पदार्थ खात असतील. फक्त ते कुठे आणि कसे खातात ते आपल्याला तरी माहिती नाहीये... कुणीतरी देईलच पुढेमागे माहिती....

देवा रे....कोंबडी, बोकड, मासे असे सामान्य मांसाहारी म्हणजे त्यांच्यासाठी पोराटोरांचे खाणे असेल...
आपल्याकडे कसा मटणाची सागुती खाणारा अंड्याच्या आम्लेटकडे तुच्छतेने बघतो तसे काही तरी असणार...
बाकी ते फोटो आणि ते सापाचे रक्त वगैरे प्रकार यकदम यक्स...
ढवळून आले पोटात...
मी कोल्हापूरला गेलो तेव्हा रक्तीमुंडी ताट प्रकार पहायचे धाडस केले होते..श्या...लोक चवीसाठी म्हणून काय वाट्टेल ते खातात...

Happy
आशुचँप्..अगदी अगदी!!!
आम्ही सुरुवातीला चीन ला गेलो तेंव्हा अभिमानाने सांगायचो..आम्ही सर्व खातो म्हणून त्यात बीफ,पोर्क म्हणजे तर (आम्हाला!!) कळसच वाटायचा.. एकदा असच फॅक्टरी वाल्याने आग्रहाने डिनर ला नेले ,आणी आम्ही सर्व खातो हे (आमच्याच तोंडून .. ) ऐकल्यावर त्याने क्वाय क्वाय मागवले..बापरे.. कासवाचे सूप, पिग ब्लड पासून तयार केलेली जेली सदृष्य डेझर्ट, रोस्टेड स्वान्,कबुतरं आणी त्यांची अंडी..इ.इ. आणी इकडे होस्ट ने ऑफर केलेली वस्तू नाही खाल्ली तर त्यांचा घोर अपमान होतो.. त्या दिवसापासून आम्ही कान पकडले आणी कुणी होस्ट नी विचारलं तर दोन तीन नॉर्मल स्पेशीज ची नावं सांगू लागलो.

वर्षू, ऑडो म्या चक्कर यीऊन पडलो. Proud

ऑडोच्या तिसर्‍या फोटोतले भेंडोळे कशाचे आहे तेही विचाराय्चे धाडस होत नाही. Lol

चा-मारी हे चिंकण काय्बी खातात Sad फळं सोडुन बाकी सगळॅ फोटु डेंजर वाटले.

नशीब माणसाच मास नाही सापडला या खाऊ गल्लीत Wink तेव्हढच राहिलेलं

ह्या गल्लीत गेलेय मी.
रोजच्या रोज मासे मटण खाणारीला(मी) पण एकदम कसे तरी वाटलेले ते साप, कुत्र्यांची डोकी, त्यांची कलेजी वगैरे पाहून( एका स्टॉलवर हे सगळे होते).
माझ्या चायनीज कलीगने नाकतोडा का काय घेतलेले खायला व फिरत फिरत तो एखादा बर्फी खाल्ल्या सारखे खात होता.

वर्षू, सगळं खातो हे सांगण्याला अनुमोदन.

मला वाटायचे मी सगळे खाते(मासे, मटण(पोर्क, लँप्,गोट वगैरे), चिकन, टर्की... त्यामुळे मी जेव्हा चायनात गेले तेव्हा सगळे खाते सांगितले तर मला चायनीज कलीगने जेव्हा जेवायचे आमंत्रण दिले तेव्हा मला काय मिळाले खायला,

बेडकाच्या स्टॉकमध्ये सापाचे मांस टाकून सूप,
बदकाचे तळलेले पाय भजीसारखे व ग्रिल केलेले अक्ख बदक,
अर्धा अधिक पिग सालीसकट ग्रिल केलेला,
पिगच्या रक्ताची जेलो,
मग मून केक.(हेच एक खाण्यासारखे होते)
कारण हे लोक पिग पण खूप विचित्र पद्दधतीने शिजवतात, खूप वास येत होता.
एरवी मी पिग वगैरे खाते इथे अमेरीकेत पण चायनात एक वेगळाच वास येतो.(सॉरी, पण जे वाटले ते लिहितेय)

मी पिग वगैरे खाते इथे अमेरीकेत >>> ध्वनी, नक्की कुठे रहातेस ते ठरव बरं Wink
वर्षू, विषयांतराबद्दल क्षमस्व.

सायो, ठरवायचे काय त्यात. कामासाठी फिरावे लागते. तुमच्यासारखे नाहि एकाच ठिकाणी फतकल मारून. Wink
बरं, सिंगापूरहून येवून एक महिना होइल, आता सीटीत आहे हार्टफोर्डात. येतेस का भेटायला?

आत्ताच हे झुरळं, साप, खेकडे, विंचू वगैरे प्राणी बायकोला दाखवले. आता तीच मला चीनला जाऊ देणार नाही Proud

अग फतकल मारलेलं बरं असतं नाहीतर ना घर का ना घाट का प्रकार.
तूच ये की इथे. आपण गटग करु खास तुझ्याकरता. कधी येतेस ते बोल.

सायो, नको तिथे विषयांतर करायची जुनी सवय तुझी. इथे तिथे लिहिण्यावरून बघ हां तुझी अक्कल काढली जाईल मग. तु 'तिथे' ये बघु. मग उत्तर देते.

वर्षु, सॉरी, सायोच्या प्रश्णाला उत्तर द्यायला लागल्यामुळे हि पोस्ट. नाहितर मला नाही आवडत विषयांतर करायला.

भारीय खाऊगल्ली !
कुत्रं आणि बोकडं सोलुन शेजारी शेजारी टांगल्यालं पहिल्यांदा पाहिलं तेव्हा जाम उडालो होतो Proud

श्री!! कुत्रं,बोकड आणी साप.. सुपरमार्केट्स मधे विकायलं असणं कॉमन दृष्यं आहे.. ९ वर्षांपासून डोळ्यांना काही वाटेनासं झालंय..
आपल्याकडे आसाम,नागालँड भागांतून कुत्रा सर्रास खातात ना..
@ पिंगु.. फेर फटका मारायला काय हरकतै?? Happy
ध्वनि,सायो- सॉरी नका म्हणू गं मला.. चलने दो.. Happy

चायनाच्या लोकांचे अन्नब्रम्ह पण आपल्याला साधे फोटोत बघायला कसेतरी वाटते. आपल्याकडे अस्सल मासेखाऊ साधा खे़कडा खात नाहीत ( माझ्या माहिती प्रमाणे ). त्यांना ही मेजवानी कल्पनेच्या पलिकडची असेल.

हे फोटो पाहुन शाकाहारी तर गरुड पुराणातल्या नरकाशी याची उपमा न करतील तर नवल.

Pages