सॅमबहादूर यांचे निधन

Submitted by slarti on 27 June, 2008 - 00:22

भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम होर्मुसजी फ्रॅमजी जमशेदजी माणेकशॉ यांचे आज निधन झाले. या थोर लढवय्याला कृतज्ञतापूर्वक सलाम.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पद्म विभूषण सॅम माणेकशॉ याना माझी श्रद्धांजली.

सॅम मणेकशा या सेनानीस आदरांजली.

मला एक गोष्ट खटकली, ती म्हणजे या सेनानीस अखेरचा सलाम देण्यात खुपच उदासिनता (राजकीय, लष्करी) दिसली. आपले राष्ट्रपती (Supreme commander कशाला म्हणवतात?), पंतप्रधान तर सोडाच पण सौरक्षण मंत्री पण गैरहजर? तिन्ही सेनादल प्रमुख पैकी एकही नाही.

http://www.rediff.com/news/2008/jun/28kp.htm

पुर्वनियोजीत कामात ही सर्व मंडळी व्यस्त होती, आता मरणाच्या वेळेचे पण नियोजन करायला हवे कां?

आपण शिवाजी महाराज, राणा प्रताप यांच्या पराक्रमाबद्दल नेहमीच बोलतो एकवेळ अस वाटत की तो पराक्रम तिथेच संपला की काय? पण तीच परंपरा राखतच माणेकशॉ सारखे पराक्रमी आजच्या काळातही होउन गेले आणि तरी आजच्या पिढीला माहीत नाही ही फार खेदाची बाब आहे... अश्या सेनानींबद्दल राजकिय उदासिनता ही काही नवीन गोष्ट नाही.

तरी माझ्याकडुनही सॅम माणेकशॉ याना विनम्र श्रद्धांजली.

माझ्याकडुनही सॅम माणेकशॉ याना विनम्र श्रद्धांजली

मटा अन लोकसत्ता मधे दोन ओळीची बातमी होती अन न्यू यॉर्क टाइम्स मधे मात्र त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा ऑबिचुअरी लेख होता मस्त. आपले लोक ऐश्वर्या च्या कांजिण्या/गोवर मधेच अडकले असतील Sad

लोकसत्तामधे १,२ मोठे लेख होते २९/०६ च्या पेपरात. भ्रष्ट राजकारणी त्यांना अखेरचा सलाम द्यायला गेले नाहित ते बरेच झाले.

मंदार्,बरोबर!!!

इंडिअन एक्स्प्रेसमधे फार छान लेख आले होते.
आठल्ये यांनी पण छान लेख लिहिला होता