लज्जा

Submitted by पल्ली on 28 March, 2011 - 03:02

हृदयात दाटली
ओठांत थांबली
ही शब्दावाचुनी भाषा...
तुजसाठी जपावे
तुजवीण झुरावे
ही कसली रे माया....
द्यावे झोकुन
उधळुन द्यावे
सांभाळते काय कशाला...
तुझ्याचसाठी सारे
तरि झाकते आहे
ही छळणारी लज्जा....

गुलमोहर: 

ही शब्दावाचुनी भाषा...
तुजसाठी जपावे
तुजवीण झुरावे
ही कसली रे माया..

आवडली.मस्त !!

झक्कास कविता....

उमेशजी यालाच म्हणतात अचानक-भयानक.... Lol Lol Lol

आणि रसिकवैद्यांना बोलवायची गरज नाहि.... त्याच काय आहे, मा.बो नगरातील रसिकवैद्य कोणाला काव्यज्वर चढतय का याचिच वाट बघत बसलेले असतात..... Happy

क्रांती, खरच का गं सुंदर? Sad माझा ना हल्ली कविता लिहिण्याचा आत्मविश्वासच गेलाय बघ.... चुकत असेल तर कान पकड आणि सुधरव

पल्ली कविता आवडली .बरेच दिवसात काही लिहील नाहीस ते .आता विनोदी अस काही लेखन करावस .

सुंदर. कमी शब्दात खूप अर्थ.

कविता लिहायला आत्मविश्वासापेक्षा 'मूड लागणे' जरुरी आहे, नाही का पल्ली?

अरे वाह.. बर्‍याच दिवसांनी?

आणि कविता लिहायला आत्मविश्वास कशाला लागतो? तुझी कविता तुला आवडते, येवढा विश्वास पुरे आहे. कविता स्वतःसाठी उतरलेली असते, हाच तर फरक आहे व्यावसाईक गीतकारांमध्ये आणि कविंमध्ये... Let it flow... flow is never direction less.