पाऊस

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

पाऊस आला पाऊस आला
चहु बाजूंनी पुकारा झाला

  कधी डोंगरावर तर कधी नदीकाठी
  जाणवून देतो अस्तित्व तो
  मनाचिया कोंदणी प्रियाच्या
  रिमझिम जागवून देतो तो

   आठवणींच्या कडेकपारी
   पाऊस दाटून राहतो नेहमी
   उनाड वारा अन् धुंद हवा
   जागवतात नकळत रम्य आठवणी

    तसा हा पाऊस नेहमीचाच
    पण प्रत्येक वेळी हवाहवासा
    असून अडचण नसून खोळंबा
    ही म्हण सार्थ करणारा

     विषय: 
     प्रकार: 

     वा वा अ. आ. सहीच.. पावसाळी हवा मानवली दिसतेय एकदम..

     (हे काय? वविची झलक आत्तापासुनच का..? ह्याच्यामुळे कुणीच नाव देत नाहिये वविसाठी.
     काय रे बुवा, त्या रेडिओ प्रोमोमधे संयोजकांनी जाहिरात केल्याने आत्तापासुनच छळ सुरु..)

     ~~~~~~~~~
     ~~~~~~~~~
     Happy

     वाह अ.आ. आम्ही घाबरत होतो, तेवढं घाबरण्याची गरज नाहीय तुमच्या ४०० पानी वहीला. Proud
     छान जमली आहे की.

     असून अडचण नसून खोळंबा
     अगदी अगदी..... अरुण.... मस्त जमलिये कविता

     समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता
     अरुणरावांच्या कवितांचा पाऊस, वविकरांनो, झेला! Proud

     अरुणरावः सहीये! वविला ज्येष्ठ साहित्यिकांकडून 'निवडक अ.आ.' प्रकाशित करून घ्याच. Happy

     -------------------------------------------
     हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

     विद्रोही संमेलनाची तयारी का??

     फ निवडक अ. आ. का म्हणून? समग्र अ. आ. का नको..?
     कारणे द्या...

     ~~~~~~~~~
     ~~~~~~~~~
     Happy

     वा वा... अरुणराव, मस्तच लिहलय....
     ललित मध्ये टाकुन द्या!

     दिवे!