'जोशी की कांबळे'

Submitted by मीन्वा on 26 June, 2008 - 01:30

'जोशी की कांबळे' पाहीला. विषय interesting वाटला आणि सकाळमधे की कुठेतरी रिव्ह्यू पण आला होता चांगला आहे म्हणून पहायला गेले. पण निराशा झाली. कलाकार, अभिनय वगैरे ठिक. पटकथेमधे मात्र खूपच त्रुटी आहेत.

जोशी की कांबळे अशी तुलना न राहता ती श्रीमंत की गरीब अशी झाली आहे.
जोशी की कांबळे अशी तुलना करायची असती तर त्या दोघांची आर्थिक पातळी समान दाखवली असतं तर बरं झालं असतं.
तसंच हा मुलगा केवळ जोशी आपले जन्मदाते आईवडील श्रीमंत आहेत म्हणून त्यांच्याकडे जातो हे पटत नाही.
बौद्ध धर्मीयाला गणपतीपुढे (हिंदू झाल्यावर तेही स्वखुषीने) उभे केल्यावर एखाद्या हिंदूला येसुपुढे (जबरदस्तीने बाटवल्यावर) हात जोडायला लागल्यावर वाटावं तसं वाटेल..? जरा अतीच..
पूर्ण सिनेमात कुठेही कुणीही हा विचार मांडत नाही की जोशी कुटुंबीय १५ वर्ष या मुलाची वाट पहात आहेत.
कांबळे बाई म्हणतात एवढं होतं तर हरवून कशाला द्यायचं मुलाला? (म्हणजे त्या दिवशी जोशी बाई सकाळीच आवरुन मुलाला घेऊन बाहेर पडल्या ते आज याला कुठे तरी हरवून येऊ या असं ठरवूनच... वा वा काय पण झकास कल्पना आहे? )
एरवी त्या मुलाला आपल्यातला समजणारे सोनावणे सर ऍडमिशन घेताना मात्र त्याला म्हणतात की तू राखीव कोट्यातून ऍडमिशन घेतलीस तर एखाद्या दलिताची जागा अडवतोस. आणि जोशींना परवडतच आहे की पैसे भरायला...

थोडक्यात माझ्या डोक्यात खालील प्रकाश पडला:

सगळे जोशी श्रीमंत असतात. मुलाला / मुलीला पैसे भरुन MBBS ला ऍडमिशन घेऊ शकतात.
जोशींच्या मुलाने जोशींच्या पैशाने MBBS करुन उरलेलं आयुष्य दलितांची सेवा करण्यात घालवावं
सगळे कांबळे गरीब असतात.
गरीब पालक की श्रीमंत पालक असे पर्याय असतील तेव्हा श्रीमंत पालक निवडावेत.

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"उरलेले आयुष्य" Happy बाकी थीम काय आहे जोश्यांचा मुलगा कांबळ्यांकडे वाढतो आणि कांबळ्यांचा जोशांकडे असे काही आहे का?
फक्त "प्रकाश" मधले दुसरे वाक्य तितकेसे चूक नाही - म्हणजे चित्रपटाने तसा संदेश द्यायला हरकत नाही. दिग्दर्शकाचे मत म्हणून.

आणि हिंदु "होतात" कसे हे कसे दाखवले आहे?

ह्म्म्म... पेप्रात आलेलं वाचून असंच काहीसं असावं अशी शंका होती.
पण अमेयचं काम कसं आहे? तो एक चांगला नट आहे असं वाटतं.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

काम तसं चांगलंच झालंय सगळ्यांचं.. अमेयचंही..
.
जोशी एका कार्यक्रमाला गेले असताना एक भुरटा त्यांचा मुलगा पळवतो. गडबड गोंधळ होतो म्हणून तो एके ठीकाणी त्याला सोडतो. कांबळे म्हणून कुटुंब तिथे रहात असते. त्यांना मुलबाळ नसतं. शेजारची म्हातारी त्या दोघांना सल्ला देते की काही पोलिसात वगैरे जाऊ नका. तुम्हीच वाढवा. तुम्हाला मुलबाळ नाहीच आहे. ते त्याला प्रेमानं वाढवतात. मुलगा हुषार असतो. जोशींनी पोलिसात दिलेली तक्रार ओपन असते पंधरा वर्षानी तो भुरटा पोलिसांच्या हाताला लागतो आणि मुलगा सापडतो. जोशी मुलाला ठरवायचं स्वातंत्र्य देतात की जोशींकडे रहायचं की कांबळ्यांकडे. तो जोशींकडे जायचं ठरवतो. पैसा, बंगला वगैरे विचार करुन.
.
बरोबर फारेंड .. तसा संदेश द्यायला हरकत नाही. पण तो चुकीच्या पद्धतीने दिला गेलाय असं वाटतं सिनेमा पाहताना. थोडक्यात म्हणजे पैसे त्यांचे वापर बिनधास्त.. पण त्यांना तू काय करावंसं वाटतंय त्याचा नको विचार करुस असं.
.
त्या जोशींचा कुणी काही विचारच करत नाही सिनेमामधे कुठे. काही काही वेळा माझी तर चिडचिड झाली पाहताना.

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

ह्या सिनेमाचे नाव वाचले तेव्हा मला २००७ च्या दिवाळी अंकातील (दिअं चे नाव आठवत नाहिय आता) एक कथा आठवली. त्यात, खुप हुशार असलेल्या एका उच्चवर्णिय आईवडीलांचा साधारण मुलगा रेखाटला होता. गोष्ट नीटशी आठवत नाही पण तो मुलगा आपला जन्म स्पर्म डोनेशन ने झाला हे शोधुन मग ते स्पर्म्स कोणाचे ते शोधतो. ते नेमके एका दलिताचे निघतात, जो साधारण असतो आणि राखिव सीट्सचा वापर करुन उच्चशिक्षण घेउन अमेरिकेला गेलेला असतो. तो मुलगा मग कोर्टात दावा लावतो की माझा खरा बाप दलित आहे, त्यामुळे मला आरक्षणाचा लाभ मिळावा. गोष्टीचा मुख्य भाग म्हणजे हा दावा होता.

सिनेमाचे शीर्षक वाचुन मला वाटले ह्याच गोष्टीवर सिनेमा आधारीत असावा. फारसा वेगळा नाहिय अर्थातच.

साधना

ही बाळ फोंडके यांची गोष्ट आहे का?

हो, दिअं मधली गोष्ट बाळ फोंडक्यांची आहे.

मी पण वाचली आहे ही गोष्ट दिअं मधे.

त्या जोशींचा कुणी काही विचारच करत नाही सिनेमामधे कुठे. काही काही वेळा माझी तर चिडचिड झाली पाहताना.>>>>म्हणजे अर्थात हा सिनेमा कांबळे गटाने काढला असणार Happy जोशींनी काढला असता तर दुसरी(च) बाजू बघायला मिळाली असती!! असले 'अजेंडा' वाले चित्रपट एकांगी असण्याची शक्यता जास्त!!:)

एरवी त्या मुलाला आपल्यातला समजणारे सोनावणे सर ऍडमिशन घेताना मात्र त्याला म्हणतात की तू राखीव कोट्यातून ऍडमिशन घेतलीस तर एखाद्या दलिताची जागा अडवतोस. आणि जोशींना परवडतच आहे की पैसे भरायला...

म्हणजे तो मुलगा जोशींकडे गेला तरी मनाने, विचाराने कांबळेच राहणार .....
आणि जोशी सुध्धा बंगला, पैसे वगैरे पाहुनच आपली निवड करणारा मुलगा केवळ आपल्या रक्ताचा म्हणुन चालवुन घेणार. बिचा-या कांबळ्यांची काय हालत झाली असेल. इतकी वर्षे आपला म्हणुन सांभाळला तो मुलगा केवळ बंगला, पैसे वगैरे मिळणार म्हणुन आपल्याला सोडुन जाणार..

बरोबर आहे सिनेमा बनवणार्‍याचं. जोशींच्या बाजूने सिनेमा केला तर त्याला सेलेबिलिटी नसते हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

जोशींना आजकाल काही किंमत राहिली नाही हेच खरं. Proud
~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

चित्रपटाच्या झलकीत जेव्हा रामदास आठवलेंची झलक मी पाहिली तेव्हाच साधारण चित्रपट कसा असेल याची कल्पना आली.
लक्षात ठेवा जर चित्रपटात जोशींच्या बाजुचे काही असते तर चित्रपट रीलीज झालाच नसता.
आजकालच्या पोलिटिकली करेक्ट जगात जोशीना सापत्न वागणुक मिळाली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय?

मीनु,
एक "जोशी" म्हणुन तुमच्या मताशी १००% सहमत.:)

<<जोशींना आजकाल काही किंमत राहिली नाही हेच खरं>>
नेमकं काय म्हणायचय तुम्हाला. आतापर्यंत रेस मध्ये एकट्यानीच (इतराना धार्मिक कारण दाखवुन वंचित ठेवत) धावायच व पहीला नंबर आला म्हणायचा, ही तुमची सवय, नाही का ? आता इतर लोकही येतायेत या क्षेत्रात म्हणुन तुम्हाला त्रास होतोय, नाही का? आता सवय घाला याची, हा बदल वाढत जाणार आहे.

आजकालच्या पोलिटिकली करेक्ट जगात जोशीना सापत्न वागणुक मिळाली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय?

हेच काम जोशी हजारो वर्षांपासुन (जातीच्या नावावर) करत येत आहेत, त्यावर पण बोलाना!

म्हणजे अर्थात हा सिनेमा कांबळे गटाने काढला असणार जोशींनी काढला असता तर दुसरी(च) बाजू बघायला मिळाली असती!! असले 'अजेंडा' वाले चित्रपट एकांगी असण्याची शक्यता जास्त!!

अहो सिनेमाचा दर्जा काय, तो किती चलला व मिळालेले अवार्ड, याचा जरा विचार करा, आणि बोला. जोशानी कढला असता तर............
मग काय, बामणी कावाच कावा बघायला मिळाला असता.
निदान कला क्षेत्रात तर बामणी कावा करु नका.

चित्रपटाच्या झलकीत जेव्हा रामदास आठवलेंची झलक मी पाहिली तेव्हाच साधारण चित्रपट कसा असेल याची कल्पना आली.

केवढा पुर्वग्रहदुशीतभाव, तुमचा...........
आंबेडकरी अनुयायाना बघुन एवढा त्रास करुन घेण्याची गरज नाही. तुम्हाला माफ करण्याएवढं मोठ मन आहे त्यांचं. आणि तुमच्या माहीतीसाठी लिहतो, ते फार चांगले कलाकारसुद्धा आहेत, त्यांचे काही ऑडिओ कॅसेट आहेत बाजारात, एकदा नक्की ऐका; त्यांच्याबद्दलचा तुमचा दृष्टीकोन आवश्य बदलेल.

एक "जोशी" म्हणुन तुमच्या मताशी १००% सहमत.

एक आंबेडकरी म्हणुन समस्त ( फक्त संकुचीत बामणी व्रुत्ती बाळगणा-या, ) जोशी वा ईतर बामणांचा (सगळ्या नाही) निषेध.निषेध. निषेध.