झेन कथा ११ आरसा

Submitted by ठमादेवी on 25 March, 2011 - 04:42

चुआन्त्सु नावाचा झेन गुरू नेहमी म्हणायचा

माणसाचं मन आरशासारखं असायला हवं...

आरसा कशाचाही स्वीकार करत नाही,
आरसा कशाचाही तिरस्कार करत नाही,
तो ग्रहण करतो पण संग्रह करत नाही.

माणसाचं मन आरशासारखं असावं

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिबिंबाचा काहि उल्लेख नाही.

आपल्याकडेही भक्तिगीतात आरसा आहेच

देव प्रेमळ प्रेमळ, जसा आरसा निर्मळ
बिंब तयात बघावे

(सुख देवासी मागावे, दु:ख देवाला सांगावे )

आणि

तोरा मन दर्पण कहलाये, भले बुरे सारे कर्मोंको
देखे और दिखाये ..

विचार म्हणून ठीक आहे. पण मानवी मन हे निर्हेतुक राहूच शकत नाही. आरसा आपले बिंब स्वीकारतो, कसेही असले तरी कारण तो आरश्याचा स्थायीभाव आहे. तिरस्कार करीत नाही हे १००% खरे, ग्रहण करत नाही हेही खरेच. पण त्याप्रमाणे मानवी मन वर्तन करेल का याबद्दल साशंक आहे. अगदी साधुपातळीवर पोचलेल्या व्यक्तीस एखादे दिवशी एकसमयी सुकृत्य करणारे आणि दुष्कृत्य करणारे एक असे दोन इसम भेटले तर तुलनात्मकदृष्ट्या का होईना ते मन दोन्ही गोष्टी संग्रही ठेवणारच. शेवटी 'आरसा' भावनाहीन राहू शकतो कारण तो मृत आहे, मानवी मन सचेत असल्याने विचार करणारच.