Submitted by छाया देसाई on 23 March, 2011 - 07:57
सुगंधात आहे सुगंधीत आहे
तुझ्या रे तुझ्या फक्त धुंदीत आहे
न हव्यास आता तसा शब्दवेडा
तुझी भूल मौनास,गुंगीत आहे
बहरले अशी वाटते मी परंतू
सुकी बासरी आत संगीत आहे
तुला ओढ माझी असो वा नसो वा
तुझ्यातच मला मीच गुंफीत आहे
गुरू मोक्ष मुक्ती गुरू भाव भक्ती
परीसा तुझ्या दिव्य शक्तीत आहे
तुला आठवीते तुझे गीत गाते
तुझा रंग आयुष्य रंगीत आहे
नको शब्द छाया नको शब्द माया
तुला गीत साष्टांग वंदीत आहे
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
सुगंधात आहे सुगंधीत
सुगंधात आहे सुगंधीत आहे
तुझ्या रे तुझ्या फक्त धुंदीत आहे>>> वा वा! बोलका मतला केलात आपण!
बहरली अशी वाटते मी परंतू>> मस्त ओळ!
तुझ्यातच मला मीच गुंफीत आहे>> मस्त ओळ!
तुला आठवीते तुझे गीत गाते
तुझा रंग आयुष्य रंगीत आहे>>> छान ओळी! (समर्पक समारोप अपेक्षित होता.)
अभिनंदन, शुभेच्छा व धन्यवाद!
-'बेफिकीर'!
छान गझल!!
छान गझल!!
आहाहा!! काय भारीये राव ही
आहाहा!! काय भारीये राव ही गझल!! छायाताई.. यू रॉक!!
व्वा. भारी आहे गझल.
व्वा. भारी आहे गझल.