Submitted by अभय आर्वीकर on 22 March, 2011 - 06:43
पांढरा किडा
तुझी सांग येथे दखल कोण घेतो
कशाला घशाला उगा त्रास देतो
असामान्य विश्लेषकांच्या भितीने
गझल घप्प कपड्यात झाकून नेतो
नवे रोप लावत पुढे चालताना
कुणी सांड मागून तुडवीत येतो
पिके फस्त केली फळे पोखरूनी
कुठूनी किडा पांढरा जन्म घेतो
अभय लाचखोरीत तो शिष्ट प्राणी
कुणाच्याच बापास ना घाबरे तो
. गंगाधर मुटे
..........................................
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मतला आवडला मुटेजी....
मतला आवडला मुटेजी....
कुठूनी किडा पांढरा जन्मते
कुठूनी किडा पांढरा जन्मते तो
जन्मतो तो असे हवे का? गझल मस्तच!!!!
शेतकर्याच्या दृष्टीने पांढरा
शेतकर्याच्या दृष्टीने पांढरा किडा म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासरखंच असतं .
जन्म घेतो असा बदल केलाय.
जन्म घेतो
असा बदल केलाय.
सुरेख!!
सुरेख!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर्वांचे.
आवडली..
आवडली..