झेन कथा ९ विचार

Submitted by ठमादेवी on 22 March, 2011 - 03:16

एके दिवशी एका भिक्षूने गुरू जोशूंना विचारलं

मनात कोणताही विचार नसण्याची माझ्या मनाची अवस्था आहे ती बरोबर आहे का?

जोशूंनी म्हटलं, हा विचारच मनातून काढून फेकून दे!!!

शिष्य म्हणाला,,, पण माझ्या मनात विचारच नाहीये तर मी फेकू तरी काय?

गुरू म्हणाले, आपल्या मनात काहीच विचार नाही हा जो विचार तुझ्या मनात आलाय तोच काढून फेकून दे!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे फारच उच्च दर्जाचे तत्वज्ञान आहे! की आध्यात्मिक विनोद आहे? शंका म्हणून विचारतोय गैसन.

मी जोशी वाचलं >>> तिने जोशूच्या आधी गुरू लिहीलं आहे मंद्या. ढोरू नव्हे.

हे रिते होण्याचे ध्यास आपल्या संतांनाही लागले होते.

एका जनार्दनी सगळेच जाऊ दे
एकलीच राहू दे मला,
भवानीआई रोडगा वाहीन तूला.

तत्त्वज्ञान म्हणून भिक्षू (की शिष्य?) ची 'मनात कोणताही विचार न येण्याची' अवस्था आता स्वीकारली तरी त्याची ती अवस्था उद्याही तशीच राहील ही शक्यता संभवत नाही. कारण संन्यस्त वृत्तीच्या कोणत्याही पातळीवर जिवंत व्यक्ती पोचली तरी ती शेवटी ती 'मॉर्टल' असल्याने विचार आणि विकार तिला सुटत नाहीत असेही हेच तत्त्वज्ञान सांगते. अध्ययनाने विकारावर मात करता येण्याशी शक्यता आहे, पण विचार सुटणार नाही, सुटत नाहीत.

"मी कसलाही विचार करत नाही" असे एखादी व्यक्ती म्हणत असेल तर प्रत्यक्षात तोदेखील शेवटी एक विचारच असतो हे सोयिस्कररित्या विसरले जाते.

त्यामुळे गुरु जोशूनी "हा विचारच फेकून दे !" दिलेला सल्ला व्यावहारिक पातळीवर आदर्श असाच आहे.

ठमा, चांगली कथा.

आपल्या मनात एकही विचार नाही अशी अवस्था खरेच येत असेल का?
काही गोष्टी आपल्याला (अगदी काही क्षणांपुरता का होईना) तरंगत असल्याचा अनुभव देतात तेव्हा?

ह. बा. त्या शिष्याला स्वतःचं मन निर्विकार असल्याबद्दल गर्व झाला होता असं कथेत दिसतं... मन निर्विचार करणं ही किती कठीण गोष्ट आहे आणि हे जमलं नाही तर ती आध्यात्मिक मार्गातील धोंड आहे... अनेकदा आपण म्हणतो की मी कसलाच विचार करत नाहीये... पण हा विचार नसल्याचा विचारच घात करतो... मनाची ही निर्विचार अवस्था गाठणं आणि त्यात टिकून राहणं म्हणजे खरं मेडिटेशन म्हणता येईल बहुधा... आपण मेडिटेशन करायला जातो तेव्हा एका केंद्रावर किंवा एखाद्या मंत्रावर लक्ष केंद्रित करायला सांगतात... हे केंद्र किंवा मंत्र हा देखील एक विचारच आहे... सर्वसामान्य माणसाला मनातले सर्व विचार काढून टाकणं जमणं जवळपास अशक्य आहे. त्यामुळे किमान एका विचाराभोवती या माणसाचं मन एकाग्र व्हावं असा प्रयत्न असतो... तोच टप्पा इतका कठीण आहे की त्याच्या पुढचा टप्पा गाठलेल्या माणसाने सर्व भावनांवर विजय मिळवला आहे, तो खरा स्थितप्रज्ञ आहे असं म्हणता येईल...

अवांतर... असंस्कृत आयडींकडून असंस्कृत प्रतिसादच अपेक्षित असावेत का? Uhoh

गजानन, मी एकदा तसा प्रयत्न केला होता... पण माझ्या मनात सध्या काहीच विचार नाही असा विचार एका सेकंदभरात मनात डोकावला आणि त्या विचाराने मनात घर केलं... असंच होतं... प्रयत्न करून बघता येईल... Happy
प्रतीक, दिनेश, नी, अश्विनी, मामी आभार... Happy

माझ्या मते या अवस्थेलाच 'सन्यास' म्हणतात.

हिमालयात एकांतवासात जाण्यापेक्षा स्वःताला 'रिते' करुन मागे शुन्यही न उरणे.

आपल्या मनात एकही विचार नाही अशी अवस्था खरेच येत असेल का? >>
स्वताचे विचार स्वत: पहात राहिल्यास एखाद्या क्षणी परम शांततेचा अनुभव येइल! एखादी आगगाडी जाताना तीचे डबे जसे तटस्थ्पणे फलाटावर उभे राहुन साक्षी होउन पाहात राहावे तसे स्वताचे विचारांची आगगाडी पहात राहीले पाहिजे!
पातंजलीने सांगितलेल्या ८ अंगामधले हे शेवटचे अंग! - यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी!

पण माझ्या मनात सध्या काहीच विचार नाही असा विचार एका सेकंदभरात मनात डोकावला आणि त्या विचाराने मनात घर केलं >>>
जर साक्षी बनुन विचार पहाणे जमत नसेल तर श्वास पहाण्याचा प्रयत्न करा! प्राणायाम नव्हे! फक्त हवा कशी आत जाते आणी बाहेर येते हे पहायचे! हळुह्ळु विचार शुन्य व्हायला लागतील!

दिनेशदा बरोबर आहे!

पण इथे जे जोशुने सांगितले आहे ते वा एकनाथांनी जे सांगितले आहे त्याचाहि खरा अर्थ एक होणे हा नाहि तर शुन्य होणे हा आहे!
एक होणे म्हणजेच शुन्य होणे! एकच असेल तर पहाणारा आणी पाहिला गेलेला हे वेगळे असु शकत नाहित! तीच परम शांतता!

पण विचार सुटणार नाही, सुटत नाहीत. >>>

विचार निर्माण तर होणारच पण निर्माण झालेला विचार साक्षी बनुन पाहिले तर अंतर्धान होउ शकतो. सर्वसामान्यतः आपणच विचार असतो. "आपण" आणी विचार ह्यात अंतर नसते. जसे जसे विचार पाहु लागतो तसे ते अंतर बनु लागते कारण साक्षी बनुन विचार पाहिले की ते साबणाच्या बुडबुड्याप्रंमाणे नाहिसे होतात.