पूर्व भारतात राहणारे मायबोलीकर

Submitted by ganeshbehere on 22 March, 2011 - 02:57

नमस्कार,
उत्तर पुर्व (नॉर्थ इस्ट) भारतात कोणी मायबोलीकर आहात का?

नोकरी निमित्त आम्ही फेब्रुवारी २०११ पासुन बारापाणी (मेघालय) येथे राहायला आलो आहोत.

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॉरी. मी इथे अलिकडे चक्कर टाकलीच नाही.
सावली, अल्पना, थँक्स. आम्ही सुखरूप आहोत. इथे भूकंप खूप सरावाचा आहे सगळ्यांना. शेजारी-पाजारी तर सांगत होते की आताशा दर सहा महिन्यात एखादा भूकंप झाला नाही तर त्यांना चुकचुकल्यासारखे वाटते. Happy

नरेंद्र, आज नक्की अपलोड करते फोटो (आणि जमले तर विडीयो) आणि लिंक इथे टाकते. (जगभरच्या आलतू-फालतू कारणांनी उशिर केल्याबद्दल खूप खूप सॉरी.)

आम्ही आय आय टी गुवाहाटीत राहतो. आतापर्यंत इथले काढलेले फोटो इथे सापडतील.

अजून जमतील तसे गणपती, बीहू, दुर्गापूजा वगैरे सणांचे सगळे फोटो टाकीनच. शिलाँग-चेरापूंजीचा अल्बम आता अपलोड करायला घेईन. तोपर्यंत हेच गोड मानून घ्या. Happy

मी भारताच्या पूर्व भागात राहात नाही. पण शीर्षकात ‘पुर्व’ च्या ऐवजी ‘पूर्व’ अशी दुरुस्ती करायला हवी आहे का?

येस्स्स्! बाप्पा थाटामाटात बसलाय. शिवाय सध्या घरात वय-वर्षे २ चे बाप्पाभक्त असल्याने बाप्पाची अगदी ऐश चालली आहे. उठसुठ प्रत्येक गोष्ट बाप्पाला द्यायची असते. मग माझी कल्पनाशक्ती प्रत्येकच वेळी पणाला लागते.

आता पहिल्या काही दिवसांची धामधूम संपली, इथे बर्‍याच जणांकडे दीड्/तीन्/पाच दिवस गणपती असतो, मग त्या त्या घरी सामूहिक आरती असते. आरतीच्या नावाने आम्ही मस्त नटून-थटून सणाचं गोडधोड हादडून 'गणेशोत्सव' साजरा करतो. आमच्याकडे १० दिवस असतो, मग उरलेले सगळे दिवस आमच्या घरी आरती असते. चिल्ल्या-पिल्यांपैकी आळीपाळीने प्रत्येक जण आरती करतो. या वर्षीपासून त्यांचे कार्यक्रम करायचा विचार आहे. बघू, मुलं कशी प्रतिसाद देतात ते. असो. बरंच पाल्हाळ झालं. तुमच्याकडे बसला का गणपती? कोलकता काय म्हणतंय?

माबोवरची बाप्पाच्या धाग्यांवरची धावपळ पाहून आठवलं की मागे कधीतरी मी या धाग्यावर फोटो शेअर करण्याचे म्हटले होते. निदान या वर्षी तरी मुहूर्त लागतो का पाहायचं. Wink

मी ऑक्टोबरमधे आसाम-अरुणाचल प्रदेशांना भेट द्यायला येणार आहे. शक्य असेल तर तिथल्या माबोकरांना भेटायला आवडेल.

ऑक्टोबर महीन्यात १ दिवस कोलकाता ट्रिप करायचा बेत आहे...

मुम्बई हुन सकाळी ६.०० ला निघुन ९ ल कोलकाता .... रात्री ८.०० वाजता कोलकाताहुन परत...

साधारण ह्या अकरा तासात कोल्कता मधे काय काय बघता येइल? गन्गासागर एवढ्या वेळात करता येइल का?

गंगासागर करता येणार नाही. संध्याकाळी 8 चं विमान म्हणजे दुपारी 5, 5.30 पर्यंतच वेळ हातात आहे.
तुम्हाला नक्की काय बघायचं आहे, कशात रस आहे हे कळलं तर सुचवता येईल
गूगल वर कलकत्त्यातील प्रेक्षणीय स्थळे काय आहेत हे एकदा बघा आणि मग सांगा काय आवडेल

दक्शिणेश्वर , बेलुर मठ,काशीघाट इथे जायचा विचार आहे.. साधारणपणे देवीची देवळे जी आहेत कोलकाता मधे त्याला भेट द्यायचा plan करतो आहोत...

वरदा , तुमच्या आधिच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद... जर वरती लिहिलेली ठीकाणे जवळपास असतील तर सुचवा , मी airport वरुन प्रायव्हेट गाडी करायचा विचार करतोय कारण बरोबर एक ज्ये. ना . आहेत..