जागतीक पार्किन्सन डे निमित्ताने .....

Submitted by अवल on 21 March, 2011 - 09:59

११ एप्रिल हा जागतीक पार्किन्सन डे म्हणून मानला जातो. त्यानिमित्त रविवार दि. १० एप्रिल २०११ रोजी पुण्यातल्या "पार्किन्सन मित्रमंडळा" तर्फे एक कार्यक्रम आयोजित केला आहे.
पुण्यातल्या पार्किन्सन मित्रमंडळाबद्दल या पूर्वी मी एक लेख लिहिला होता. (http://www.maayboli.com/node/15418)
पुण्यातल्या या पार्किन्सन सपोर्ट ग्रूपने, या वर्षीही हा दिवस साजरा करायचे ठरवले आहे.
दि. १० एप्रिल २०११ रोजी "केसरी वाडा" इथे संध्याकाळी ४.३० वाजता हा कार्यक्रम आयोजित केला आहे. पुण्यातल्या पार्किन्सन आजार असलेल्या रुग्णांसाठी आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांसाठी हा कार्यक्रम खुला आहे. या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अशा मेळाव्यांचा खुपच फायदा होतो. अनेकांना इतरांच्या अनुभवाने, प्रयत्नांनी दिलासा अन प्रोत्साहन मिळते.
या वर्षी प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा सर्वांना नक्कीच खुप फायदा होईल.
तसेच मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी स्मरणिका काढण्यात आली आहे. तिचे प्रकाशनही या सोहळ्यात होणार आहे. अनेक तज्ज्ञ व्यक्ती, डॉक्टर्स यांचे पार्किन्सनवरचे लेख यात समाविष्ट आहेत.
कार्यक्रमाच्या दुसर्‍या भागात श्री. मधुसूदन घाणेकर यांचा एकपात्री कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
या संपूर्ण कार्यक्रमा साठी इच्छुक व्यक्तींना आग्रहाचे आमंत्रण "पार्किन्सन मित्रमंडळा"ने केले आहे. अधिकाधिक रुग्णांना या सपोर्ट ग्रूपबद्दल माहिती व्हावी अन मदत व्हावी हाच उद्देश या सर्वांचा आहे.

"पार्किन्सन मित्रमंडळाचा मेळावा "
दिनांक : १० एप्रिल २०११
वेळ : संध्याकाळी ४.३० वाजता
स्थळ : केसरी वाडा, पुणे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान उपक्रम. पार्किन्सन डिसीज हे न विसरता येणारे नाव आहे. लाडक्या मराठी व्यक्तीमत्वाला ( पुलं) साथ देणारा हा आजार आहे.