टिंग्या

Submitted by केदार on 24 June, 2008 - 22:12

टिंग्या बघीतला. काही काही सिन्स उच्च. थोडा ढिसाळ झालाय कुठे कुठे, पण १५ लाखात अजुन किती चांगला दाखवनार? शेतकर्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मांडन्याचा प्रयत्न केला पण टिंग्याचे बैलावरील प्रेमच दाखविन्यात खुप वेळ गेल्यामुळे तो विषय निट उभा राहीला नाही. पण एकंदरीत आवडला.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टिंग्या मला भारच भावला.
केदार, टिंग्याचा मुख्य विषय हा एक मुलगा व बैल यांचा जिव्हाळा हाच आहे. शेतकर्‍याची दैनावस्था ही त्या परिस्थितीला (चितंग्याला कसायाला विकावे लागणे) जबाबदार असल्याने तिची दाहकता कळेल एवढीच मांडणे अपेक्षीत होती. मात्र तांत्रीक मर्यादेंमुळे अर्थातच कमी बजेट मुळे काहीसा तुटक तुटक वाटतो. योग्य संकलन तसेच काही दृष्यांमध्ये पोटेंशियल असतानाही ते तेवढे परिणामकारक न होणे किंवा कॅमेर्‍याचा अधिक योग्य वापर हा चित्रपट अधिक ताकदीचा बनवू शकला असता.

मलाही आवडला टिंग्या! लो बजेट आहे हे कळते, पण फारसा फरक नाही पडला त्याने.. मला सगळंच आवडलं..
पहील्या-पहील्यांदा मपलं-तुपलं कळत नव्हतं, पण नंतर सवय झाली... चितंग्या विकला इथेच जर पिक्चर संपला असता तर फार वाईट वाटलं असतं, त्या वेळेला खूप रडू देखील आले... पण पुढे नविन वासरू येते आणि सगळे खुष होतात त्यामुळे सुखांत झाला! Happy

खूप रडू देखील आले >> खरय काही प्रसंगात डोळ्यात पाणी येतेच. कितीही टाळायचे म्हणले तरी Happy एकदम मस्त सिन आहेत ते.

अज्जुका खुप अपेक्षा घेऊन जाऊ नको. अगदी भंग होनार नाहीत पण पैशांची खुप वाणवा असल्यामुळे श्रावण म्हणतो तसा कॅमेर्‍याचा वापर निट करता आला नाही बहुतेक.

भाग्यश्री ह्या पिक्चरचा दुखा:तं व्हायला हवा होता असे वाटते (पण मग ती डोक्युमेंट्री झाली असती त्याचे ही भय आहेच) कारण जी परिस्तिथी मांडली आहे तीच प्रत्यक्षात पण आहे व ती फार भयावहच आहे . नाहीतर मी बरेच लोक पाहीली आहेत जी सारखी म्हणतात हे शेतकरी फार माजलेच, कर्ज घ्यायचे, बुडवायचे, परत घ्यायचे आणि नाहीच देने झाले तर आत्महत्या करायची. निदान ते जागे तरी झाले असते.

पण आधी लिहील्या प्रमाने तो पिक्चर आवडलाय. एकाच वेळेस तिन विषयांची मांडनी त्या चित्रपटात आहे व बर्याच प्रमानात ती पेलली गेली आहे. शेतकर्यांच्या प्रश्नाला थोडा वाव देता आला असता पण श्रावन म्हणतोय ते ही बरोबर वाटले.

हो..दुख्खांत झाला असता तरी चाललं असतं, कारण सत्य परिस्थिती अशीच असावी बहुधा.. पण फारच रडारड झाली असती मग.. आधीच, तो चितंग्या उठत नाही,काम करू शकत नाही, तेव्हाची सगळ्यांची हतबलता, विकावे लागणार म्हणून रात्र-रात्र जागणं, टिंग्याचं चितंग्याला धरून झोपणं.., चितंग्याच्या डॉक्टरसाठी टिंग्यांचं इतकं लांब पळत्/चालत जाणं, टिंग्याचा तो बिनतोड निरुत्तर करणारा सवाल, " नानी पण उठू नाही शकत, मग तिला न्या की कापायला!" ई. गोष्टी आधीच रडवतात.. शेवट पण वाईट झाला असता, तर सुन्न होऊन बसले असते... त्यामुळे सुखांत बराय...

आणि शेतकर्‍यांचे प्रश्न आहेत की थोडेफार... कर्ज मिळत नाही, आहे ते फेडता येत नाही,.. बैल असा आजारी, बियाणं येऊन पडलेलं.. दुसर्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्या वगैरे... मूळ विषयाला धरून देखील बरंच काही दाखवलंय पिक्चर मधे...सो, आवडला!

हा बजेटचा प्रश्न पुन्हा पुन्हा का काढला जातोय कळत नाही. मल्याळी आणि कानडी ईव्हन बंगाली सिनेमानी यापेक्षा कमी बजेटमध्ये राष्ट्रीय पारोतोषिके अगदी आन्तरराष्ट्रीय पारितोषिके मिळवणारे चित्रपट दिलेत...

मराठीत वेगळे प्रयत्न होताहेत हे स्वागतार्ह आहेत पण कल्पना दारिद्र्य झाकण्यासाठी लो बजेटचा का आधार घ्यावा?

ह्म्म मुद्दा बरोबर आहे.. लो बजेट आहे हे आपलं जाता जाता सांगितलं.. तो आळवायची जरूरी नाही..

पण कल्पना दारीद्र्य??? काहीही काय! सरळ साधा पिक्चर आहे तो.. एका गरीब शेतकर्‍याचा बैल आजारी पडतो, काम करेनासा होतो.. म्हणून ते विकायला काढतात.. त्यामुळे कुटुंबाला जे वाटते, आणि मेन म्हणजे टिंग्याला जे वाटलंय त्याबद्दल हा पिक्चर..त्यात कल्पना दारीद्र्य काय?? उगीच का म्हणे निगेटीव्ह बोलायचं??

टिंग्या मलाहि आवडला. वेगळा विषय. चांगली हाताळणी. कलाकारांची निवड. बोलीभाषा. सर्वच छान. पण टिंग्याच्या आईचा लुक थोडा शहरी वाटत होता (अर्थात वेषभुषा गावरान असुनहि). सुखांत शेवट केला ते बरच केल.
मराठि कट्टा ह्या साईटवर टिंग्या विषयी त्यांच्यात चर्चा चालु होती की हि खानदेशी बोलीभाषा आधी कळतच नव्हती. पण मुळात हि बोलिभाषा खानदेशी नाहिचये. ती तर जुन्नर, पारनेर भागात वापरली जाणारी भाषा आहे. जाणकार आहेतच अधिक माहिती द्यायला. Happy

हो, मलाही टिंग्या च्या आईची भाषा थोडी शहरी वाटली, कुठे-कुठे. बाकी टिंग्या आवडला.
.
ओतुर परीसरत शुटींग झाले आहे टिंग्या चे. रशीदाचा अभिनय फारच मजेदार Happy

अमोल गुप्तेंच्या 'तारे जमीं पर' पाठोपाठ मंगेश हडवळेंचा "टिंग्या" हि चाललाय ऑस्करवारीला.
हार्दिक शुभेच्छा

======================================================================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

अरे वा.. ह्या वर्षी भारतातून दोन दोन सिनेमे चालले आहेत की काय.. सुरेख..

होय. पण टिंग्या स्वतंत्ररीत्या ऑस्करला उतरणार आहे.

आवडला मलाही. नानीचं कथानक घातलं नसतं तरी चाललं नसतं का, असही वाटलं.

'टिंग्या' आल्या आल्याच बघितलेला, पण इथं लिहायचं राहिलं होतं.
सर्वच दृष्टीने सुंदर चित्रपट.
बजेटच्या नावानं ओरडणार्‍यांना झणझणीत अंजन,
अन कल्पनेचे पतंग उडवणार्‍यांना वास्तवाचा विस्तवी चटका!!
'मपला चितंग्या' ग्रेट.

आठवांच्या पारूंबीला बांधू एक झुला गं..
माझा झुला तुला घे, तुझा झुला मला..!
प्रकाश होळकरांची सुंदर कविता- यातलं एकूलतं एक गाणं म्हणून वापरलेलं- नितांत सुंदर.. Happy