(मी मुक्ता यांच्या वसंतातला Family day..! यावरुन खालील परीच्छेद त्यांचा परवानगीने टाकत आहे. त्यांचे विशेष आभार)
*******
सृष्टीचं कौतुक जितक करावं तितकं कमीच असं वाटण्याला निसर्ग कायमच नवनविन बहाणे देत असतो मला. दरवर्षी वसंतात फुलून फुलून येणारी आणि भरभरुन वहाणारी फुलझाडं हे त्यातलच एक कारण. शिशिर सरुन गेला की झाडांना फुटणारी पालवी बघण्यात, त्यांचा तो हिरवट कडू गंध अनुभवण्यात, त्या तुकतुकीत कोवळ्या पानांना स्पर्श करुन पहाण्यात महिनाभर आरामात निघुन जातो. पण त्याच वेळी निष्पर्ण होवुन कळ्या मिरवणार्या, कुठे कुठे तुरळक फुलू लागलेल्या फुलांच्या तुर्यांनी अजुन लक्ष वेधुन घ्यायला सुरुवात केलेली नसते. हा एक्-दिड महिना सरता सरता बर्यापैकी पानं पोपटीतून हिरव्या रंगात जायला लागतात. तो गर्द हिरवा रंग त्यांचं संथ,एकसुरी आयुष्य वाटतो मला.. त्यातलं अॅडव्हेंचर आता संपलेलं असतं किंवा कदाचित बाहेर तरी दिसून यायचं बंद झालेलं असतं. संथ, शांत, मुलाबाळांत रमलेल्या मध्यमवयीन गरत्या जोडप्यासारखी वाटायला लागतात झाडं बघता बघता.. आणि मग अचानक एके दिवशी डोळ्यात भरण्याइतका फुलोरा दिसतो कुठेतरी.. वसंताची चांगली घमघमीत आणि घवघवीत चाहुल लागते.
*******
हाच अनुभव पुण्यात व आजुबाजुला फुललेला निसर्ग सध्या देत आहे. जुन्या पुणे-मुंबई रोडवर तर १० फुटामागे एक काटेसावरीचे झाड फुलले आहे. काटेंसावर, पांगारा, पळस, कॅशीया, तबुबिया, जकारांडाने संपुर्ण झाड लाल, गुलाबी, जांभळा, केशरी, पिवळ्या रंगाची उधळण करत आहे. अनेक ठिकाणी याच फुलाच्या रंगाने होळी खेळली जाते. अजुन काही दिवसांनी बहावा पण असाच फुलेल.
काटेसावरीच्या (शाल्मली) फुलांमधे प्रचंड पाणी असते म्हणे ते पिऊन आपली तृष्णा भागवायला अनेक पक्षी या झाडावर येतात. (स्थळ : सिंहगड रोड)
या झाडाला काटेसावर नाव देण्यामागे याच्या खोडावर असलेल्या काट्यांचा मोठा हातभार असणार. (स्थळ : कर्जत)
पूर्ण फुललेले काटेसावरीचे झाड असे लालगुलाबी दिसते.
काटेसावरीच्या फांदीवर फक्त ही टपोरी फुले दिसतात. (स्थळ : बनेश्वर)
अशा मोहक फुलांकडे पक्षी आकर्षीत झाले नाही तर नवलच.
दिसायला जरी खुप मऊ वाटत असल्या तरी काटेसावरीच्या पाकळ्या जरा खरखरीतच असतात.
पिवळा तबुबिया (स्थळ : मगरपट्टा सिटी)
गुलाबी तबुबिया (स्थळ : मगरपट्टा सिटी)
प्रखर उन्हाच्या किनारीतही डोळ्याला गारवा देणारा गुलाबी तबुबिया
गुलाबी कॅशिया (स्थळ : मगरपट्टा सिटी)
पूर्ण रस्ता अशा गुलाबीसर फुलांनी फुलुन गेला आहे.
वसंताचे आगमन झाले की पांगाराही असा फुलुन निघतो. (स्थळ : बनेश्वर)
नेहेमीप्रमाणेच वसंताची चाहुल लागताच व होळीच्या दिवसात फुलणारा पळस. (स्थळ : कर्जत)
मागे लिहीलेल्या लेखात पळसाच्या पानांचा फोटो राहीला होता म्हणुन यावेळी न विसरता काढला.
(स्थळ : कर्जत)

सुंदर... अप्रतिम... ब्लु
सुंदर...
अप्रतिम... ब्लु जॅकारंडाला मिस केलं..
मस्त आलेत प्रचि..! चला आम्ही
मस्त आलेत प्रचि..!
चला आम्ही वसंत पाहीला बरं..!
सहीच फोटो केप्या. आवड्या.
सहीच फोटो केप्या.
आवड्या.
हे सगळं आपल्या आजुबाजूचंच, पण
हे सगळं आपल्या आजुबाजूचंच, पण वसंत पहायला आपलीच दृष्टी हवी.
अप्रतिम!
कांद्या, मस्त रे... मी
कांद्या, मस्त रे...
मी पहील्यांदाच तु घेतलेले प्रचि पाहीले (का तुझी पहीली वेळ) सगळे प्रचि सुंदर, अप्रतिम आलेत.
त्या ठळक "वॉमा" च बघ बाबा जरा.
जबरदस्त! फार फार आवडली
जबरदस्त!
फार फार आवडली चित्रे!
धन्यवाद!
मस्तच ...
मस्तच ...
सुपर्ब!!! हे सगळं आपल्या
सुपर्ब!!!
हे सगळं आपल्या आजुबाजूचंच, पण वसंत पहायला आपलीच दृष्टी हवी.>>>>हंसाला अनुमोदन.
छान!
छान!
पहिला आणि पळसाचा फोटो आवडला.
पहिला आणि पळसाचा फोटो आवडला. मस्त
फार सुंदर! काटेसावरीचे काटे
फार सुंदर!
काटेसावरीचे काटे पाहून खरंच काटे आले अंगावर!
केप्या, सह्हिये. खुपच
केप्या, सह्हिये. खुपच छान्...आवडली
सगळेच फोटो सुंदर, तबुबिया ची
सगळेच फोटो सुंदर, तबुबिया ची खूप झाडं पाहिलियेत पण नांव आजच समजलं
सुपर फोटो केपी.
सुपर फोटो केपी.
चान्गले आलेत फोटो गुड!
चान्गले आलेत फोटो
गुड!
सुंदर फोटोज रे...
सुंदर फोटोज रे...
पळसाचे फोटो मस्त आलेत
पळसाचे फोटो मस्त आलेत
केप्या.. मस्त फोटू.. आणि
केप्या.. मस्त फोटू.. आणि शिवडीला गेला होतास तेव्हा काढलेले पक्ष्यांचे फोटो कुठे आहेत..
देस मे बसंत रितु आ भी गयी !
देस मे बसंत रितु आ भी गयी ! मस्त फोटो.
तो अज्ञात प्राणी म्हणजे कॅशिया !
अज्ञात प्राणी म्हणजे कॅशिया
अज्ञात प्राणी म्हणजे कॅशिया >>
मला वाटलेच होते खर तर.. पण खात्री नव्हती. बदल करतो.
मस्तच!
मस्तच!
खरंच आजतागायत वसंत पाहिलाच
खरंच आजतागायत वसंत पाहिलाच नव्हता...
तुझ्या फोटोंमधूनच पाहिला..
अप्रतिम आलेत सगळेच..
माझ्या आवडत्या १०त.
कल्पना छान. गुलाबी बहावा
कल्पना छान.
गुलाबी बहावा पहिल्यांदा पाहिला. धन्यवाद.
ओ हो हो.......काय ही रंगांची
ओ हो हो.......काय ही रंगांची उधळण टिपलीये सुंदररित्या........
खू...प छान वाटले.
शिवडीला गेला होतास तेव्हा
शिवडीला गेला होतास तेव्हा काढलेले पक्ष्यांचे फोटो कुठे आहेत..>>>>>हो रे केपी ते फोटो कुठाय? त्या फोटोंची वाट बघतोय.
सुंदर फोटोज्...
सुंदर फोटोज्...
मस्त रे! तुझा तो "सकुरा
मस्त रे!
तुझा तो "सकुरा फुलला" इकडेपण आण की केप्या छान लेख आहे तो.
जबरदस्त आहेत सर्वच प्रची
जबरदस्त आहेत सर्वच प्रची
मस्त!!
मस्त!!
धन्यवाद लोक्स. हिरकु, जिप्सी
धन्यवाद लोक्स.
हिरकु, जिप्सी अरे शिवडीचे फोटो रोहीत पक्षी खुप लांब असल्याने फारसे काढता आले नाहीत. त्यात मी कॅमेराचा किस्सा केला आहे. रात्री बॅटरी चार्ज केली व सकाळी फक्त कॅमेरा घेऊन निघालो.
तरीही मित्राच्या कॅमेराने त्याने व मी काढलेले फोटो टाकतो काही दिवसात. 
Pages