'नातिसरामि' - स्वेतलाना आर. भाट
जी वाचायला मिळावी म्हणून १८ वर्षांखाली वय असलेल्यांनादेखील आपण सज्ञान असल्याचे अॅफिडेविट करायची इच्छा प्रबळ व्हावी, अशी एखादीच कादंबरी अचानक आढळते. तीही अनेक दशकांतून एखाददाच! प्रसिद्ध होण्याआधीच लाखभर प्रतींची आगाऊ नोंदणी झालेली 'नातिसरामि' ही अशीच कादंबरी आहे. ती अफाट आहे. 'सर' आणि त्यांच्या सात वादळी प्रकरणांची ही कथा. या सातही प्रकरणांत सर स्वतःला पूर्णपणे झोकून देतात, पण काही काळानंतर तितक्याच अलिप्तपणे ते त्यातून बाहेरही पडतात. हे प्रकरणातून बाहेर पडणं शेवटच्या प्रकरणाच्या बाबतीत अतिशय अफलातून पद्धतीने मांडलं आहे. सातवं प्रकरण आणि त्या प्रकरणाचा शेवट, ही कल्पनाच केवळ लाजवाब आहे.
सरांच्या जीवनात भौतिकशास्त्राला महत्त्वाचे स्थान आहे. या त्यांच्या आवडत्या विषयाचे संदर्भ कादंबरीत वारंवार येतात. पहिल्या प्रकरणात न्यूटनाचा गतीविषयक पहिला नियम ठाऊक नसल्याने ते प्रकरण अचानक संपल्याची बाब सरांच्या मनाला खोलवर जखमी करून गेली. त्यानंतर त्यांनी भौतिकशास्त्राचा कसून अभ्यास केला व त्यात प्रावीण्य मिळवले. यानाप्रकरणात मात्र सरांचे हे ज्ञान संपूर्णपणे निष्प्रभ ठरलेले दिसते. हे संपूर्ण प्रकरणच कमीत कमी संवादांचे, त्यामुळेच जास्तीत जास्त प्रभावी आहे. कादंबरीच्या लेखिका स्वेतलाना आर. भाट या सरांचे पाचवे प्रकरण. अत्युच्च वैचारिक पातळी, तत्त्वनिष्ठा आणि स्वच्छ काचेसारखी निखळ पारदर्शकता या गुणांनी नटलेले हे प्रकरण वाचकाला संमोहित करते, बांधून ठेवते. वेगळे झाल्यावर आपले नाव तसेच ठेवणार्या आणि सरांच्या जीवनकहाणीला, इतर प्रकरणांच्या प्रक्षोभक तपशीलांनी भावनिक न होता काटेकोरपणे न्याय देणार्या या लेखिकेबद्दल आपल्याला आदर वाटल्याशिवाय राहत नाही.
प्रत्येक 'प्रकरणा'चा स्वभाव, तिची वैशिष्ट्यं थोडक्या ओळींत वाचकांपर्यंत पोचतात. प्रकरण सुरू होण्यात अजिबात वेळ जात नाही. सरांच्या आयुष्यात त्या सगळ्याजणी कधी आल्या हे दाखवायला काही चित्रपटांचा आधार घेतला आहे. पण हे चित्रपट केवळ संदर्भ म्हणून वापरलेले नाहीत. सरांचे तेव्हाचे प्रकरण आणि त्या काळातला त्यांचा आवडता / त्यांनी पाहिलेला सिनेमा यांचा संबंध सहज जुळतो. ही बाब स्वेतलानाबाईंनी फार कौशल्याने हाताळली आहे.
सरांचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी राखलेली 'वेल्क्रो' दाढी! सरांच्या तरुणपणी त्यांच्या या दाढीभोवती गूढतेचे वलय तयार झाले होते. सरांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झालेल्या लाखो तरुणांनी त्या स्टायलीची नक्कल केली होती. हे लोण तरुणाईत इतके पसरले की, त्याला 'वेल्क्रोमॅनिया' म्हणून ओळखले जाऊ लागले. कादंबरीत याबद्दल लिहिताना स्वेतलानाबाईंची एरवीची काटेकोर लेखणी हळुवार होते. अतिशय नजाकतीने त्यांनी गूढतेचे पदर उलगडून या 'वेल्क्रो'बद्दल लिहिले आहे. हे सर्व मुळापासून वाचण्याजोगे!
पुस्तकाचे मुखपृष्ठ श्री. चिनूक्स ('कंस अकेला' या तितक्याच प्रक्षोभक कादंबरीचे नायक) यांच्या फोटोशॉपीय कसबी कुंचल्यांतून उतरले आहे. श्री. चिनूक्स हे सरांचे घनिष्ठ मित्र. ऐन तरुणाईत नियमितपणे एकमेकांना भेटून हे सुहृद चित्रपट बघणे, सहभोजन करणे वगैरे गोष्टी करत असत. श्री. कंस यांची एकूण प्रकरणे सहा तर सरांची सात, त्यामुळे श्री. कंस सरांना आदराने 'दादा' म्हणत असत. प्रत्येक प्रकरणाच्या काळात सरांनी वेळोवेळी आपले मन श्री. चिनूक्स यांच्याकडे मोकळे केले आहे. त्या प्रत्येक प्रकरणाविषयी सरांच्या मनात असलेल्या तरल भावनांची चिनूक्सांना पुरेपूर जाण असल्याने त्यांनी तेवढ्याच तरलपणे मुखपृष्ठ घडवून आपल्या दादाच्या जीवनकहाणीला न्याय दिला आहे.
या पुस्तकातली ही काही 'प्रकरणं'.
केतकी
सेमीइंग्रजी माध्यमातल्या पहिल्या यत्तेचा पहिला तास.
पहिला विषय, पहिली वही. सरांनी त्यांची वही दप्तरातून काढली आणि सहजच... बाजूच्या बेंचाकडे नजर टाकली. नव्या वर्षाच्या पहिल्यावहिल्या वहीत एक गोरापान हात काहीतरी लिहित होता. सर उत्सुकतेने वाचू लागले. के... त... पुढचे अक्षर वाचण्याआधीच सरांच्या मनात नानाविध पहिल्यावहिल्या भावनांचा कल्लोळ उसळला. ***** ********* ********** ******************** ************************************ ***************************** ** ************ ***** ********************************************** **************************** हीच ती! मनाने ग्वाही दिली.
सर मग 'ताल' पाहायला गेले. एरवी ते असे बालचित्रपट बघत नसत. पण आज शाळेतल्या मित्रांनी विनंती केल्याने ते त्यांच्यासोबत गेले होते. ऐश्वर्या आणि अक्षय खन्नामधला 'मानव - मानव जैसी - मानवसी - मानसी' स्पष्टीकरणयुक्त प्रसंग पाहतानाच सरांना अचानक 'त्या' अक्षरांचे रहस्य उलगडले आणि ते भर सिनेमागृहात ओरडले, "केतकीऽऽ..." आणि चक्क रांगेच्या टोकाकडून प्रतिसाद आला, "ओऽऽ.." ऐश्वर्या रायला बघण्यात अडथळा आल्याने चिडलेल्या प्रेक्षकांना न जुमानता सर रांगेच्या टोकाकडे पळत सुटले. तिथे ती बसली होती. सिनेमा पाहायला जाताना रांगेच्या टोकाकडच्या खुर्च्या निवडणार्या चतुर स्त्रियाच सरांच्या जीवनात कायम आल्या. असो. तिने आणले होते पाच पॉपकॉर्न!
"दोन तुला, दोन मला..."
"आणि उरलेला एक?" (सरांचे गणित लहानपणापासूनच पक्के! त्यामुळे त्यांच्या जीवनवेलीवर तेव्हा पहिले अय्यापुष्प फुलले नाही.)
"तो आपण कंपासबॉक्समध्ये ठेवू..." सरांनी 'का?' म्हणून विचारले नाही व तिनेही कधीच त्यांना सांगितले नाही.
........ भर दुपारची वेळ. समोरच्या शाळेच्या टीमविरुद्ध लंगडीची मॅच चालली होती. सर एका बाजूला उभे राहून मॅच बघत होते. समोरच्या टीममधल्या 'काही' खेळाडूंना मनःपूर्वक दादही देत होते. खेरीज टीममध्ये 'ती' असल्याने आजूबाजूलाच वावरत होती. पण नशिबाला हे सरांचे छोटेसे सुखही पाहावले नाही. सरांच्या टीमवर लंगडीची वेळ आली. सरांना पाठवायचे ठरले. सर जाईनात! गणिताचा अभ्यास पक्का करताकरता लंगडीचा सराव राहूनच गेला होता. इतक्यात त्याच गोर्यापान हाताने त्यांना बाजूला ढकलले.
"सर मागं... तुला काही लंगडी घालता यायची नाही." चिडक्या आवाजात उच्चारलेले ते वाक्य! पण, 'सर' या दोनाक्षरी शब्दासोबत अनुभवलेला तो स्पर्श! खरेतर ढकलताना तिने लावलेल्या बलाने न्यूटनाचा गतीचा पहिला नियम प्रत्यक्षात येऊन सरांचे जडत्व नाहीसे व्हायला हवे होते. परंतु, तोवर शाळेत शिकवल्या जाणार्या भौतिकशास्त्राची गाडी या नियमांपर्यंत अजून आलीच नव्हती. म्हणून सर (शुंभासारखे) तसेच उभे राहिले. आणि मनात *********************** *************** ************************************** ************************************ या दोनाक्षरी शब्दाशी आपले कसलेसे गूढ नाते आहे, ही जाणीव आणि कंपासबॉक्शीतला पॉपकॉर्न घेऊन सर माघारी फिरले. ती (लंगडी घालत) केव्हाच दूरवर निघून गेली होती. या व्यथित करणार्या घटनेमुळेच नंतर त्यांनी शाळेवर अजिबात अवलंबून न राहता आपला आपणच भौतिकशास्त्राचा अभ्यास पक्का करायचा ऐतिहासिक, सामाजिक आणि पारिवारिक निर्णय घेतला.
एलिझाबेथ
कंपासबॉक्शीतला पॉपकॉर्न आता काळा पडला असला तरी ती मात्र गोरी होती. ती.. जैसलमेर(खुर्द) गावच्या लोकांच्या भाषेत सांगायचे तर 'गोरी चिट्टी(बाबू न्हवे!) फिरंग लडकी!' सरांनी जैसलमेरच्या(बुद्रुक) अकॅडमीमध्ये 'ऑल इंडिया ब्राईट स्टुडंट्स सर्च' या देशपातळीवर घेतल्या जाणार्या स्पर्धापरीक्षेची तयारी करण्यासाठी प्रवेश घेतला होता. तिथेच स्टुडंट्स एक्चेंज कार्यक्रमांतर्गत होमसायन्स शिकायला ब्रिटिश एलिझाबेथ आली होती. अकॅडमी जैसलमेर बुद्रुकात असली तरी गर्ल्स होस्टेल जैसलमेर खुर्द येथे होते. बॉइज होस्टेलही जैसलमेर खुर्दातच असल्याचे कुणाला अंधुकसे आठवे, पण ते प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगणारे मुलगे फार थोडे होते. सरदेखील लेडीज होस्टेलासमोरच्या मित्राच्या खोलीत पॅरासाईट या नात्याने राहत असत. रोज रात्री जागून अभ्यास करत असल्याने सरांना तेव्हा बाराच्या ठोक्याला चहा प्यायची सवय लागली होती. एकेदिवशी अचानक लाईट गेल्याने सर चहा प्यायला ११.४५लाच बाहेर पडले. चंद्राचे पांढरेशुभ्र चांदणे पडले होते. वाळवंटावरून येणार्या वार्याच्या झुळका मनाला आल्हाद देत होत्या. तेवढ्यात लेडीज होस्टेलाकडून येणार्या झुळकांमध्ये हजार गुलाबांचा सुगंध मिसळला असावा असे सरांना वाटले. त्यांनी लेडीज होस्टेलाच्या दाराकडे बघितले. चंद्रप्रकाशात जणू चमकत असावी अशी एलिझाबेथ हळुवार पावले टाकत चहाच्या टपरीकडे येत होती. अचानक मेपलची पाने इतस्ततः उडू लागली. तिच्या पायांतल्या पैजणांचा रुणझुण आवाज आसमंत व्यापून उरला. "एक स्पेशल चाय देना भैया.. जल्दी!" त्या परिस्थितीतही सरांचे प्रसंगावधान जागृत होते.
ती जवळ येताच सरांनी चहाचा कप अलगद तिच्यापुढे धरला. मंद हसून तिने तो घेताना सरांच्या बोटांना तिच्या नाजूक बोटांचा स्पर्श झाला. सरांचे भान हरपले. अकॅडमी, जैसलमेर, एआयबीएसएसची परीक्षा सगळ्या जाणिवा नष्ट झाल्या. ********************************* ********************* ***************************** ******************************** **************************************** **************** ***************************
"तू कुठल्या वर्गात आहेस?" कत्रिना कैफच्या पद्धतीने बोललेल्या तिच्या वाक्याने सर भूतलावर परतले.
"अकॅडमी... एआयबीएसएस..." सरांनी आठवले तेवढे शब्द उच्चारले.
"मी होमसायन्सला आहे अकॅडमीत. माझा एकटीचा अभ्यास होत नाही पण.. तू कधीकधी माझ्याबरोबर अभ्यास करशील?"
... अखेर वीकेंडाच्या रात्री जैसलमेराजवळच्या वाळवंटात भेटायचे ठरले. पौर्णिमेची रात्र होती. वाळवंटातल्या वाळूवर पूर्णचंद्राचे चांदणे पसरले होते. सरांनी तिला मग मेसोपोटेमियन, इजिप्शियन संस्कृतींविषयी सांगितले. मग भौतिकशास्त्राचा विषय निघाला. सरांनी तिला न्यूटनाबद्दल सांगितले. पुढे गणिताबद्दल ते तिच्याशी बोलू लागले. अशी त्यांची बरीच वैषयिक (म्हणजे वेगवेगळ्या विषयांवर... डर्टी माइंड्स!) चर्चा झाली. मग विषय बॉलीवूडपटांकडे वळला. एलिझाबेथ हिंदी सिनेम्यांची चाहती होती. सरांनी तिला सात फेरे, करवा चौथ, नायक नायिका एकटेच वादळात वगैरे सापडलेले असताना रिकाम्या घराचे व शेकोटीचे महत्त्व वगैरे बर्याच गोष्टी तपशीलवार समजावून सांगितल्या. वाळवंटात थंडी आता वाढत चालली होती. एलिझाबेथचे लक्ष अचानक समोरच्या शेकोटीकडे गेले. ********************* ************************* *********************************** ****************************************** ************************************* वाळवंटातल्या या घडामोडींवर बेतलेली पटकथा नंतर 'नन्हे(:-P) जैसलमेर' सिनेम्यासाठी वापरली गेली.
दुसर्या दिवशी लाल पंजाबी ड्रेस घातलेली एलिझाबेथ लाजत लाजत सरांना भेटायला आली. सरांना तिच्या मनातले लगेच कळले. पण सरांचे ध्येय वेगळे होते. केतकीप्रकरणामुळे सुरू झालेला भौतिकशास्त्राचा अभ्यासही अजून अपूर्ण होता. आत्ताच एलिझाबेथनामे बेडीत गुंतून पडणे शहाणपणाचे नव्हते.
"कोण तू?" सरांच्या प्रश्नाने ती चमकली.
"एलिझाबेथ..."
"एलिजा.. बात... का? ससुरा नाम लो तो जबान टेढी हो जाई..." ऐनवेळी सरांच्या मदतीला बॉलीवूड धावून आले. तिला काय ते उमगले.
"इट्स एलिझाबेथ! एलिझाबेथ!! यू घाटी!" असे म्हणून ती गर्रकन वळली आणि निघून गेली. तिची आठवण म्हणून सरांनी 'यू घाटीज्!' हे विशेषण आपल्या शब्दसंग्रहात कायमचे सामावून घेतले.
याना
एआयबीएसएसची परीक्षा संपवून सर परीक्षेचा आणि अभ्यासाचा शीण घालवायला मित्रांबरोबर गोव्यात आले होते. गोव्यातल्या त्या प्रसिद्ध रिझॉर्टामध्ये खाणे, पिणे, पार्टीला जाणे वगैरे करण्यात सरांची सुट्टी आनंदात चालली होती. त्यातल्याच एका शनिवारची ती सुरम्य सकाळ. सर सकाळीच तयार होऊन मित्रांची वाट बघत स्वागतकक्षात उभे होते. आणि हाय! अघटित घडले. एक मधमाशी कुठूनशी आली आणि सरांना कडकडून चावली. सरांनी वेदनेने किंकाळी फोडली आणि काउंटरापाशी उभे राहून चेक-इन करणार्या तिने मागे वळून पाहिले. सरांच्या किंचाळीचे कारण लक्षात येताच ती धावतच सरांपाशी आली आणि तिने बॅगेतून मलमाची ट्यूब काढून सरांच्या बोटावर पिळली. सरांच्या वेदना एका क्षणात थांबल्या. तिने मधमाशीला बोलावले. तिचे चेक प्रजासत्ताकात मधमाशी पालन केंद्र होते आणि ही मधमाशी 'मधुलक्ष्मी' तिची लाडकी, पाळीव माशी होती. मधमाशीकडून सरांना चावल्याबद्दल 'सॉरी' वदवून घेतल्यावर ती हळूच वळली व आपल्या खोलीकडे चालू लागली. पण या सर्व घडामोडींत तिचे नाव विचारायचेच राहून गेले होते. सर पळतच काउंटरावर गेले व त्यांनी तिचे नाव बघितले. ते वाचताच त्यांना गावेसे वाटू लागले:
'ओ जाना न जाना कि मै हू तेरा दीवाना...
जहां भी तू जाये तेरे पीछे आये, ये तेरा आशिक पुराना...'
अख्ख्या गाण्यातला 'जाना' हा एकच शब्द तिला कळला व सर तिचे नाव स्पेलिंगनुसार उच्चारत आहेत हेही कळले. सरांच्या दिशेने गोड हसू फेकीत ती म्हणाली, "याना!" तिचे रजनीभक्त असणे (मधमाशीच्या मधुलक्ष्मी नावावरून सरांनी ते केव्हाच ताडले होते!) आणि तिच्या-सरांच्या भाषेतला हा एक सामायिक शब्द, या दोन गोष्टी सरांना तिचे 'आमंत्रण' स्वीकारण्यासाठी पुरेशा होत्या. ************ ************** ************** ************************ ***************** ************* **************** ********************** केव्हातरी शनिवारी रात्री सरांच्या मनात विचार आला, 'हिला इंग्लिश तरी येत असेल काय?' त्यांनी तिला इंग्रजीत म्हटले, "तू आणि मी... जसे माग्दबुर्कचे अर्धगोल. कुणालाही विलग न करता येण्याजोगे." तिच्या निळसर डोळ्यांत उमटलेली अनेक प्रश्नचिन्हे पाहून इंग्रजी किंवा भौतिकशास्त्र या दोहोंचाही तिला गंध नाही, हे सरांनी एका क्षणात ताडले आणि मग पुन्हा त्यांनी शब्दांचा वापर केला नाही. ***** ************ *********** ************* ****************** ***************** रविवारी संध्याकाळी सरांनी एकट्यानेच घरी परत जाण्यासाठी रिझॉर्टातून चेक-आऊट केले तेव्हा त्या वीकेंडात त्यांनी शिकवलेल्या त्या एकाच वाक्याचा अर्थ तिला लख्ख उमगला होता, 'मै उल्लू की पट्ठी हूं.."
स्वेतलाना
स्वेतलाना सरांना भेटली तेव्हा रशियात पेरेस्त्रोयका आणि ग्लासनोस्त धोरणांचे वारे वाहत होते. त्या धोरणांना अनुसरून स्वेतलाना त्या काळात आपल्या प्रत्येक गोष्टीत संपूर्ण पारदर्शकता पाळत होती. सरकारने जाहीर केलेली धोरणे संपूर्णपणे आचरणात आणणार्या तत्त्वनिष्ठ स्वेतलानेकडे सर आकृष्ट झाले नसते तरच नवल! स्वेतलानेनेही पेरेस्त्रोयका धोरणानुसार या 'परकीय गुंतवणुकीला' हिरवा कंदील दाखवला. तिचा पारदर्शक स्वभाव, तिचे पारदर्शक विचार, तिचे पारदर्शक ********************** ************** *********** ***************** ***************** ***************** ********************************************** ************ ********************* ******************* ******************************* सर तिला 'रशियन मस्तानी' म्हणत असत. कारण पारदर्शकतेमुळे तिच्याही गळ्यातून पान खाली जाताना दिसे. सरांसोबत असतानाच्या काळात स्वेतलानेने आपले मूळ नाव बदलून 'स्वेतलाना आर. भाट' असे नाव लावायला सुरुवात केली. तर सरांनी रशियन भाषेत 'स्वेतलाना' असे आपल्या डाव्या मनगटाजवळ गोंदून घेतले. आपल्याला परिचयाच्या असलेल्या अनेक रशियन लोकांप्रमाणे स्वेतलाना हीदेखील एक लेखिका होती. लेखन हा तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. तर सरांची विचारधारा तेव्हा 'थियरी कमी, प्रॅक्टिकल जास्त' अशी होती. भिन्न मतप्रवाहांमुळे ते दोघे वेगळे झाले तरी 'नातिसरामि' हे चरित्र सरांनी तिच्याच हाती घडवायला दिले.
प्रियंका
खाली घरंगळलेली वस्त्रे सावरताना तिची चाललेली धडपड बघून सरांच्या कपाळावर आठी उमटली, क्षणभरच. गुरुत्वाकर्षणाचा साधा नियमही कळू नये हिला, छे! अजून किती वेळ वाट बघायला लावणार आहेस प्रियंके? तुझ्या सात खुनांसाठी थांबलो. सात जन्मांसाठी नको थांबवूस. याच विचारात असताना लक्षात आलं की हातातली चैतन्यकांडी संपलीये. पुढचीची शोधाशोध करताना खिशात तिच्याच आठवणीने जपून ठेवलेलं दोस्तानाचं तिकीट सापडलं. तेव्हाच पहिल्या नजरेत *********** *********** ********************************** ********************************* *******
नजर वळवून सरांनी तिच्याकडे पाहिले. ती आधी वाळत घालताना घरंगळलेली वस्त्रे पुन्हा झटकून दोरीवर वाळत घालत होती.
टीपः प्रक्षोभक उल्लेखांकरता नेहमीप्रमाणे * वापरले आहेत.
***
नातिसरामि
स्वेतलाना आर. भाट
आर्किमिडीज पब्लिकेशन्स प्रा. लि.
पृष्ठसंख्या - ४९०
किंमत - रुपये ७५० (खरेतर अमूल्य!)
***
टंकलेखन साहाय्य - अनीशा
***
वाट बघतोय....
वाट बघतोय....
मी पयली तुलापण क्रमश:चा किडा
मी पयली
तुलापण क्रमश:चा किडा चावला का??
श्र भारी आहे. फ ची कला का
श्र भारी आहे. फ ची कला का तुझी? लंगडीवाले वाक्य फारच पुसट आल आहे.
अरेच्च्या चिनुक्षाचे वाचलेच नव्हते मी.
मला ते लंगडीचं पटकन लुगडी
मला ते लंगडीचं पटकन लुगडी वाचलं जातंय.
टाका लौकरच
टाका लौकरच
हृदयात घुसलेल्या बाणांमुळे
हृदयात घुसलेल्या बाणांमुळे हृदय पुढूनच काय, मागूनही घायाळ झालेलं दिसतंय. आणि त्या घुसलेल्या बाणांवर कोणीतरी आपला अंगठा उमटवून शिक्कामोर्तब केलेलं दिसतंय. मागचे ओघळ सुकलेत, पुढचे ताजे आहेत. एका बाणानंतर तर काहीच ओघळ नाहियेत, तोपर्यंत हृदयाला बाण घुसण्याची सवय झाली असावी बहुतेक...
अयाया! किती ठिकाणी हृदयाला
अयाया! किती ठिकाणी हृदयाला टोचण्या, टाचण्या लागल्यात त्या! पार विदीर्ण झालंय बिचारं.
हाताचा पंजा दिसला, अंगठ्याची निशाणी दिसली. पण ओठांचा ओझरताही ट्रेस नाही कुठे?? त्च त्च!
हृदय बघुन मला स्ट्रॉबेरी
हृदय बघुन मला स्ट्रॉबेरी फ्लेवरच्या वॅफल्सची आठवण झाली.,, खायची इच्छा झाली (लंच टाईम मध्ये काहीही खावेसे वाटते)
सध्य तरी तीनच तीर दिसतायेत..
सध्य तरी तीनच तीर दिसतायेत.. म्हणजे तीनच खून माफ झालेले दिसतायेत..
जबरी जाहिरात आहे!!! ते हृदय
जबरी जाहिरात आहे!!! ते हृदय मला स्ट्रॉबेरीसारखे न वाटता पुठ्ठ्याचा कापलेला बदाम सदृश दिसतंय! आणि तीनच बाण का? का? का?
मैं उल्लू की पठ्ठी हूँ हे वाक्य मी ''मैं उल्लू की पट्टी हूँ'' असे वाचले!!! (उद्गारचिन्हांची संख्या क्रिप्या नोट करावी!!) सह्ही मांडणी व जाहिरात
प्रकाशित होण्याआधीच सगळ्या
प्रकाशित होण्याआधीच सगळ्या प्रती संपणार असं दिसतंय.
ते बाण नसून तीन धाग्यांनी
ते बाण नसून तीन धाग्यांनी करायचे भरतकाम आहे.. पण पहिल्याच टाक्याला वरती गेलेले धागे वरतीच अडकलेत....
माताजी आता कादंबरी टाका!!
पैला प्रतिसाद कोण देणार ?
पैला प्रतिसाद कोण देणार ?
श्रध्दा, हे टंकलिखित करायची
श्रध्दा, हे टंकलिखित करायची अनमोल संधी दिल्याबद्दल अनेकानेक आभार! झाले बहु, होतील बहु, पण सरांसम एकही नाही! कालच संपूर्ण कादंबरी एका बैठकीत वाचून काढली. अजिबात निराशा झाली नाही.
श्रद्धा!! यू आर ब्रिलियन्ट!!!
श्रद्धा!! यू आर ब्रिलियन्ट!!!
सह्ह्ह्ह्ह्ह्ह्ही ...........
सह्ह्ह्ह्ह्ह्ह्ही ...........
त्यामुळे त्यांच्या जीवनवेलीवर
त्यामुळे त्यांच्या जीवनवेलीवर तेव्हा पहिले अय्यापुष्प फुलले नाही.>>>>
तू आणि मी... जसे माग्दबुर्कचे अर्धगोल.>>>
ज ब री!!!
श्रमाता _/\_
श्रमाता _/\_
भारी!!!
भारी!!!
सरांचा एकेक इतरांच्या '२४'
सरांचा एकेक इतरांच्या '२४' च्या बरोबरीचा आहे!!!!!
जबरी. स्वेतलानाचे वर्णन व तो
जबरी. स्वेतलानाचे वर्णन व तो परिच्छेद म्हणजे कहर आहे.
मुंग ली नको पाण्यात बुडवू,
मुंग ली
नको पाण्यात बुडवू, तुझे खडिसाखरेचे पाय
नको ओठात दडवू गोड दुधावरची साय..
पण मुंग ली पर्यत सरांचे शब्द पोहोचलेच नाहीत. हट्टाने तिने वर्षानूवर्ष लाकडाच्या घट्ट बुटात बांधून छोटे केलेले आपले इवले इवले पाय काढले आणि बदकन पाण्यात बुचकाळले. जागतिक महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर दिसलेलं हे स्त्रीत्वाचं (का स्त्रैणित्वाचं ?) आगळं रूप सरांना खूप काही सांगून गेलं.
***************
काय म्हणू तुला मुंग ली? जगा साठी असशील तू मुंग ली पण माझ्यासाठी
तमीळमधली एरंपू की
हिब्रूमधली नेमाला
ग्रीक मधली मिर्मिगी
का हंगेरियन मधली हंग्या
जाऊ दे विकीपिडीयाचं ॠण नंतर कधी तरी फेडतो. आता तू माझ्यासाठी फक्त मराठीतली....
.........................................
पण ती केंव्हाच निघून गेली होती. उगीच कुणाच्या विचारपूशीत ५८ व्या पानावर गेल्यावर यावेत तसे दुरुन शब्द आले.
....... उडाली आकाशी | तिने गिळले सूर्यासी ॥ थोर नवलाव झाला । वांझे पुत्र प्रसवला ॥
जिंग नो ! (अर्थात आमेन)
(माते मला क्षमा कर. मी काय करतोय याची मला कल्पना आहे. Imitation is best form of Flattery असं खुद्दं सर म्हणून गेले आहेत.)
पण कंस अकेला जास्त प्रक्षोभक
पण कंस अकेला जास्त प्रक्षोभक होतं
लै भारी
लै भारी
श्र.... सहीच...
श्र.... सहीच...
श्रमाता _/\_
श्रमाता _/\_
लै. भारी....
लै. भारी....
वा.सहीच. मुखपृष्ठ
वा.सहीच.
मुखपृष्ठ आवडले.कादंबरी वाचायची इच्छा आहे.
कृपया मागणी यादीत माझे नाव नोंदवा. अमूल्य मूल्य भरायला तयार आहे.
सुसाट सुटलीयेस की गं ....
सुसाट सुटलीयेस की गं .... बाकी सरांचा कर्तृत्वच तसं आहे म्हणा.
काळ काम वेगाच्या गणितांवरचा जो अध्याय 'नातीसरामी' मध्ये आहे त्यातला छोटासा परिच्छेद इथे देता आला असता तर मजा आली असती.
सरांच्या रंगीन आयुष्यावर
सरांच्या रंगीन आयुष्यावर आधारीत पुस्तकाचं तितकंच रंगीबेरंगी(तेही रंगीबेरंगी पानावर) रसग्रहण केल्याबद्दल आभार!
सिनेमा पाहायला जाताना रांगेच्या टोकाकडच्या खुर्च्या निवडणार्या चतुर स्त्रियाच सरांच्या जीवनात कायम आल्या.>>> कायच्या काय आवडली ही लाईन.
Pages