सासुबाई एक्सचेंज (भाग - २)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 March, 2011 - 05:40

सासुबाई एक्सचेंज (भाग - १) : http://www.maayboli.com/node/24032
----------------------------------------------------------------------------------
अँकर - तर मंडळी दोन्ही कडच्या सासुबाई एक्सचेंज व्हायला तयार झाल्या आहेत. तर आपण पाहूया ह्या दोन सासु सुना कस एकमेकिंशी पटवुन घेतात ते. तर आधी पाहूया मॉडर्न सासुबाई आणि मॉडर्न सुनबाई
------------------------------------------------------------------------------------
सुन - अग बाई माझी निघायची वेळ झाली. अजुन कशी येत नाही ही सखु ? घरात सगळा कामांचा पसारा पडलाय. (सासु निघुन येते) आई बर झाल आलात. जरा सोनु उठली की तिची अंघोळ घालुन नाश्ता देउन तिला शाळेत पाठवा. मी निघते.

सासु - अग मी पण निघालेय. आज माझं महीला मंडळाच शिबीर आहे. तिथे जाण मला गरजेच आहे. मी प्रेसिडेंट आहे महिला मंडळाची. एक काम कर आज सोनुला शाळेतच नको पाठवु. सखु येईल इतक्यात तिला सांगते सोनूच सगळ करायला.

सुन - ईईईईईई सखु, नको नको. मला नाही आवडत सोनुच तिने काही केलेल, धुणी भांडी करण्यापर्यंतच ठिक आहे ती आणि तुमच्या शिबिरासाठी मी सोनुची शाळा बुडवु ? मलाही जाण गरजेच आहे हो आज. मी आमच्या ऑफिसच्या महिला दिनाच्या कार्यक्रमाचे संचालन करणार आहे.

सासु - अग पण मी रोजच बाहेर जाते. कधी किटी पार्टी, कधी भिशी पार्टी, कुणाकडे समारंभ, कुणाच्या घरचे प्रॉब्लेम सोडावायला मला जावच लागत.

सुन - आणि घरच्या प्रॉब्लेमच काय ? घराच, मुलाबाळांच काय ?

सासु - ते पाहण घरच्या सुनेच काम असत. माझी सुनच पहायची ते सगळ. घरच्या कामाची, मुला नातवंडांची मला काही काळजी करावी लागत नव्हती. सखु कडून घर अगदी चकचकीत करुन घ्यायची.

सुन - हो ना? माझ्यापण सासुबाईच कुरकुरत का होईना पण पहायच्या सोनुच सगळ. मी अगदी बिनधास्तपणे जायचे त्यांच्यावर सोनुच सोपवुन. शिवाय त्या सखुबाईकडुन कामही करुन घ्यायच्या.

सासु - हो ना मग जा ना तुझ्या त्या देवभोळ्या सासुकडे. नुसती दिवसभर देव देव करत असते.

सुन - हे बघा माझ्या सासुबाईंबद्दल काही बोलायच नाही. देव देव करत असल्या तरी सगळ घर सांभाळतात त्या. तुमच्यासारख्या उनाडक्या करायला म.मंडळात नाही हो जात. आणि तुमची ती सुन तरी काय हो ? ती पण घरात पोथ्याच वाचत बसते ना ? गवंढळ कुठली.

सासु - ए तोंड सांभाळून बोल. कशीही असली तरि माझी सुन आहे. ती आज घरात पोथ्या वाचत बसते म्हणूनच मी बिनधास्त तिच्या भरवश्यावर समाजकार्य करु शकते. आणि ती तुझ्यापेक्षा नक्कीच चांगली आहे. उद्धट नाही तुझ्यासारखी सतत बिचारी माझे आशिर्वाद घेत असते.

सुन - हो ना ? मग जा ना तुमच्याच सुने कडे. मला माझ्याच देवभोळ्या सासुबाई पाहीजेत. हू.....

सासु - तु पण घेउन बस तुझ्याच सासुला. मला पण माझीच भोळी सुन पाहीजे हू..... (दोघिही एकमेकिंना पाय आपटून बोट मोडून जातात)
------------------------------------------------------------------------------------
अँकर - अरे बापरे हे काय आम्हाला वाटल ह्या घरात एकमेकिंना न पटवुन घेणार्‍या सासवा सुना एक्सचेंज करुन गोडी गुलाबीने नांदतील. पण ह्या दोन्ही मॉडर्न शेवटी त्यांचे विचार मॉडर्न म्हणून कदाचित जमल नसेल. पण काही काळजी करु नका आता आपण दुसर्‍या देवभोळ्या जोडीकडे वळूया आणि पाहुयाच ह्यांचे सुर किती जुळताहेत ते. लाईट, अ‍ॅक्शन कॅमेरा स्टार्ट
-----------------------------------------------------------------------------------
देवभोळी सासु आणि देवभोळी सुन :

सुन - पुजा करत बसलेली असते. (भिमरुपी, महारुद्रा, वज्रहनुमान मारुती)

सासु - अग तु कशी बसलीस पुजेला ? ही तर माझी वेळ आहे पुजेची !

सुन - (सासुला पाया पडते, सासु आशिर्वाद देते) माझीपण हिच वेळ आहे पुजेची (भोळ्या नजरेने)

सासु - बरं आपण अस करु दोघी पण पुजा करु.

सासु सुना दोघी पुजेला बसतात. सुनेच भिमरुपी महारुद्रा तर सासुच गणपती स्तोत्र असा एकच गजर दोघी करतात. (दोघिंचा नुसता स्तोत्रांचा गोंगाट चालू होतो).

सासु - बास बास. चल आता झाल ना तुझ जा आणि घर आवरुन जरा जेवणाच बघ.

सुन - आहो सासुबाई एवढ्या लवकर कशी होईल माझी पुजा ? अजुन मला अथर्वशिर्ष, रामरक्षा, हनुमान चालीसा, गुरु चरित्र, साईबाबांचा अध्याय, नवनाथांचा अध्याय, शिवलिलामृत अध्याय वाचायचा आहे. शिवाय आज शनिवार. मला शनिमहात्म्यपण वाचायच आहे. हे सगळ वाचता वाचता मला दुपार होईलच .

सासु - अरे देवा मग घरातल्या कामांच जेवणाच काय?

सुन - का ? सखु आहे ना त्यासाठी. आणि तुमच्याकडे जेवणाला बाई नाही ? आमच्या सासुबाईंनी घरात प्रत्येक कामासाठी बाई ठेवली आहे. त्यांना घरातल्या बायकांनी राबलेल मुळीच आवडत नाही.

सासु - अग पण सखु म्हणत होती की तुला कामाची खुप आवड आहे म्हणून. तुला घरातल सगळ करायला आवडत म्हणुन मी सखुला येऊ नको सांगितल.

सुन - अरे भगवंता! हे काय संकट आणलस तु माझ्यावर ? आता कोणत स्तोत्र म्हणू मी ? मला माहीत होत, माझ्या सासुबाई स्वतःच्या स्टेटससाठी का होईना पण मला आजिबात काम करु द्यायच्या नाहीत.
मला नाही हो सवय आता कामाची.

सासु - अरे देवा, मग आता पोटापाण्याच काय करायच ?

सुन : (टिचकी मारुन) आयडीया आज आपण पार्सल आणुया. माझ्या सासुबाई सखु आली नाही की पार्सलच आणायच्या.

सासु - काय??? पार्सल ! आता ह्या वयात तु मला पार्सलवर पोसणार ? अग सहन होत नाही मला ते बाहेरच सोडा मारलेल जेवण. देवा वाचव रे बाबा.

सुन - सासु बाई तुम्ही काही काळजी करु नका तुमच्या पोटाची. तुमच पोट चांगल रहाव ह्यासाठी मी सिद्धिविनायकाला साकड घालीन, महालक्ष्मीची खणानारळानं ओटी भरीन.

सासु - अरे देवा त्यापेक्षा माझी ती मॉडर्न सुनच बरी होती. कामावर जात असली तरी जायच्या आधी सगळी घर आवरुन जेवण उरकुन जायची. मला काही काळजी नसायची मुलांच्या आणि माझ्या खाण्यापिण्याची. जरा तोंडाने असली तरी माझी काळजी पण घ्यायची हो.

सुन - मलाही माझ्या सासुबाईंची आठवण येतेय. मॉडर्न होत्या पण मला फुलासारख जपायच्या. अगदी काही करु देत नव्हत्या मला. मी त्यांना त्यांच्या महिला मंडळावरुन उगाच बोलायचे. मला आता कळल, तुमच्या सारख्या जर जाच करण्यार्‍या सासवा असतील तर त्यांच्यावर कारवाई करुन त्या खरच पुण्य कमवतात.

सासु - काय म्हणालीस ? जा ना मग तुझ्या त्या नखरेल सासुकडे.

सुन - हे बघा माझ्या सासुबाईंना नावं नाही ठेवायची, सांगुन ठेवते. त्यापेक्षा तुमची ती खट्याळ सुन बघा.

सासु - हो ना, मला नको ते बक्षिस बिक्षिस मला माझी सुनच पाहीजे. हू...

सुन - मला पण माझ्या आईच पाहीजेत हू...
-------------------------------------------------------------
अँकर - बापरे हे काय करायला गेलो आणि काय झाल ? इथे तर वैद्य - पाटणकर काढाच झाला आहे.

सखु - जोर का झटका हाय जोरोसे लगा... अव टिवीवाल तुमी या सासु-सुनांच्या भानगडीत पडू नका. अव समद्या घरच पानी चोखलय मी. घरात कितिबी एकमेकांशी भांडल्या तरी लई पिरिम असते त्यांच एकमेकावर. एकमेकांबिगर करमत नाय त्यांना. अव भांडाया बी त्यांना आपआपल्याच सुना लागत्यात.

अँकर - तर मंडळी आता आपण जाणून घेउया दोन्ही सासुबाइंचे मत.

मॉडर्न सासु, देवभोळी सुन दोघीही माईक ओढतात आणि एकमेकिंच्या सुनांच्या कंप्लेंट करतात. देवभोळी सुन येते आणि अँकरच्या पाया पडते, प्रेक्षकांना पाया पडते, कामवाली बाजुला असते हे तिला कळत नाही तिच्याही पाया पडते आणि बघुन इइइइइ करते. मग स्वतःची सासु तिला ओढायला जाते तेंव्हा तिच्या पाया पडून देवभोळ्या सासुची कंप्लेंट करते. ह्या सगळ्या गोंधळात अँकर बावरते आणि एकदाच ओरडते.
शटाप.
तर मंडळी हा कार्यक्रम आता मी इथेच थांबवते. आणि हाच कार्यक्रम आम्ही पुढच्या महिलादिनी, ह्याच वेळी, हयाच ठिकाणी घेउन येणार आहोत, ज्याच नाव आहे सासुबाई ....... (दोन्ही सुना अँकरच्या तोंडावर हात ठेवतात आणि सगळ्या एकदाच ओरडतात) नो एक्सचेंज

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ताज छान जमली आहे जगुतै, Happy
कामात होतो जरा उशिरा वाचली !

वि.क. यात तुझा "श्री गणेशा" तर झालाच आहे आणखी काही असेच वाचायला आवडेल तुझ्याकडुन Happy

चातक, खारुताई, अश्विनी, नरेंद्र धन्यवाद.

हे नाटक वाचताना एवढी मजा येत नाही पण अ‍ॅक्टकरुन खुपच मजा येते.
मी ह्या नाटकात देवभोळ्या सुनेचा रोल केला होता. जेंव्हा जेंव्हा मी पाया पडायला वाकायचे तेंव्हा तेंव्हा हश्या उडायचा प्रेक्षकांत. जास्त कॉमेडी कामवाली आणि देवभोळ्या सुनेची आहे ह्यात.

धम्माल लिहीले आहेस तू ... घरकी मुर्गी दाल बराबर .... प्रत्येक सासूला ह्या एक्सचेंज मधून नेऊन आणले तर :):)

बघ ... अजुन एक नवीन विषय Happy

तु तयार आहेस का ? >> हो... पण एक्सचेंज साबा होणार ना? मला नाही वाटत त्या तयार होतील... त्यांना माहित आहे त्याच्या सुनेसारखी चांगली सुन शोधुन सापडणार नाही Wink

दिनेशदा, लाजो, मामी धन्स.
वर्षे माझ्या पण नाही ग तयार होणार साबा. जे तुझ्या साबांना वाटत तेच माझ्यापण साबांना वाटत.

वर्षा आणि जागु .... त्यांना तसे वाटायला पाहिजे असेच तर ह्या एक्सचेंज मधे सूनांनी वागायचे नाही का .... Happy Happy Happy

जागू, मस्तच लिहिलय ग.
जागू, लेखिका आणि अभिनेत्रीला शुभेच्छा.(आणखी काय काय आहे?)
अजुन सिडी नाही ग आली. आली की तुला मेलते.>>>मलापण.
असंच छान छान लिहीत जा. आणि आम्हाला हसवत जा. धन्यवाद.