अँकर - नमस्कार सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही आज तुमच्यासमोर नविन कार्यक्रम घेउन आलो आहोत ज्याचे नाव आहे सासुबाई एक्सचेंज. त्यासाठी आम्ही आज आलो आहे आदर्श सोसायटी मध्ये. येथिल दोन कुटुंबांची आम्ही पाहणी करुन निवड करणार आहोत व त्या दोन कुटुंबातील सासु-सुनांची आदला बदल करुन त्या कशा तर्हेने एकमेकिंना मॅनेज करतात हे एक महिना पाहुन त्यातील विजेत्या जोडीला आम्ही एक लाखाच बक्षिस देणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पाहणी करुया पाटणकर कुटुंबातील सासुसुनांची.
सासु (देवपुजा करत) - सर्वमंगल मांगल्ये ........
सुन - ह्यांचे ३३ कोटी देव खाली उतरले पण माझी एकुलती एक देवी कधी अवतरणार ?
सखुबाई - माय नेम इस शिला....
सुन - ये तुझ्याच प्रसन्न होण्याची वाट पाहत होते, म्हटल आज देवी कोपते की काय माझ्यावर, दांडी मारुन ? बस तुज्यासाठी नैवेद्य आणते.
सासु - काय ग सखू (ओरडून) कुठे होतीस एवढा वेळ आ ? नेहमीची आगलावायची काम करत असशील शेजार्यांकडे. रोज अस उशिरा येण खपणार नाही मला सांगुन ठेवते. कामावरुन काढून टाकेन तुला.
सुन - (सासुला बाजुला घेउन) आहो सासुबाई तिला कामावरुन काढलत तर घरातली धुणीभांडी तुम्ही करणार आहात का ?
सासु - तुझ्यासारखी तरणी ताठी होते तेंव्हा केल हो मी सगळ. माझा संसार कसा फुलासारखा सांभाळायचे मी. आता माझ्याच्यानी होत नाही ग बाई वयोमानानुसार. पण तु तर चांगली धडधाकट आहेस ना ?
सुन - तुमच्या बडबडण्याच नाही का हो वय झाल सासुबाई ? आणि मी नोकरी करते म्हटलं. पैसे कमवुन आणते ना घरात ? शिवाय कोणाच्या खाण्यापिण्याचे पण हाल नाही ना करत ? तुमच्या मुलाच्या दुप्पट कमवते मग मिच का एकटी करु काम ? तुमच्या मुलालाही लावायला सांगा ना हातभार थोडा घरच्या कामात.
सखुबाई - आहो ताईसाहेब तुम्ही कशाला घरच्या कामाच्या काळज्या करता ? तुम्ही कितीबी मला बंद करायच ठरविलत तरी मी बा न्हाय जायची. (हळू आवाजात - इथुन गेले तर मला आगी लावायला कशा मिळतिल)
सुन्-सासु - काय ???????
सुन - बर बर चल तु काम आवरायला घे. मी निघते.
सासु - अग निघतेस काय ? सोनुच दप्तर भरलस का ? त्याचा नाश्ता लावलास का ?
सुन - आहो सासुबाई ते पण मिच करु का ? आहो जरा वाढा ना तिला. दिवसभर ती देवपुजा करण्यापेक्षा थोडी नातवंडांची देखभाल केलीत तर जास्त पुण्य मिळेल.
सासु - ए तू जास्त तोंड चालवु नकोस. त्या देवाची मी भक्ती करते म्हणुन हे सगळ व्यवस्थित चाललय. तोच ह्या घराच्या पाठीशी खंबिरपणे उभा आहे. त्याच्याबद्दल बोललेल मी काही सहन करुन घेणार नाही.
सुन - हो का ? बर ! मग मी सोडते नोकरी. बघा तुमचा देव देतोय का पैसा घर चालवायला ?
सासु - शिव शिव शिव शिव तु जा बाई माझ्याच्याने आता हे ऐकवत पण नाही.
सुन - हु$$$$$$$
सखुबाई - आईसाहेब गेल्या ताइ ? बघा ना तुमच्याशी कशा वचावचा भांडत होत्या ? नाहितर त्या शेजारच्या पाटकर ताई कित्ती गुणी ? तुमच्यासारखिच देवभक्तीण ती आणि तिची सासु नुसती उनाडाटप्पी. तिला तुमच्यासारखी सासु पायजे होती म्हणजे घर कस गुण्यागोविंदाने नांदल असत. (काम करायला निघुन जाते). आईसाब खाली चॅनेलवाल आलंत सासुबाई एक्सचेंज म्हनुन कार्यक्रम हाय नव त्यात मी तुमच नाव देते आणि तुमच्यासाठी शेजारच्या वैद्य सुनबाईंच नाव टाकते. बगा तुम्हाला ताज मिळतो की नाय ते.
सासु - खरच ग बाई दे नाव टाकुन म्हणजे माझी कटकट जाईल आणि माझ्या सुनेलाही चांगली अद्दल घडेल.
सखुबाई - व्हय आईसाब आता देऊनच येते नाव शेजारच्या वैद्यसुनबाईंना इचारुन.
----------------------------------------
अँकर - अरे वा ह्या घरातील सकाळ खुपच दमदार झालेली दिसते. आता आपण वैद्य कुटुंबातील सासु-सुनांची पाहणी करुया.
सुन - (देवपुजा) साष्टांग नमन माझे गौरी पुत्रा विनायका....
सखुबाई - माय नेम इस शिला (नाचत येते) आई साहेब निघालात वाटत.
सासु - अरे वा राणिसरकार आल्या, या या. आज जरा उशिरच झाला माझ्या सोनुला, काम जास्त होत का शेजार्यांकडे ?
सखुबाई - नाही ओ आई साहेब ते काय झाल त्या शेजारच्या पाटणकर सासवा सुनांच सकाळच झेंगाट लागलेल त्यांचा समझोता करुन देताना जरा वेळ झाला.
सुन - सखुबाई आहो किती उशीर हा ? सगळी काम खोळंबलियत. अस करा उद्यापासुन तुम्ही येउच नका.
सखुबई - आता ग बया, बघितलत का आईसाहेब ?
सुन - अहो घरात भरपुर वेळ असतो माझ्याकडे. मी करत जाईन ना सगळ.
सासु - हे बघ अॅना मला हे आजिबात चालणार नाही. माझ्या स्टेटसला ते शोभत नाही. आजुबाजुचे लोक काय म्हणतील ? महिला मंडळाच्या प्रेसिडेंटची सुन घरात राबते ? कदापी नाही. अग आम्ही महिला मंडळाच्या बायका अशा अत्याचार करणार्या सासवांविरुद्ध मोर्चे काढतो. तोच मोर्चा उद्या माझ्या घरी येऊन तोंडात शेण घालुन जाईल माझ्या.
सखुबाई - हो ना वो आई साहेब.
सुन - आहो आई त्यात कसला आलाय अत्याचार ? घर सांभाळण हे प्रत्येक गृहीणीच कर्तव्यच आहे. आणि मला कि नाही घर सांभाळण, घरातल्या माणसांची सेवा करण्यात खुप धन्यता वाटते. (सासुच्या पाया पडते)
सासु - हो ना ? ८ दिवस करुन बघ सगळ काम. आल्यापासुन तशी वेळ आली नाही ना तुझ्यावर, म्हणून ही असली गिता मला पढवतेस. अग ती पोथी पुराण वाचण जरा कमी कर. सगळ्या बायका मला नाव ठेवतात, तुमची सुन म्हण्जे नुसती देवभोळी, किती जुन्या वळणाची आहे ? अग हसतात मला सगळ्या. हे सगळ सोड आणि आजपासुन माझ्या बरोबर क्लबमध्ये चल.
सखुबाई - अगदी बराबर आईसाब. ताई साब खरच तुम्ही पण जा आईसायबांबरोबर कलपात.
सुन - आई नका हो मला त्या नरकात नेउ.
सासु - काय म्हणालीस ?
सुन - हो आई माझ्यासाठी ते नरकच आहे. हे घरच माझ स्वर्ग आहे. माझ्या पतीची, मुलांची, तुमची सेवा करुन मी जे पुण्य मिळवते त्या पुण्यावरच मी जिवंत आहे (सासुच्या पाया पडते).
सासु - ए गप ग, पुण्य म्हणशील तर ते मी जास्त मिळवते तुझ्यापेक्षा. अग मी अबलांना सबला बनवते, त्यांचे अन्याय, अत्याचार दुर करते.
सखुबाई - अगदी बराबर. माज्याबी सासुला चांगली अद्दल घडवली होती आईसाहेबांनी.
सुन - नाही आई तुम्ही सगळ्यांचे शाप ओढावुन घत आहात. तुम्ही नवरा-बायको, सासु-सुनांमध्ये भांडण लावुन देता अस कळल आहे मला (कामवालीकडे नजर रोखुन). आई त्यापेक्षा भगवंताची सेवा करा, तुमच्या शेवटच्या दिवसात तोच तुम्हाला धावुन येईल.
सासु - अरे देवा आता ही मला मारायच्या आत मला इथुन निघायला हव. ए सखु तु आजिबात सोडायच नाही ग काम. माझ्या स्टेटसचा प्रश्न आहे. आमच्या घरची अब्रु आता तुझ्याच हातात आहे ग बाई
सुन - राम राम $$$$$$$$$$$$ करत आत जाते.
सखुबाई - पाहीलत आईसाहेब कशा तुमच्याशी वाद घालतात ताईसाहेब ? आहो त्यापेक्षा त्या पाटणकर ताई किती चांगल्या हायेत. अगदी तुमच्यासारख्याच मॉडरन. हापिसात पण जातात. अव त्या तुमच्या सुनबाई शोभल्या असत्या. तुम्ही एक काम करा त्या सासुबाई एक्सचेंज मध्ये मी तुमच नाव नोंदवते आणि तुम्हाला जोडीला पाटणकर सुनबाईंच नाव टाकते. बगा लाखभराच बक्षिस तुमालाच गावल.
सासु - खरच ग बाई दे नाव टाकुन म्हणजे माझी कटकट जाईल एक महिन्याची आणि माझ्या सुनेलाही चांगली अद्दल घडेल.
सखुबाई - व्हय आईसाब आता देऊनच येते.
क्रमश.....
.......................................................
वाहवा..... चांगली उत्सुकता
वाहवा..... चांगली उत्सुकता लागली.
बघू या अदलाबदल झाल्यावर काय होतं... ?
जागु, मस्त आहे....तुझ्या
जागु, मस्त आहे....तुझ्या माशांच्या रेसिपीसारखच्....पुढचा भाग लवकर येवु दे.
हे हे हे मस्त आहे हे. पुढचा
हे हे हे मस्त आहे हे. पुढचा भाग कधी?
डॉ. कैलास, सखी, मोनाली धन्स.
डॉ. कैलास, सखी, मोनाली धन्स. दुसरा भाग उद्या टाकण्याचा प्रयत्न करते.
पुढच्या भागाची प्रतिक्षा!!!
पुढच्या भागाची प्रतिक्षा!!!
वा जागू ! चटपटीत अगदी.
वा जागू ! चटपटीत अगदी.
झक्कास लिवलयस जागू. आता
झक्कास लिवलयस जागू. आता पुढे???? उत्सुकतेने वाट बघतेय......
मस्तच..... उत्सुकतेने वाट
मस्तच..... उत्सुकतेने वाट बघतेय..:)
मस्त तै,
मस्त तै,

मस्त!!! पुढे लवकर येउ द्यात.
मस्त!!! पुढे लवकर येउ द्यात.
मस्त लिहिलंयस.पुढचा भाग लवकर
मस्त लिहिलंयस.पुढचा भाग लवकर लवकर टाक.
म्हणजे मला जरा बर लिहिता येत
म्हणजे मला जरा बर लिहिता येत अस वाटायला लागल. ओके. मी उद्या लिहीते पुर्ण.
हे नाटक मी महिलादिनानिमित्त ऑफिसमध्ये सादर करण्यासाठी लिहीले आहे. ह्यात अजुन काही सुचवा.
मस्त मस्त मस्त!!!!!!!!!!!
मस्त मस्त मस्त!!!!!!!!!!!
अरे व्वा! सासुन स्वॅपिंग
अरे व्वा! सासुन स्वॅपिंग .......... पुलेशु
येऊ दे लवकर पुढला भाग!
येऊ दे लवकर पुढला भाग!
पुभाप्र!!!!
पुभाप्र!!!!
फुल टु धमाल!!!!!!!!!!!!!!
फुल टु धमाल!!!!!!!!!!!!!! पुढच्या भागाच्या प्रतिशेत........................
(No subject)
जागु मस्तच , तुझा उद्या कधी
जागु मस्तच , तुझा उद्या कधी उजाडणार आहे ?
अग माझा उद्या रोज उजाडतो पण
अग माझा उद्या रोज उजाडतो पण माझी ऑफिसमधली सासु (बॉसिण) मला राबवुन अत्याचार करते ना माझ्यावर त्यामुळे लिहायला वेळच नाही मिळत.
हे नाटक मी महिलादिनानिमित्त
हे नाटक मी महिलादिनानिमित्त ऑफिसमध्ये सादर करण्यासाठी लिहीले आहे
सॉल्लीड गं.. तुझी प्रतिभा आता सात घोड्यांच्या रथात बसुन धावतेय.... मस्त लिहिलेय्स....
बाकी पुढे काय होणार ते स्वप्ना_राज ला विचार... तिच्याकडे सास-बहु सिरीयल्स पाहण्याचा भरपुर अनुभव आहे, ती १० वेगवेगळे शेवट सुचवेल
मस्त जागु...पुढचा भाग लवकर
मस्त जागु...पुढचा भाग लवकर टाक
जागू छानच लिहीलयस गं. मी
जागू छानच लिहीलयस गं. मी आत्ताच वाचलं. क्षमस्व.
लय भारी!!!
लय भारी!!!
सही...... मस्त मजा येतेय
सही...... मस्त मजा येतेय
जागु, मस्त गं! अगं पण
जागु, मस्त गं! अगं पण अदलाबदली कधी करणार आहेस, वाट बघत आहेत सगळे.
मस्त लिहिलयस जागु , अगदी
मस्त लिहिलयस जागु , अगदी माशासारखचं खमंग बनव .
अरे मी दुसरा भाग टाकला आहे
अरे मी दुसरा भाग टाकला आहे बघा.