Submitted by मी_आर्या on 14 March, 2011 - 05:10
आताशा, जीवनाची गणितं नाही
मांडत बसत मी!
कारण, तुझी केवढी तक्रार
माझ्या व्यवहारशून्यतेबद्दलची!!
आठवत असेल तुला
कधीतरी रस्त्याने
जातांना झालेला
'पायथागोरसच्या सिद्धांता'वर
आपला वाद!
कर्ण वर्ग बरोबर बाजु वर्गांची बेरीज
हे माहित असुनही तुझी जवळच्या
रस्त्याने जाण्याची धडपड
आणि मग काळ, काम, वेगाचं
गणित मांडल्यावर होणारा वैताग
तशीच तुझी हातचं राखुन
बेरजा करण्याची सवय!!
हं! आता तुझ्यासारखं व्यावहारीक
नसेल होता येत मला....
पण तू - (वजा) मी = एक मोठ शुन्य
हे तरी मान्य करशील ना?
अवांतरः वर उल्लेखलेल्या पायथागोरसच्या सिद्धांताबद्दल खुप उहापोह झाला. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी:

इथे त्रिकोण हा फक्त काटकोन त्रिकोणच असतो. त्याचे प्रमेय असे:
काटकोन त्रिकोणाचा कर्ण वर्ग= काटकोन त्रिकोणाची एक बाजु वर्ग + काटकोन त्रिकोणाची दुसरी बाजु वर्ग.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
आर्या, तसं असेल तर मग
आर्या, तसं असेल तर मग का.का.क. मधून हलव ही कविता
चांगलं विश्लेषण केलंस आर्ये,
चांगलं विश्लेषण केलंस आर्ये, पण असा नाकाने घास का खातेस?
सरळ सरळ शब्द वापरायचे आणि कविता करायची की..
आर्या, सही कविता आहे. तुझे
आर्या, सही कविता आहे. तुझे विश्लेषण तर फार आवडले! शॉर्ट्कटचा रस्ता घेतांना पायथॅगोरसचा सिद्धांत नेहमी आठवतो मलाही...
छानच लिहितेस गं
चांगलं विश्लेषण केलंस आर्ये,
चांगलं विश्लेषण केलंस आर्ये, पण असा नाकाने घास का खातेस?
सरळ सरळ शब्द वापरायचे आणि कविता करायची की..
नाकने घास
उद्या अजुन एखाद विशेषन लावशील 
दक्षे कविता सरळ आहे तीला पटली म्हणुन कै च्या कै मध्ये टाकली
मी-तू=०० मी+तू=विश्व कैच्याकै
मी-तू=००

मी+तू=विश्व
कैच्याकै आहे हे!
मला गणित येत नाही म्हणून काय झालं?
उद्या तू-तू=मी म्हणशील!
छान आहे कविता.
छान आहे कविता.
नयने, कविता आवडली. आशय चांगला
नयने, कविता आवडली. आशय चांगला आहे. मला कैच्याकै वाटली नाही. चांगली 'कविता'च आहे
आवडली. ही काहीच्या काही
आवडली.
ही काहीच्या काही कविता नव्हे
आर्या, आशय खूप
आर्या, आशय खूप छान!!!
कवितेमध्ये शेवटी तू - (वजा) मी = एक मोठ शुन्य असं लिहावं लागल्यामुळे रसभंग झाल्यासारखा वाटला. काय म्हणायचं आहे ते स्पष्ट करण्यासाठी कंसाचा आधार गद्यामध्ये घेतला जातो, पद्यामध्ये तो नसावा...
असो.
फुल्या, आपण वेगळा गुणधर्म सांगता आहात. आर्याने पायथागोरसचे प्रमेय वापरले आहे.
सुंदर कविता. मला ही कैच्याकै
सुंदर कविता.
मला ही कैच्याकै नाही वाटत. कविताच वाटते.
"पण तू वजा मी बरोबर शुन्य" बरोबर आहे.
डोक्यावरुन गेली. पण बहुधा
डोक्यावरुन गेली. पण बहुधा चांगली असावी.
नको त्या गोष्टींवर का चर्चा
नको त्या गोष्टींवर का चर्चा चालुय?
पायथागोरसचा प्रमेय आहे
कर्ण वर्ग= बाजु वर्ग बेरीज
आणि त्रिकोणाचा कर्ण हा दोन बाजुच्या बेरजेपेक्षा कमीच असतो. फुल्या, बरोबर आहे. कोणत्याही त्रिकोणात दोन बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिस-या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते."
जवळच्या रस्त्याने जाऊ शकतो आपण कर्णावरुन जायचं ठरलं तर...
सरळ लांबी आणि वर्ग करुन आलेली लांबी यात गल्लत करु नका लोक्स...
भुमिति नाय तर भुमाति करुन
भुमिति नाय तर भुमाति करुन ताकली इते;पत्ती पेन्सिल रब्ब्द घेव्उन लिनारि तु प्यलिच.मि सुदा आत्आ ब्कोबा,कोब्राको,काकोबा वर लिवनार.
?????...... प्रतिसाद
?????...... प्रतिसाद देण्यापुर्वी थोडं भुमितिचं पुस्तक वाचुन घेतो...
उगीचंच नविन प्रमेयाचा शोध लागायला नको....
भुंगा, मी सुद्धा अजून टोटल लावायचा प्रयत्न करतोय........ कदिचा क्याल्क्युलेटर घेउन बसलोय....
कविता आवडली.. आशय छान आहे..!
कविता आवडली.. आशय छान आहे..! खराही आहे
पण .... पण ...
तू - (वजा) मी , ह्यातले दोन ऋण म्हणजे गणितात धन असे होते ना? म्हणजे तू - (वजा) मी = तू + मी.
नुसतं तू वजा मी चालेल की!
आर्या , छान आहे !!
आर्या , छान आहे !!
काय पण लोकं आहेत ? अरे ते
काय पण लोकं आहेत ? अरे ते कंसात वजा वाचकांना कळावे म्हणून लिहिले आहे. नसते लिहिले तर लोकांच्या कर्णावरून टॅन्जन्ट गेले असते.
छान!
छान!:)
हे आर्या मस्त आहे कविता.
हे आर्या मस्त आहे कविता. आवडली.आणि तू जे विष्लेशण केलयेस ना त्यामुळे तर झक्कास समजली. पण कैच्याकै मध्ये का टाकलीस?
Pages