वाळवंटातील गुलाब

Submitted by जिप्सी on 13 March, 2011 - 09:51

मध्यंतरी दिनेशदांसोबत राणीबागेत झालेल्या निसर्ग गटगच्या वेळी मायबोलीकर साधनाने ऍडेनियमचे रोप दिले होते (यालाच वाळवंटातील गुलाब असेही म्हणतात). अगदी आयफेल टॉवरसारख्या दिसणार्‍या या रोपाला एकही पान नव्हते :फिदी:. काहि दिवसानंतर त्याला छोटी छोटी पानं यायला लागली आणि लगेचच एक महिन्याच्या आत एक गुलाबीसर कळी दिसु लागली. शनिवारी या कळीचे फुलात रुपांतर झाले. त्याचीच हि एक चित्रझलक. Happy

याफुलांबाबतचा शलाका ठाकुर यांचा लोकसत्तामधील एक लेख ऍडेनियम

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७
थोडे पाणी शिंपडुन Happy
प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

गुलमोहर: 

प्रिय टवळ्या, त्या वाळवंटातल्या गुलाबावर तू अभिषेकाची संततधार ओततोयस का ? Happy

फोटू छानच्चैत सगळे. पण आधी ते रोप आयफेल टॉवरसारखं दिसत होतं म्हणालास ते काही खरं वाटत नैये. बादवे तू आयफेल टॉवर बघितलायस ना नक्की ? Proud

प्रतिसादाबद्दल धन्स Happy
प्रिय टवळ्या,>>>>>:फिदी:

बादवे तू आयफेल टॉवर बघितलायस ना नक्की ?>>>>अम्या, अरे खरंच एकही पान नसलेलं ते झाड "मला" तसंच दिसत होतं. Wink

हा घे एका प्रदर्शनात काढलेला एक फोटो. बोन्साय केल्यासारखा दिसतोय Happy

छान प्रगति टिपली आहेस.
हे झाड खरेच वाळवंटात उगवते. ओमान येमेन च्या बॉर्डरवर एक उंच पहाडावर मी याची अनेक झाडे बघितली आहेत .
सलालाह बीचजवळच हा उंच पहाड अहे, वर जाण्यासाठी खूप वळणे असलेला तरीही अगदी भक्कम असा रस्ता आहे. बीच वरुन सूर्यास्त बघितल्यावर गाडी भन्नाट पळवत आम्ही या पहाडावर गेलो होतो. तिथून चक्क सूर्य परत दिसला. पहाडाच्या खाली खोलवर आणि दूरवर पसरलेला अथांग सागर होता. आणि मागे याची झाडे. खोडे भरपुर जाड झालेली होती. एकही पान नव्हते पण फूले मात्र अगणित. आणि झाडेही भरपूर. अर्थात तिथे ती नैसर्गिकरित्याच उगवली होती. याच्या खोडात भरपुर पाणी साठवलेले असते.

अरे काय??? कसले भारी फोटू काढलेस बाबा...
एका कळीचे फुलात रुपांतर होतानाचा चित्रमय आलेख....फारच सुंदर....

रच्याकने - पाणी शिंपडलेस का ओतलेस???
१२, १२ मध्ये ते पाण्यात बुडवुन काढल्यासारखे वाटतेय. Happy

दिनेशदा, यो, आशु प्रतिसादाबद्दल धन्स Happy

रच्याकने - पाणी शिंपडलेस का ओतलेस???>>>>>आशु :-), ते फोटो पाणी स्प्रे करून काढले आहेत. Happy

जिप्स्या, सुंदर फोटो.. सुरुवाती पासुन शेवट पर्यंत.

ते फोटो पाणी स्प्रे करून काढले आहेत. >> Happy

योगेश तुझ्याकडच्या बाळाची मावशी माझ्याकडे आहे. सध्या तिला कळी लागायला सुरुवात होतेय. आणली तेंव्हा भरपुर फुलले होते झाड. मग शेंगाही आल्या. मी निसर्गाच्या गप्पांवर शेंगेचा फोटो टाकला आहे.

योगेश तुझ्याकडच्या बाळाची मावशी माझ्याकडे आहे. सध्या तिला कळी लागायला सुरुवात होतेय. आणली तेंव्हा भरपुर फुलले होते झाड. मग शेंगाही आल्या. मी निसर्गाच्या गप्पांवर शेंगेचा फोटो टाकला आहे.

श्री, दक्षिणा, माधव, विशाल, ललिता, चातक, जागू प्रतिसादाबद्दल धन्स Happy

कामं बिमं करतोस की नुसते फोटो काढतोस?>>>>दक्षे, फोटो काढुन कंटाळलो कि थोडं काम करतो पोटापाण्यासाठी Wink Happy

सध्या तिला कळी लागायला सुरुवात होतेय.>>>>मस्तच जागू Happy

जागु, पण याला शेंग येते का? माझ्याकडे हे रोप गेले २.५ वर्षे आहे. फुले येउन गेली २-३ वेळा, पण शेंगा कधीच आल्या नाहीत. मी जेव्हा नर्सरीमधे पाहिलं तेव्हा, बर्‍याच रोपांना फांद्या होत्या. माझ्या रोपाला आणल्यापासुन एकही नविन फांदी आली नाही. फुलं पण २-३ वेळा आणि ती पण १-२ फक्त. पानं पण नाहीत.

का बरं? दिनेशदा किंवा जिप्सी काही सांगु शकतील का, प्लीज?

मनिमाउ ते झाड सावलीत आहे का ? आणि ह्या झाडाला जास्त पाणी लागत नाही असे साधनाने सांगितले. साधनानी मला जेंव्हा झाड दिले तेंव्हाच त्याला दोन शेंगा होत्या. त्या सुकुन फुटल्या आणि त्यातुन म्हातार्‍या बाहेर पडल्या. त्यात बी असते असे साधनाने सांगितले. मी ते लावले पण अजुन उगवले नाही. कदाचित त्याला आमच्या गड्याने भरपुर पाणि घातले असावे.

जागु, हो सावलीत आहे. उन्हात ठेवु का? माझ्या एका टेरेसला फार कडक ऊन आहे, म्हणुन मी फुलांची झाडे सगळी सावलीवाल्या टेरेसमधे ठेवली आहेत.

त्याचे आधी बोन्सायसारखे दिसणारे खोडपण जरा बारीक झाले आहे. फार नाही, पण जरा वाटते मला असे. पाणी एक दिवसाआड घालते. मला नर्सरीवाल्याने सांगितले होते कि पाणी कमी आणि एक दिवसाआड घालायचे. ते एका छोट्या कुंडीत आहे, ते मोठ्या कुंडीमधे शिफ्ट करु का? आधी फार गोड दिसायचं. मी कोणी येणार असलं तर लिव्हिंग मधे सेंटर टेबलला ठेवुन चांगलाच शो ऑफ करायचे. बोन्साय लुक आहे ना म्हणुन. Happy आता बिचारं दिसतं ते. जरा मरेल झालं आहे, पण एका ठिकाणाहुन थोडी पानं येताहेत असं वाटतं.

सॉरी, मी भलत्याच ठिकाणी माझ्या चौकश्या चालु केल्या. धागा चुकलाच. Sad

आणि मी जिप्सीला विश पण नाही केलं. जिप्सी तुमचं रोप खुप बढियां आहे. इतकं पाणी नका स्प्रे करु. फुलं लवकर खराब होतात आणि कलर पण लवकर फेड होतो.

मनिमाऊ हे वाळवंटातले झाड आहे. अतिपाणी देऊन नाही चालणार. मी वर लिहिल्याप्रमाणे निसर्गात या झाडाला पाने फार कमी असतात. रोज नकोच पाणी द्यायला.

प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स Happy

इतकं पाणी नका स्प्रे करु. फुलं लवकर खराब होतात आणि कलर पण लवकर फेड होतो.>>>>>जास्त पाणी नाही घालत रोपाला. साधनाने सांगितलंय, पण फोटो काढायचे होते म्हणुन थोडासा make-up Wink

Pages