नव्या यमांची नवीन भाषा

Submitted by अभय आर्वीकर on 12 March, 2011 - 22:09

नव्या यमांची नवीन भाषा

मला कळाली पुन्हा नव्याने, नव्या पिकांची नवीन भाषा
कठीण मातीत रूजणार्‍या, नव्या बियांची नवीन भाषा

पुन्हा नव्याने नवीन फुटली, अबोलतेला नवीन वाचा
नवीन दृष्टी, नवे इरादे, निरक्षरांची नवीन भाषा

नभात झेपावण्यास देती, ढगांस टक्कर, विजेस चटके
नवीन किलबिल, नवीन कुजबुज, नव्या पिलांची नवीन भाषा

नशीब आहे विचित्र मोठे, कुणास रुजण्यास खडक-धोंडे
कठोर पाषाण भेदणार्‍या, नव्या मुळांची नवीन भाषा

अता मुखातून शोषितांच्या, ज्वलंत हुंकार बोलताहे
नवीन शस्त्रे, नव्या मशाली, अहिंसकांची नवीन भाषा

कुणास बाहूत घेत मृत्यू, विभागतो देह चिंधड्यांनी
यमास थोडी दया न उरली, नव्या यमांची नवीन भाषा

श्रमास मातीत गाडण्याला, नव्या दमाचा विरोध आहे
नवीन शाई, नवे मनसुबे, अभय जनांची नवीन भाषा

गंगाधर मुटे
.........................................................................

गुलमोहर: 

अता मुखातून शोषितांच्या, ज्वलंत हुंकार बोलताहे
नवीन शस्त्रे, नव्या मशाली, अहिंसकांची नवीन भाषा

कुणास बाहूत घेत मृत्यू, विभागतो देह चिंधड्यांनी
यमास थोडी दया न उरली, नव्या यमांची नवीन भाषा (*)

श्रमास मातीत गाडण्याला, नव्या दमाचा विरोध आहे
नवीन शाई, नवे मनसुबे, अभय जनांची नवीन भाषा>>

चांगले प्रवाही शेर! मृत्यूच्या शेरातील दुसर्‍या ओळीत काही फेरफार आवश्यक वाटले. हे वैयक्तीक मत! रदीफ फारच वेगळी आहे. अनेक ठिकाणी कृत्रिम रीत्य निभावली गेल्यासारखी वाटली. तसेच खालील शेर!

पुन्हा नव्याने नवीन फुटली, अबोलतेला नवीन वाचा
नवीन दृष्टी, नवे इरादे, निरक्षरांची नवीन भाषा

यातील पहिल्या ओळीतील दोन वेळा आलेला नवीन भरतीचा वाटला. मात्र ही सर्व माझी मते आहेत व स्पष्टपणे लिहीली यासाठी क्षमस्व! गझल उच्चारायला मजा येत आहे कारण ती प्रवाही झाली आहे.

(*) = ही ओळ काही आवडली नाही.

चुभुद्याघ्या

-'बेफिकीर'!

धन्यवाद बेफिकीरजी. Happy

यातील पहिल्या ओळीतील दोन वेळा आलेला नवीन भरतीचा वाटला.
तुम्ही चूक दाखविल्यावर आता मलाही तसेच वाटत आहे. बदलायचा प्रयत्न करतोय.

मृत्यूच्या शेरातील दुसर्‍या ओळीत काही फेरफार आवश्यक
सहमत. हा शेर मला हवा तसा रचता आला नाही. Sad

लयदार गझल :), वेगळी रदीफ... अभिनंदन!!

मला कळाली पुन्हा नव्याने, नव्या पिकांची नवीन भाषा
कठीण मातीत रूजणार्‍या, नव्या बियांची नवीन भाषा

अता मुखातून शोषितांच्या, ज्वलंत हुंकार बोलताहे
नवीन शस्त्रे, नव्या मशाली, अहिंसकांची नवीन भाषा

श्रमास मातीत गाडण्याला, नव्या दमाचा विरोध आहे
नवीन शाई, नवे मनसुबे, अभय जनांची नवीन भाषा

हे तीन शेर खूप आवडले

अता मुखातून शोषितांच्या, ज्वलंत हुंकार बोलताहे
नवीन शस्त्रे, नव्या मशाली, अहिंसकांची नवीन भाषा>>>व्वा.

कुणास बाहूत घेत मृत्यू, विभागतो देह चिंधड्यांनी
यमास थोडी दया न उरली, नव्या यमांची नवीन भाषा>>>छान.

वाह मुटेजी..... सुंदर गझल.

अता मुखातून शोषितांच्या, ज्वलंत हुंकार बोलताहे
नवीन शस्त्रे, नव्या मशाली, अहिंसकांची नवीन भाषा

हासिल-ए-गझल शेर.:)

पुन्हा नव्याने नवीन फुटली, अबोलतेला नवीन वाचा
नवीन दृष्टी, नवे इरादे, निरक्षरांची नवीन भाषा>>>

हे खूप आवडले!

पुन्हा नव्याने नवीन फुटली, अबोलतेला नवीन वाचा
नवीन दृष्टी, नवे इरादे, निरक्षरांची नवीन भाषा

मुटेजी,
वाह ! तुमची ही 'नविन' गझलही आवडली !
Happy

हो. हो. मुटेसाहेब,

श्रमास मातीत गाडण्याला, नव्या दमाचा विरोध आहे
नवीन शाई, नवे मनसुबे, अभय जनांची नवीन भाषा >>>>> हेच नव्या युगाचे नवे तत्त्व आहे.

कविता आवडली.