झेन कथा- ६ मृत्यूची वेळ

Submitted by ठमादेवी on 12 March, 2011 - 01:49

इतर कथा इथे वाचा
http://www.maayboli.com/node/24194
http://www.maayboli.com/node/24216
http://www.maayboli.com/node/24220
http://www.maayboli.com/node/24244
http://www.maayboli.com/node/24282

इक्कियू हा झेन धर्मगुरू अगदी लहानपणापासून हुशार होता... त्याच्या गुरूकडे एक अत्यंत मौल्यवान चहाचा कप आणि त्याचा सेट होता... गुरू त्याला खूप जपायचा... एके दिवशी इक्केयूच्या हातून तो कप फुटला आणि तो गोंधळून गेला...

तेवढ्यात दारात गुरूची पावलं वाजली... इक्केयूने फुटलेल्या कपांचे तुकडे पाठी लपवले आणि गुरूला विचारलं... माणसाला मरावं का लागतं?

ते अत्यंत नैसर्गिक आहे, गुरू उत्तरला... प्रत्येकाला मरावं लागतं आणि त्याचं पुरेसं जगून झालेलं असतं... प्रत्येकाची मरण्याची वेळ निश्चित असत्ते...

इक्केयूने फुटलेला कप गुरूच्या समोर ठेवला आणि म्हणाला, तुमच्या कपाच्या मृत्यूची वेळ झाली होती...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला यावरुन आणखी एक कथा आठवली.

एका राजाने इराणहून काचेच्या भांड्यांचा एक मौल्यवान सेट आणला होता. ती भांडी राजाला फार प्रिय होती. एकदा साफ करताना एका नोकराच्या हातून एक भांडे फुटते.राजा लालबुंद होवून नोकराच्या देहदंडाचा हुकुम देतो.....

फासावर जाण्यापूर्वी नोकराला अंतिम इच्छा विचारली जाते.

नोकर म्हणतो, '' ती सर्व भांडी फोडून टाका,जेणेकरुन माझ्यासारखं अजून कुणाला फासावर जावू लागू नये''..

हे ऐकताच राजाला आपली चूक उमगते व तो नोकराला जीवदान देतो.

छान कथा ठमे.

मला डॉक्टरांची कथा जास्त आवडली. मुळ कथेत गुरुची विद्या गुरुला फळाला आली, असे वाटले.
मूळात, गुरुला त्या कपाचा मोह का असावा ?

या वरुन एक कथा आठवली
एका राजाला कोणीतरी एक पोपट भेट म्हणुन देतो, त्या पोपटावर त्या राजाच एवढा जीव असतो की तो त्या पोपटासाठी पाच माणसं नेमतो आणु सांगतो "या पोपटाची योग्य काळजी घा, हा माझा जीव की प्राण आहे. पण जर का हा मेला तर जो मला सागायला येईल त्याचा शिरच्छेद केला जाईल".
माणसं जीवापाड त्या पोपटाला जपत असतात. पण जन्माला आएला जीव हा कधीतरी मरणारच, एके दिवशी तो पोपट मरतो........
पाचही माणसांचा थरकाप होतो, पोपट तर नैसर्गिकरित्या मेला पण आता राजाला सांगणार कोण?.....
कोणाच्या तरी सल्ल्यावरुन ते एका साधु कडे जातात आणि सर्व हकिकत सांगतात आणि म्हणतात की आम्हाला वाचवा.
साधु म्हणतो "हात्तीच्या एवढंच आहे ना मी साण्गतो राजाला" पाचही जण म्हणतात नको फुकट मराल, तो म्हणतो बघुया.......... तसाच राजवाड्यात राजासमोर येतो आणि म्हणतो " तुमच्या कडे जी भेटवस्तु म्हणुन जो पक्षी आला आहे तो मला बघायचाय", राजा त्या पाच जणांना सांगतो " या महाराजांना नेऊन दाखवा.....
थोड्या वेळाने तो साधु परत येतो आनि राजाला म्हणतो " काय हो एवढं खास काय आहे त्यात?, हलत नाही बघत नाही, दाणे खात नाही,...... राजा म्हणतो चला बघुया, परत पिंजर्‍या समोर दोघेही जातात, बघताक्षणीच राजा समजतो पोपट मेला आहे. तो साधुला म्हणतो "तुम्ही एवढे थोर पुरुष दिसता पण डोकं रिकामीच आहे, अहो हा मेला आहे......... साधु म्हणतो " ते तुम्ही बोला की तो मेला आहे ........नंतर तो साधु त्या राजाला जन्म मरण हे चक्र कसे आहे त्या बद्द्ल सांगतो तेव्हा कुठे त्या राजाला आपण दिलेल्या चुकीच्या आदेशा बद्दल कळते.......................... ( हुश्श....... हात दुखले......... त्या साधुने दिलेले प्रवचन इथे टाईपले असते तर अजुन एक पान लागले असते )