कोकण... एक सुंदर स्वप्न... :)

Submitted by सेनापती... on 11 March, 2011 - 04:46

कोकण भटकंती मधील काही क्षणचित्रे... Happy

कड्यावरचा गणपती, हर्णे.

सावित्री नदी...

सावित्री नदी...

दाभोळ खाडी...

दाभोळ खाडी...

.
.
आवडले का... Happy

गुलमोहर: 

खूप खूप खूप छान. शेवटचा मातीचा रस्ता आणि बाजूच शेत भारीच. दोन मिनीटात कोकणात जाऊन आले.

.
.
आवडले का... >>>>>>>
हे काय विचारणे झाले? अप्रतिम! खूपच सुंदर!!

सुंदर, सावित्री नदीला पावसाळ्यानंतर भरपूर पाणी असते. महाडच्या काळ नदीचा परिसर पण असाच रम्य आहे. खारेपाटण जवळ, एका नदीचे असेच सुंदर वळण आहे. भूईबावड्याहून उतरताना हे दिसते.

या सगळ्या दृष्यांचे मनाने काढलेले फोटो आहेत माझ्याकडे. इथे कसे देऊ ?

मुजरा सरकार....
सावित्री नदीचे दोन्ही फोटो निव्वळ अप्रतिमच Happy
रोहन, हॅट्स ऑफ यार............ !!
दिनेशदा, खारेपाटणच्या त्या पुलावर उभे राहून दोन्ही बाजुला पसरलेले सावित्रीचे पात्र बघणे हा खरोखर सुंदरच अनुभव असतो.

खारेपाटणच्या त्या पुलावर उभे राहून दोन्ही बाजुला पसरलेले सावित्रीचे पात्र बघणे हा खरोखर सुंदरच अनुभव असतो.>>>> काहीतरी चुकतेय का? सावित्री नदी तर महाबळेश्वर्-महाड्-बाणकोट अशी वाहते आणी खारेपाट्ण तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले.
पण सावित्री नदीचे पात्राची शोभा जर पुलावरुन बघायचीच असेल तर बिरवाडी किंवा दासगावच्या पुलावरुन बघावी... आहा... Happy