मुखवटा

Submitted by सुरेखा कुलकर्णी on 10 March, 2011 - 05:50

सभामंडप लोकांनी भरलेला. स्टेज हारफुलांनी सजवलेलं. स्वयंसेवक इकडुन तिकडे करताहेत.
प्रत्येकाच्या चेहर्‍यावर उत्सुकता मंत्री महोदयाना पहाण्याची, त्यांचे भाषण ऐकण्याची.

" काय सुन्दरभाषण देतात ते..." एकमेकांमध्ये कुजबुज.
"अहो खरंच काय नि:स्वार्थी समाजसेवक आहेत हे"
" हा खरा समाज्सेवक आहे. अहो आतापर्यंत ह्यानी समाजाची कितीतरी कामं
केली आहेत. कुणाला नौकरी लावून देणं, कुणाला कॉलेजमध्ये दखला
मिळवून देणं कुणाचं कांही कुणाचं कांही."

लोकांचा गोन्धळ सुरु झाला. मंत्री महोदय आले. लोकांनी त्यांचा जयजयकार सुरू केला.
मंत्री महोदयांनी स्टेजवर जावून सर्वाना शांत बसण्याची विनंति केली. लोक शांत झाले. मंत्र्याचे
भाषण सुरु झाले. "देश कुठे चालला आहे, देशात भ्रष्टाचार कसा माजला आहे, लाचलुचपत कशी
वाढली आहे." वगैरेवगैरे बरंच कांही बोलले. शेवटी शेवटी "तरूणांनी ह्या सर्वांच्या विरोधात आवाज
उठवायला पाहिजे."वगैरे असंही सांगितलं. टाळ्यांच्या कडकडाटात भाषण संपले. लोक भाषणाने
भारावून गेले. प्रशंसा करतंच लोक पांगले.

माधवराव लगबगीने निघाले. त्यांना सेठ लालचंदच्या घरी जायचे होते. सेठ लालचंद हे
एक प्रतिष्ठित हिर्‍याचे व्यापारी. माधवराव त्यांच्याकडे मुनिम होते. त्यांना वेळेत पोहोचायचे होते.
कारण त्यांच्या मुलाला योग्यता नसताना मेडिकलला अ‍ॅड्मिशन मिळाली होती. ही सगळी त्या मंत्री
महोदयाची कृपा होती. म्हणून आज सेठ्कडे पार्टी होती. माधवरावच्या मनांत वादळ उठलं.
त्यांचा मुलगा इंजिनियर झाला होता. खूप कष्टाने त्याला शिकवले होते. पण त्याला मनासारखी
नोकरी लागत नव्हती. कमी पगारावर एक छोट्या कम्पनीत तो मनाविरुध्द काम करत होता.
माधवरावनी निश्चय केला. मंत्री महोदयाना विनन्ति करायची. मुलाला चांगली नोकरी लागल्याचं
एक गोड स्वप्न त्यांच्या डोळ्यासमोर तरळलं. विचारांच्या नादात ते सेठजींच्या घरी पोहोंचले.

* * *

सेठजींचा बंगला दिव्यांच्या रोषणाइने झगमगत होता. सगळे लोक घोळक्याने उभे होते.
माधवराव डोळ्यात स्वप्नं घेऊन इकडून तिकडे फिरत होते. पडेल ते काम करत होते मंत्री महोदय
आले.सेठजींची, त्यांच्या घरच्या लोकांची लगबग सुरु सुरु झाली. आदरातिथ्य झालं. मंत्रीमहोदय
त्यांच्यासाठी खास सजवलेल्या खुर्चीत विराजमान झाले. पांढरे शुभ्र कपडे, दोन्ही हातात दोनदोन
बोटात अंगठ्या, हातात सोन्याचं घड्याळ, गळ्यात गलेलठ्ठ सोन्याची साखळी. फार भव्य दिव्य
दिसत होते.

माधवराव पुढे पुढे करत होते. त्यांना वाटत होतं मंत्री महोदयानी आपल्या डोळ्यातलं स्वप्नं
बघावं. पण मंत्र्यांचं लक्ष नव्हतं. खायला कांही नको म्हणाले म्हणून सेठजींनी त्यांना शीतपेय दिलं.
ते एक एक घोट पीत बोलू लागले,

" उशीर झाला नाही का? सभा होती. देशात जो भ्रष्टाचार, लाचलुचपत चालू आहे. त्याबद्दल
तरूणांना जागृत केलं. अहो आपण जागृत नाही करणार तर कोण? ह्यॅ ह्यॅ ह्यॅ" सेठजीही हसू लागले.मग
घर दाखवण्याच्या निमित्ताने सेठजी मंत्र्यांना आंत घेऊन गेले. बरोबर फक्त सेठजींच मुलगा अन
माधवरावच होते. तिथेही मंत्र्यांकरिता एक खुर्ची सजवून ठेवली होती. मंत्री तिच्यावर विराजमान झाले.

"महाशय आपल्यामुळे माझा मुलगा मार्गी लागला. फार उपकार आहेत आमच्यावर.". सेठजीनी
असे म्हणताच महोदय म्हणाले,

" अहो कसचं काय. हे तर आमचं कामच आहे. आम्ही समाज सेवक आहोत. आमची निवडच
त्यासाठी झालीय. पण लोक पहाना..... " हातातल्या अंगठ्यांकडे पहात मंत्री महोदय बोलू
लागले," लोक पण पाहाना, इतके प्रेम करतात आमच्यावर कि विचारू नका. आता मी ज्या
गाडीतून आलो ना ती अशीच एका कामाबद्दल मिळाली. ह्या अंगठ्या, ही चेन अहो हे सर्व
लोकांनी केलेल्या प्रेमाची चिन्हं आहेत. मनही मोडवत नाही ना कुणाचं " इतक्यात सेठजी
म्हणाले, नाही महोदय मी आपणास काही देऊन आपला अपमान करू इछित नाही." मंत्री महोदयाचे
डोळे विस्फारले, कपळावर बारीकशी आठी पडली. क्षणभर त्यांना कांही सुचले नाही. माधावरावांच्या
नजरेतून हे सुटले नाही. किंचित रोषाने , नाराजीनेच फक्त म्हणाले," असू दे असू दे."
पण सेठजी लगबगिने आंत गेले, एका सुन्दर आवरणाने मढवलेलीछोटी डबी घेऊन आले. मंत्र्याच्या
पुढे करून म्हणाले, महोदय हे आमची फूल नाही फूलाची पकळी स्वीकार करावी." मंत्र्याचे डोळे चमकले.
" हे काय, हे काय" म्हणत त्यानी ती डबी उघडली. त्यात एक तोळा सोन्याची अंगठी होती ज्यात
दीड लाख किमतीचा हीरा जडवलेला होता. " कशाल कशाला" म्हणत महोदयानी ती डबी खिशात घतली.
सगळेजण त्यना सोडायला बाहेर पर्यन्त गेले.

सनाज्सेवकाचा मुखवटा गळून पडला होता. हे फक्त माधवरावनी पाहिले होते. पण त्यांचा
चेहरा काळा ठिक्कर पडलेला कुणिच पाहिला नाही.

त्यांच्या डोळ्यातल्या दोन थेंबाबरोबर त्यांचं क्षणभरासाठी पाहिलेलं स्वप्नं विरघळून गेलं.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मी संध्याकाळी ही कथा पूर्ण केली. पण ती २.५०ला "नवीन लेखन"वर आलेली
दिसत आहे. चुका मी दुरुस्त केल्या पण चुका जशाच्या तशा दिसत आहेत.तरी
समजून घ्याल अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद.

स्पष्ट मत देते आहे.. राग मानू नका... पण कथाबीज फारच सुमार आहे. या विषयावर खूप कथा/प्रसंग खूप जणांनी लिहिलेले आहेत.
कथा आणखी थोडी रंगवली असतीत तर कथे मध्ये वाचकाला गुंतवण्यात यशस्वी झाला असतात. पण तसेही न झाल्याने वाचक कथेमध्ये गुंतत नाही.. आणि सुरूवातीलाच कथेचा शेवट काय असणार हे समजते त्यामुळे पुढे वाचायचे कष्ट घ्यावेत का.. असेही वाटून जाते.
असो..
मी काही कोणी समिक्षक नाही.. जे मनापासून वाटले ते लिहिले... पुन्हा असो.!
पुढील लेखनास शुभेच्छा!