"चौफुला.." काव्य जुने शब्द नवे..!

Submitted by प्राजु on 5 March, 2011 - 10:12

'वाक्यं रसात्मकं काव्यं' या व्याख्येनुसार भावनांचे रसपूर्ण अलगूज म्हणजे काव्य. या साहित्य प्रकारातली विविधता अतिशय सौंदर्यपूर्ण आहे. असे वैविध्य रसिक श्रोत्यांसमोर पुन्हा नव्याने उलगडून दाखवायच्या उद्देशाने शिकागो येथिल बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १५ व्या अधिवेशनात काव्यसंमेलन करायचे योजिले आहे.आपल्या संपन्न मराठीतील अभिव्यक्तीचा काळानुसार बदललेल्या नवनविन काव्याविष्कारांबरोबरच काळाच्या पडद्याआड होत चाललेल्या पारंपारिक काव्यवैभवालाही उजाळा देण्याचा हेतू आहे. या काव्यसंमेलनाचे हेच वैशिष्ट्य असेल.

यासाठी अमेरिका/कॅनडा येथिल मराठी कवी-कवियत्रींकडून काव्य मागविण्यात येत आहे. निवड समिती सर्व प्रवेशिकांमधून काही निकषांच्या आधारे ठराविक काव्यांची निवड करेल. निवडलेले काव्य अभिवाचन अथवा गायन स्वरूपात सादर करण्यासाठी कवी/ कवयित्रींना शिकागो येथे स्वखर्चाने यावे लागेल.
आता काव्य म्हणजे काय हे आपल्यासारखे संवेदनाशिल वाचक तसेच लेखक जाणतातच. मग घ्या हाती लेखणी.
आपले सृजनत्व काव्य प्रतिभेतून फुलू द्या. लिहिते व्हा आणि लवकरात लवकर आपले काव्य आमच्याकडे chaufula@gmail.com ह्या पत्त्यावर पाठवून द्या. प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख- १५ मे २०११.

flyerimage

गुलमोहर: