Submitted by प्रज्ञा९ on 4 March, 2011 - 12:46
परदेशी कुरिअर करता येण्यासारख्या/ मागवता येण्यासारख्या वस्तू
वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या नियमांप्रमाणे काही गोष्टी/ वस्तू पार्सल केलेल्या चालत नाहीत. त्याबद्दल इथे चर्चा व्हावी अशी अपेक्षा.
स्वतःसाठी म्हणून मी हा धागा आधीच सुरु करणार होते. पण काही कारणामुळे नाही केला. आत्ता एका आयडीने विचारलेल्या प्रश्नामुळे मात्र सुरु करते धागा. योग्य माहिती मिळेल अशी खात्री आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारतीय पोस्ट खातं.. माझा
भारतीय पोस्ट खातं.. माझा अनुभव चांगला आहे.
मायबोली खरेदीवर पुस्तक नसेल
मायबोली खरेदीवर पुस्तक नसेल तर इथे मदत मिळु शकते. मी पुर्वी संपर्क केला आहे आणि मला हवी ती पुस्तके त्यांनी पाठवली.
तुमच्या घरातील पुस्तके मागवायची असतील तर भारतीय टपाल सेवा उत्तम आहे. अनेकदा अनुभव घेतला आहे.कधीच गहाळ वगैरे नाही झाले. तरी पण खाजगी कुरीयर वगैरे शोधत असाल तर डीएचएल, फेडेक्स आहेतच पण त्यांचे दर खुप आहेत.
कोणी अमेरिकेहुन भारतात काही
कोणी अमेरिकेहुन भारतात काही मागवले आहे का ?
मला काही craft supplies मागवायच्या आहेत. USPS कसे आहे ? भारतात कस्टमचे craft supplies बद्दल नियम काय आहेत ? मी आत्तापर्यंत अमेरिकेत डिलीव्हरी घेऊन मित्र - नातेवाईकांना भारतात आणायला लावत होते.
अरे, कोणालाच काही माहित नाही
अरे, कोणालाच काही माहित नाही का ?
अमेरिकेतून भारतात कार्गोने
अमेरिकेतून भारतात कार्गोने सामान पाठवायचे असल्यास चांगली सेवा देणारी कंपनी कोणास माहित आहे का? या बद्दलचा धागा माबोवर अगोदरच असल्यास प्लीज त्याची लिंक द्यावी.
http://www.unirelo.com बे
http://www.unirelo.com
बे एरीयामधील अनेकांना चांगला अनुभव आहे.
पुण्याहून अमेरिकेत कुरिअर
पुण्याहून अमेरिकेत कुरिअर पाठवायचे आहे, दोन ठिकाणी चौकशी केली परंतु ते घरगुती भाजणी , पापड अशा गोष्टी पाठवायला तयार नाहीत. केवळ branded वस्तूच पाठवू अस म्हणतात. मुंबईहून मात्र सगळ्या गोष्टी पाठवता येतात. माझ्या सासूबाई मुंबईहून non branded सगळ्या गोष्टी पाठवतात, पुण्याची एखादी कुरिअर कंपनी माहित असेल जी सगळ्या गोष्टी पाठवते तर कृपया माहिती द्या. धन्यवाद …!
mimarathi पोष्टाने non
mimarathi पोष्टाने non branded वस्तूही पाठवता येतात.
http://www.uniqueairexpress.c
http://www.uniqueairexpress.com/default.aspx या साईटला भेट द्या.
घरगुती पदार्थ पाठवायची त्यांची सोय आहे.
पुण्यात त्यांचे ऑफिस : १३०, सिद्धिविनायक अपार्टमेन्ट्स, शनिवार पेठ, पुणे ३० येथे आहे. फोन : +९१ २० ६७२००००० हा आहे. टोल फ्री क्र : १८०० २०९ १० २५.
महागुरू, तुमची पोस्ट आता
महागुरू, तुमची पोस्ट आता वाचली. बघते साईट, थँक्स!
http://www.uniqueairexpress.c
http://www.uniqueairexpress.com/default.aspx या साईटला भेट द्या.
घरगुती पदार्थ पाठवायची त्यांची सोय आहे.
पुण्यात त्यांचे ऑफिस : १३०, सिद्धिविनायक अपार्टमेन्ट्स, शनिवार पेठ, पुणे ३० येथे आहे. फोन : +९१ २० ६७२००००० हा आहे. >>>>>>>>>>>+११११
माझ्या घरचे इथूनच पाठवतात.
पोस्ट, डीटीडीसी, युनिक
पोस्ट, डीटीडीसी, युनिक एक्स्प्रेस वगैरे
Unique air express is really
Unique air express is really good, shipment arrives in 3-4 business days. My parents use it very frequently. Only thing is they do not allow to ship any type of medicines (Allopathy, Ayurvedic).
सर्वाना मनापासून धन्यवाद!
सर्वाना मनापासून धन्यवाद! माझ्या आईने Unique air express कडेच चौकशी केली होती, ते घरगुती वस्तू ( थालीपीठ भाजणी, पोहा पापड ) पाठवणार नाही म्हणतात, वस्तूंवर लेबल नसेल तर फेकून देतील, मग आम्हाला विचारू नका अस म्हणाले, परंतु माझ्या सासूबाई मुंबईहून अगदी फरसाण,चकल्या,चिवडा,लाडू, पिठ zip lock पिशव्यात भरून पाठवतात, सगळ मिळत, आजपर्यंत तरी काही फेकून दिलेले नाही, आईला पुन्हा विचारून बघायला सांगते.
मला birmingham (uk )वरुन
मला birmingham (uk )वरुन mumbai काही सामान 40-50 kg पाठवायचे असल्यास चांगली सेवा देणारी कंपनी कोणास माहित आहे का? या बद्दलचा धागा माबोवर अगोदरच असल्यास प्लीज त्याची लिंक द्यावी
किराणा सामानाच्या काही वस्तू
किराणा सामानाच्या काही वस्तू दुकानदार स्वतः पाठवू शकतात का? मिठाई पाठवतात तसे.
असल्यास लिंक द्या. (दक्षीण कोरियासाठी)
.
.
मुंबईतून अमेरीकेत कपडे आणि
मुंबईतून अमेरीकेत कपडे आणि इतर कही वस्तू कुरीअर करता येईल अशी कुरीयर कंपनी माहित आहे का? पोस्टाने पाठवता येते का? सधारण खर्च किती येतो?
ज्ञाती, स्पीड पोस्टबद्दल इथे
ज्ञाती, स्पीड पोस्टबद्दल इथे वाच.
mm पर्लपेट किंवा तत्सम
mm पर्लपेट किंवा तत्सम बरण्यांतून युएई (uniqueairexpress) सरळ घरचे पदार्थ घालून द्या असे सांगतात. किंवा चितळे मिठाई बॉक्स मधे घरचे पदार्थ घालून लोक पाठवतात.
मी बरेच सामान भावाला डब्लिनला युएई ने नेहमी पाठवते. तोच वरचा पत्ता.
मन्डळी .... दिवाळी
मन्डळी .... दिवाळी आली....आपल्या पैकी कुणी जपान ला दिवाळी खाउ पाठवण्या बाबत माहीती सान्गेल का?
माझी भाची सध्या १ वर्शा साठी टोक्यो ला आहे .
.
union air cargo पुणे ला विचारले तर ६ कीलो चे रु १०,०००/ सागितले .....
आता काय करायचं
चितळे ओन लाईन कडुन पण असेच पैसे लागतिल असे वाटते ..
अजुन काही वेगळी माहीती असेल तर प्लिज सागा....
uniqueairexpress ची स्कीम आहे
uniqueairexpress ची स्कीम आहे 13 ते 20 तारखेपर्यंत 455रू किलोची, ते विचारलेत का?
डीवी ...हो जाउन विचारुन
डीवी ...हो जाउन विचारुन आले....जपान ला ही स्किम लागु नाही
https://www.facebook.com/Uniq
https://www.facebook.com/UniqueAirExpress
इथे तर जपान लिहिले आहे नेटवर्क मध्ये
त्यांचा नॉर्मल रेट पण ९०० रू
त्यांचा नॉर्मल रेट पण ९०० रू किलो असतो. बाकीच्यांपेक्षा खूपच कमी
डीविनिता... आपल्या तत्पर
डीविनिता... आपल्या तत्पर उत्तरा साठी खुप खुप आभार.. ... त्याना मेसेज दिला आहे ..पाहु काय उत्तर येते ....
अमेरिके तून भारतात कुरिअर
अमेरिके तून भारतात डॉक्युमेंट कुरिअर करण्या साठी स्वस्त सेवा माहीत आहे का.
चौ कशी केली तर १२० डॉलर आहेत चार्जेस.. महाग वाटतंय.
युपीसने सहसा ८० डॉलर मध्ये
युपीसने सहसा ८० डॉलर मध्ये जातात. वजन, कालावधीवर अवलंबून. यूएसपीएस अजून स्वस्त आहे. पण त्यांच्याकडे प्रींटींग होत नाही म्हणून युपीस मध्ये काम केलं. (मला कागदपत्रे विशिष्ट कागदावर लागणार होती).
DTDC International service
DTDC International service बघा. त्यांचं DHL बरोबर टायप आहे. ड्रॉप DHL मध्ये करायचं. बे एरिया तून 25/ 30 मध्ये डॉक्युमेंट्स पाठवलेली आठवत आहेत. ही सर्व्हिस युएस्पीएस पेक्षाही स्वस्त होती. आणि चार एक दिवसात पोचले होते असं पुसट आठवतंय.
धन्यवाद सीमंतिनी आणि अमितव..
धन्यवाद सीमंतिनी आणि अमितव.. ups ची च चौकशी केली होती . बहीण आहे Connecticut ला.. ती पाठवणार आहे तिकडून..सांगते DTDC बद्दल..
Pages