एकदा तरी

Submitted by अभय आर्वीकर on 25 February, 2011 - 11:26

एकदा तरी

सकाम कर्म त्यागुनी निदान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी

नसेल आपले तरी कशास हक्क सांगणे?
समानतेस न्याय दे किमान एकदा तरी

महान, थोर, श्रेष्ठ हे बिरूद फ़ार मिरवले
जगून दाव माणसासमान एकदा तरी

स्वराशिवाय रेकलो असाच मी बरेचदा
निघेल सूर कोकिळे समान एकदा तरी?

उदास चेहरा असा कसा मलूल जाहला?
हसा बघू जरा हळूच छान एकदा तरी

खरीदण्यास पाहतोस स्वाभिमान आमचा
करेन बंद मी तुझे दुकान एकदा तरी

सजा सुनावणे अभय कठीण काय त्यात; पण
बघा धरून आपलेच कान एकदा तरी

गंगाधर मुटे
------------------------------------------

गुलमोहर: 

महान, थोर, श्रेष्ठ ही बिरूद फ़ार मिरवली
जगून दाव माणसासमान एकदा तरी

खरीदण्यास पाहतोस स्वाभिमान आमचा
करेन मीच बंद हे दुकान एकदा तरी

सजा सुनावणे अभय कठीण काय त्यात; पण
बघा धरून आपलेच कान एकदा तरी>>.

मस्त!

खरीदण्यास पाहतोस स्वाभिमान आमचा
करेन मीच बंद हे दुकान एकदा तरी

सजा सुनावणे अभय कठीण काय त्यात; पण
बघा धरून आपलेच कान एकदा तरी

हे दोन शेर आवडले Happy

'बिरूद'चे अनेकवचन बिरुदे होत असावे. तसे असल्यास ते कलिंदनंदिनीत योजण्यासाठी शब्दरचना बदलावी लागेल किंवा कदाचित नाहीच बसणार!

मात्र त्या शेरात ' बिरुदे ' असे तरी हवे आहे किंवा 'हे बिरूद फार मिरवले' असे तरी!

धन्यवाद!

उदास चेहरा असा कसा मलूल जाहला?
हसा बघू जरा हळूच छान एकदा तरी

अप्रतीम .....

सजा सुनावणे अभय कठीण काय त्यात; पण
बघा धरून आपलेच कान एकदा तरी

व्वाहवा...

मुटेजी,
वाह ! क्या बात है !
महान, थोर, श्रेष्ठ हे बिरूद फ़ार मिरवले
जगून दाव माणसासमान एकदा तरी

पण त्यासाठी खुप हिम्मत लागेल, ती कुठुन मिळणार ?
Happy