Submitted by भुंगा on 25 February, 2011 - 01:05
घडेल का असे कधी किमान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी
लहान तो, महान तो अशीच का विभागणी
करू मनात नोंदणी समान एकदा तरी
तुझ्याविना जगायचे जमेल का सखे मला
करून यत्न पाहतो किमान एकदा तरी
कशा उरात स्पंदती जुन्या खुणा, तुझ्याच ना??
मला तुझ्या कुशीत घे गुमान एकदा तरी
घनास सांगतो कधीच कोसळू नको इथे
जळास लागु दे तुझी तहान एकदा तरी
जिथे तुलाच भेटलो, तुझ्या मिठीत पेटलो
तिथे कुटीत थाटतो मकान एकदा तरी
गुलमोहर:
शेअर करा
मस्त! घनास सांगतो कधीच कोसळू
मस्त!
घनास सांगतो कधीच कोसळू नको इथे
जळास लागु दे तुझी तहान एकदा तरी
व्वा!
थोडी उशीरा वाचायला मिळाली
क्षमस्व!
रामकुमार
घनास सांगतो कधीच कोसळू नको
घनास सांगतो कधीच कोसळू नको इथे
जळास लागु दे तुझी तहान एकदा तरी >>> वाह्..क्या बात है
...अहा पाण्यालाही लागुदे तहान व्वाह.. व्वाह, कसली जालिम आतुरता.
Pages