वटपौर्णीमेचे संवाद !

Submitted by कवठीचाफा on 18 June, 2008 - 04:46

वटपौर्णीमेचे संवाद काल्पनिक

हे कधिही कुठेही घडू शकतात, त्याचप्रमाणे दोन- चार- आठ- दहा कितीही असु शकतील त्यातले काही आमच्या (डोंबल्याच्या) वार्ताहराकडुन !

१]
सावित्र्या वडाला फ़ेर्‍या मारताना दोन सावित्र्या:

"अय्या, तुझा हार कित्ती छाने गं, स्वर्ग मधुन घेतला वाटत?"
"नाही गं यांनी घेतला लग्नाच्या वाढदिवसाला"
"स्वर्ग मधेही मी आगदी अस्साच बघितला होता"
"हो का ? असेल असेल, तुझीही साडी खुपच मस्त आहे हं, पदर आगदी पैठणी सारखाच दिसतो"
"दिसतो काय ? पैठणीच आहे ही, खास वटपौर्णीमेला म्हणुन घेतलीये यांनी"
"अगो बाई, पैठणी का? पण सुरतची दिसतेय ओरीजनल पैठणीचा पोत असा नसतो बै"

एव्हाना साता ऐवजी बारा-तेरा फ़ेर्‍या वडाला झालेल्या असतात आणी हातातला दोरा संपल्यामुळे दोन्ही सावित्र्या वडाची मान सोडतात. पण म्हणुन संवाद संपतात?
मुळीच नाही मनातल्या मनात ते चालुच रहातात.

" मेली माझ्या पंधरा हजाराच्या पैठणीला सुरतेची डुप्लिकेट पैठणी म्हणते" स्वतःच्या अंगावरचे सगळे दागीने एका ग्रॅमचे आहेत त्याच काय ?"

"हॅऽऽ म्हणे माझा हार स्वर्ग मधुन घेतलाय, नाकातली नथ पण नकली घालुन माझ्या हाराला नावं ठेवते सेल मधुन घेतलेली साडी म्हणे पैठणी आम्ही काय पैठण्या बघितल्या नाहीत काय ?"

" आजकाल कै बाई सगळं नकली मिळतं म्हणुन मिरवायला मिळतं सोन्यासारखे दागीने घालुन, आता गिरीषला सांगायलाच पाहीजे मला सुध्दा हार आणी बांगड्या हव्यात म्हणुन, आगो बाई, एक वाजला? गिरीष येइल ना इतक्यात, त्याला सांगते आज बाहेरच जेव आणि मलाही पॅक करुन आण आता इतकी दमलेय ना बाई"

२]
वडाची पुजाच चालु आहे आणी मोबाईल मधुन कुठल्याश्या सिरीयलची ट्युन वाजतेय पुढील संभाषण फ़ोन वर :

शिरी तुऽऽ ? कित्ती दिवसानी फ़ोन करतेस ?
-----
यु.एस. ला गेली होतीस आणि मला नाही बोललीस ना?
------
अय्या असं कसं अचानक? लग्न म्हणजे काय खेळ आहे का?
------
आता दोघेही इंडीयात आलात का ?
-----
तु एकटीच कशी ?
--------
अय्या लगेच घटस्फ़ोटपण घेतलास ? इथे मेले वर्ष घालवतात घटस्फ़ोट द्यायला.
-------
अगं येतेस का आज ? नको आज नको येउ.
--------
का म्हणजे काय आज वडपौर्णीमा आहे ना आज माझा किनई फ़ास्ट आहे.
---------
अगं असतं ते आमच्यात एक ! वडाच्या झाडाला धागा गुंडाळायचा असतो.
-------
का ते नाही माहीती सगळ्या मैत्रीणी आल्यात म्हणुन मी पण आलिये. ए तिकडची घट्स्फ़ोटाची प्रोसिजर इतकी फ़ास्ट कशी गं
---------
एक मिनीट थांब हं हे भटजी म्हणताहेत सत्तावीस फ़ेर्‍या झाल्या, सातच मारायच्या असतात, आता विस वेळा उलट्या फ़ेर्‍या मारायला लागतात की काय ते विचारते तु जरा होल्ड कर हं

इथुन पुढे संवाद 'आउट ऑफ़ कव्हरेज एरीया' असल्यामुळे लिहीता आले नाहीत.

३]
कुठल्या ठिकाणचा संवाद ते माहीत आहे पण कोणाच्या मधे झाला ते फ़क्त एक स्त्री आणि तिचा नवरा असावा या पलीकडे माहीती उपलब्ध नाही:
" सावित्र्ये तुला कधीचा मागतुया, धा रुपये दे की"
" मेल्या, कशाला आता सक्काळ सक्काळ मागतुयास धा रुपयं ते मला ठाव न्हाय का. वडाची पुजा करतीया न्हवं दिसत नाय का?"
" ती पुजा र्‍हाव दे मला धा रुपये दे"
" आरं आता सक्काळ जाउन तिकडं दारु खाउन येशील आनं दिवसभर तमाशा करत र्‍हाशील वाईच् थांब"
" सावित्र्ये धा रुपयं दे म्हन्तो ना ?"
" आरं मेल्या मुडदा बशिवला तुजा, वडाला धागा बांधतिया ते दिसत न्हाय का तुला"
" धा रुपय दे"
"मुडद्या, माझी कष्टाची कमाई त्या दारुच्या गुत्त्यावर घालवाया तुला इतकी घाई झालीया?"
" धा रुपय दे म्हणतो ना, नायतर, नायतर "
" आरं कीडं पडो तुझ्या अंगात मुडद्या, सात फ़ेर्‍या पुर्‍या करायच्या आदी मला खाली उतरवलंस, घे हे धा रुपय आनी घाल तुझ्या मढ्यावर"

यापुढील संवाद एकतर्फ़ी झाला आणि तो ऐकण्याची क्षमता आमच्या वार्ताहराच्या कानात नसल्याने तो देउ शकत नाही !

गुलमोहर: 

अरे वा... सहीच जमलेत सगळे प्रसंग!! Happy
काल आमच्या इथल्या वडाच्या झाडाजवळ एवढी गर्दी नि वडाचा घेर प्रचंड, त्यामुळे दोरा गुंडाळताना काही बायकांच्या गळ्यात, कुठे भटजीबुवाच्या मानेत अस्सा गुंतायचा!! ह ह पु वा झाली मस्त!! नि बायकांचे लक्षच नाही आपण कशाला सुत गुंडाळतोय तिकडे!! (बहुतेक प्रसंग १ चे संवाद चालु असतील मनातल्या मनात!! :))

प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद ! पण त्यापेक्षाही जास्त आनंद वाटतोय तो यातल्या भर घातल्यामुळे ! जर इतकी भन्नाट लोकं आहेत ईथे, मग प्रत्येक सणाला आपले कोणते ना कोणते वार्ताहर हजर असायला हरकत नसावी ! Happy
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

साद आणि प्रतिसाद दोन्हीही धमाल. हहपुवा. "वडाच्या झाडावरचे वडे चविष्ट."

सगळ्याच प्रसंगानि मजा आणलि.
विशेशकरुन वडाचि मान.

चाफ्फा Biggrin आणि बाकीच्यांनी घातलेली भर पण मस्तच Biggrin

    ================
    आज झालो तुझी मी वदंता नवी
    कालची बातमी काल होती खरी

      शेवटी शेवटी खूप आल्या सरी

        -एक झलक, वैभव जोशी यांच्या लवकरच येणार्‍या ’सोबतीचा करार’ या गझल अल्बमची!

        झकास लिहितेस पोरी
        चिन्ता

        Lol

        Pages