वटपौर्णीमेचे संवाद काल्पनिक
हे कधिही कुठेही घडू शकतात, त्याचप्रमाणे दोन- चार- आठ- दहा कितीही असु शकतील त्यातले काही आमच्या (डोंबल्याच्या) वार्ताहराकडुन !
१]
सावित्र्या वडाला फ़ेर्या मारताना दोन सावित्र्या:
"अय्या, तुझा हार कित्ती छाने गं, स्वर्ग मधुन घेतला वाटत?"
"नाही गं यांनी घेतला लग्नाच्या वाढदिवसाला"
"स्वर्ग मधेही मी आगदी अस्साच बघितला होता"
"हो का ? असेल असेल, तुझीही साडी खुपच मस्त आहे हं, पदर आगदी पैठणी सारखाच दिसतो"
"दिसतो काय ? पैठणीच आहे ही, खास वटपौर्णीमेला म्हणुन घेतलीये यांनी"
"अगो बाई, पैठणी का? पण सुरतची दिसतेय ओरीजनल पैठणीचा पोत असा नसतो बै"
एव्हाना साता ऐवजी बारा-तेरा फ़ेर्या वडाला झालेल्या असतात आणी हातातला दोरा संपल्यामुळे दोन्ही सावित्र्या वडाची मान सोडतात. पण म्हणुन संवाद संपतात?
मुळीच नाही मनातल्या मनात ते चालुच रहातात.
" मेली माझ्या पंधरा हजाराच्या पैठणीला सुरतेची डुप्लिकेट पैठणी म्हणते" स्वतःच्या अंगावरचे सगळे दागीने एका ग्रॅमचे आहेत त्याच काय ?"
"हॅऽऽ म्हणे माझा हार स्वर्ग मधुन घेतलाय, नाकातली नथ पण नकली घालुन माझ्या हाराला नावं ठेवते सेल मधुन घेतलेली साडी म्हणे पैठणी आम्ही काय पैठण्या बघितल्या नाहीत काय ?"
" आजकाल कै बाई सगळं नकली मिळतं म्हणुन मिरवायला मिळतं सोन्यासारखे दागीने घालुन, आता गिरीषला सांगायलाच पाहीजे मला सुध्दा हार आणी बांगड्या हव्यात म्हणुन, आगो बाई, एक वाजला? गिरीष येइल ना इतक्यात, त्याला सांगते आज बाहेरच जेव आणि मलाही पॅक करुन आण आता इतकी दमलेय ना बाई"
२]
वडाची पुजाच चालु आहे आणी मोबाईल मधुन कुठल्याश्या सिरीयलची ट्युन वाजतेय पुढील संभाषण फ़ोन वर :
शिरी तुऽऽ ? कित्ती दिवसानी फ़ोन करतेस ?
-----
यु.एस. ला गेली होतीस आणि मला नाही बोललीस ना?
------
अय्या असं कसं अचानक? लग्न म्हणजे काय खेळ आहे का?
------
आता दोघेही इंडीयात आलात का ?
-----
तु एकटीच कशी ?
--------
अय्या लगेच घटस्फ़ोटपण घेतलास ? इथे मेले वर्ष घालवतात घटस्फ़ोट द्यायला.
-------
अगं येतेस का आज ? नको आज नको येउ.
--------
का म्हणजे काय आज वडपौर्णीमा आहे ना आज माझा किनई फ़ास्ट आहे.
---------
अगं असतं ते आमच्यात एक ! वडाच्या झाडाला धागा गुंडाळायचा असतो.
-------
का ते नाही माहीती सगळ्या मैत्रीणी आल्यात म्हणुन मी पण आलिये. ए तिकडची घट्स्फ़ोटाची प्रोसिजर इतकी फ़ास्ट कशी गं
---------
एक मिनीट थांब हं हे भटजी म्हणताहेत सत्तावीस फ़ेर्या झाल्या, सातच मारायच्या असतात, आता विस वेळा उलट्या फ़ेर्या मारायला लागतात की काय ते विचारते तु जरा होल्ड कर हं
इथुन पुढे संवाद 'आउट ऑफ़ कव्हरेज एरीया' असल्यामुळे लिहीता आले नाहीत.
३]
कुठल्या ठिकाणचा संवाद ते माहीत आहे पण कोणाच्या मधे झाला ते फ़क्त एक स्त्री आणि तिचा नवरा असावा या पलीकडे माहीती उपलब्ध नाही:
" सावित्र्ये तुला कधीचा मागतुया, धा रुपये दे की"
" मेल्या, कशाला आता सक्काळ सक्काळ मागतुयास धा रुपयं ते मला ठाव न्हाय का. वडाची पुजा करतीया न्हवं दिसत नाय का?"
" ती पुजा र्हाव दे मला धा रुपये दे"
" आरं आता सक्काळ जाउन तिकडं दारु खाउन येशील आनं दिवसभर तमाशा करत र्हाशील वाईच् थांब"
" सावित्र्ये धा रुपयं दे म्हन्तो ना ?"
" आरं मेल्या मुडदा बशिवला तुजा, वडाला धागा बांधतिया ते दिसत न्हाय का तुला"
" धा रुपय दे"
"मुडद्या, माझी कष्टाची कमाई त्या दारुच्या गुत्त्यावर घालवाया तुला इतकी घाई झालीया?"
" धा रुपय दे म्हणतो ना, नायतर, नायतर "
" आरं कीडं पडो तुझ्या अंगात मुडद्या, सात फ़ेर्या पुर्या करायच्या आदी मला खाली उतरवलंस, घे हे धा रुपय आनी घाल तुझ्या मढ्यावर"
यापुढील संवाद एकतर्फ़ी झाला आणि तो ऐकण्याची क्षमता आमच्या वार्ताहराच्या कानात नसल्याने तो देउ शकत नाही !
(No subject)
मस्त !! अजून
मस्त !! अजून १-२ संवाद असते तरी चाललं असतं, पण हे सहीच !!
सही रे
सही रे चाफ्फ्या
सहीच
सहीच रे..............
आज एका
आज एका ऑफिसमधल्या मैत्रिणीला तिच्या सा बांनी सजेशन दिलं की वडाचं झाड नसेल तर वडाच्या झाडाच्या फोटोची पूजा कर.
.
म्हणलं ते तरी कशाला डीजीकॅममधे फोटो काढून घे वडाचा आणि त्याची पूजा कर नायतर हापिसात आल्यावर गूगल उघड त्या वडाच्या झाडाची इमेज शोध कॉम्पलाच दोन फुलं वाहून टाक हाय काय नाय काय.
~~~~~~~~~

~~~~~~~~~
कॉम्पला
कॉम्पला फुलं... ही ही
बरंय मी आपलं पहिलं वर्ष तुमच्या मनासारखं करीन नंतरचं काही मला सांगू नका असं सांगून टाकलं होतं त्यामुळे आता काही चिंता नाही.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
वीस
वीस फेर्या उलट्या मारायच्या का विचारते



लै धमाल रे
आणखी लिही रे
.
४) यम आणि सत्यवान ह्यातील संवाद (काल्पनिक अर्थात)
स्थळ (म्हणजे ठीकाण) यमलोकीच गेट नंबर २:
.
यम: : सावित्री कधी येणार रे बाबा तुला न्यायला ?
सत्यवान: : आता ती 'सात फेरे' संपली की येते म्हणाली
यम: : आयला काय सांगतो भौ. यमी पण बघते ती सीरीयल. त्याशिवाय मला जेवण आणि रेड्याला चारा मिळत नाय रे
सत्यवान: फोन पण नाय उचलत रे. माझी आय पी एल चुकणार बहुतेक करून
यम: अरे किती हा उशीर ? अजून 'पिक -अप' सर्वीस बाकी आहे. टार्गेट कस पूर्ण व्ह्यायच अश्याने. ह्या वर्षात बोनस नाय मिळणार बहुतेक
सत्यवान: यम राज्या एक विनंती रे. त्या एकताला हूल दे ना रे बाबा. आम्हा सत्यवानांना एक जन्म तरी सुखाचा मिळू दे.
झकास.
झकास.
चाफ्या
चाफ्या
केदोबा अजुन लिहि रे.
आयला काय सांगतो भौ. यमी पण बघते ती सीरीयल. त्याशिवाय मला जेवण आणि रेड्याला चारा मिळत नाय रे>>>>.....
(मराठीतुन हसायला भारी वाट्ट नाय अपवाद फक्त ती निळी गोल गोल फिरणारी स्मायली.)
.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**
सही......... केद
सही.........
केदार, तुमच addition पण अफलातुन
त्या
त्या एकताला हूल दे ना रे बाबा. >>>>


आमेन!
.
चाफ्फा, अजून पंचेस घालता आले असते.. पहिला प्रसंग मात्र तंतोतंत जमलाय!
----------------------
The cheapest face-lift is a SMILE
सही लिखेला
सही लिखेला है बाप..
- अनिलभाई
मस्तच!!! एक
मस्तच!!!

एक बोनसाय वड ठेवावा हाताशी. पटकन पिशवीत घालून ऑफिसात नेता येतो. घरी पुजेला वेळ नसला तर!
चाफ्फ्या!
चाफ्फ्या!

मीनु
ह. ह. पु.
ह. ह. पु. वा.
यतेन्द्र
केद्या
केद्या एकदम बढीया भर घातलियेस,
पुनम तुमचि प्रतिक्रिया आगदी ते कॉमेडी सर्कस नावाचं एक प्रकरण लागत ना सोनी टी.व्ही. ला त्यातल्या अर्चना पुरनसिंग सारखी वाटली ' मुझे पंचेस थोडे कम लगे'
एकंदर वटपौर्णीमेबद्दल माझ्या माहीतीत बरीच भर पडली हे खरं मीनु आणि आजुक्का
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **
चाफ्फ्या ..
चाफ्फ्या .. एकदमच खास लिहिलंयस !
केदार - ऍडिशन परफेक्ट !
मला त्या सलोनी, सरस्वती इ. पात्र रस्त्यात भेटली तर सांगीन इथे भेटलात ... वर नका भेटू !
च्यायला ... नवरा सोडून तमाम दुनियेला सगळं सांगतील !
त्यांनी फक्त नवर्याला सगळं खरं आणि वेळच्या वेळी सांगीतलं ना तर, सिरीयलमधल्या ब्रेकच्या इतक्याही लांबीची सिरीयल निघणार नाही
माझा भाउ
माझा भाउ वहिनिला मणतो तु बोन्साय वड पुजते त्याने माझि प्रगति खुन्तलिये
हसून हसून
हसून हसून वाट लागली!!!!!!!!
मी आणि आई दोघीही out!
..प्रज्ञा
(No subject)
सही.
सही.
मस्त जमलय
मस्त जमलय रे चाफ्फ्या!


>>>> दोरा संपल्यामुळे दोन्ही सावित्र्या वडाची मान सोडतात.
...;
आपला, लिम्बुटिम्बु
हसुन हसुन
हसुन हसुन पुरेवाट
मस्तच लिहिले आहे सगळयांनी.
हा हा हा हा!
हा हा हा हा! सही भाऊ!
सही
सही लिहिलंय चाफ्फ्या एकदम.......
उपासाच्या पदार्थांची चढाओढ पण फिट्ट बसली असती....
.
एक बाई : आज मी खजूर मिल्क शेक केलंय, उपास झेपत नै बाई, साबुदाणे वडे खाऊन झाले की वर्याचे तांदूळ नी दाण्याची आमटी खायची की मग त्यावर मिल्क शेक प्यायलं की फराळ सुफळ संपुर्ण बघ....
दुसरी बाई : अगं मी तर फ्रूट सॅलड केलंय, सगळीच फळं जातात ना पोटात, शिवाय मुलांना आवडते म्हणून खिचडी नी त्यावर घट्ट सायीचं दही आहेच... येता जाता तोंडात टाकायला म्हणून आंबा पोळी, बटाट्याचा चिवडा आणि चेरीज् आणल्यात ह्यांनी कौतुकाने.... आणि संध्याकाळला मी फराळी मिसळ करणार आहे...... तुला पाठवू का गं नमुन्याला?
एक बाई : नको गं..... माझ्या बाईने उपासाची भाजणी भिजवली असेल एव्हाना... खपायचं नाही गं बाई एवढं सगळं... चल, मी श्रीखंड घेतेय पियुष करायला, तुझ्यासाठी पण घेऊ का पाव किलो?
दुसरी बाई : नको गं... अजिबात नको... आज मी मँगो मस्तानी करायची ठरवलीये, मग पियुष कोण पिणार गं??
चाफ्फा, मी
चाफ्फा, मी तो कार्यक्रम बघत नाही हो, 'मला' जे वाटले ते सांगितले..
तोंडाला पाणी सुटलं..

मन्जू, सही! एकदम पटेश
----------------------
The cheapest face-lift is a SMILE
सगळेच
सगळेच सुटले आहेत.. खी खी खी...
सावित्री : ये सत्या खाली उतर.. ते वडाच झाड हाये.. आंब्याच नाय हाय काय.
सत्यवान : सावित्रे गप्प.. बर का! सारखी माझी अक्कल काढु नाको. मला माहीत हाय ह्ये वाडाच झाड हाय ते. तेच शोधतोय कुठे वडे लागले आहेत का?
सावित्री : अच्छा! तुला वडे आणायला पाठवला तर ४ तास झाले तुझा पत्ता नाही, तरी बर शेजारच्या काकु म्हणाल्या तु झाडावर अडकलायस म्हणुन.. पोलक शिवाया घेतल सुत बंडल बी ठेवल नाय खाली .. आले मी तशीच बिगीबिगी,
सत्यवान : अरे.. हे बर आहे तुम्हा बायकांच, घडित एक तर घडित दुसर. वर आमची अक्कल काढता. गेल्यावेळी विकतच्या कैर्या आणाल्या म्हणुन कीत्ती किती ऐकवलस.
सावित्री : कळली हो अक्कल... उतरा आता खाली. कुठुन ध्यान गळ्यात पडलय...?
सत्यवान : पण उतरु कसा अडकलोय ना मी?
तेवढ्यात यम तिथुन त्याचा रेढा धुवायल घेउन चाललेला असतो.
सावित्री : ओ, रेढेवाले भाउ, जरा हात लावा की आमच्या धन्याला.
यम : ऑ...! ये यम हाय मी. हात लावत नाय म्या.. सरळ उचलुनच नेतो...
सावित्री : नक्की?
यम : मंग .. ख्वोट का, आपण नेला माणुस परत येत नाय.
सावित्री : (मनात : आयला बरा गावला..) अस काय करता, काय बी करा पण माझ्या धन्याला खाली काढा... प्लीज.
यम : नाय जमनार नाय.. वरुन ऑरडर न्हाय हाय तशी...
सावित्री : अव अस काय करताय... माझी मदत करा.. मी पाया पडते तुमच्या.
यम : (बाई काय ऐकना बाबा).. बर करतो मदत. येरे बाबा खाली ये बस माझ्या खांद्यावर.
सत्यवान खाली येतो...
सावित्री (यमाला उद्देशुन): आता घेवुन जा ह्याला तुम्ही म्हनाला व्होता ना.. आता न्या...
यम : तस नेता येत नाय... ऑरडर नाय हाय...
सावित्री (यमाला उद्देशुन): आता नेता का की, ठेवु तुम्हासनी वडाला बांधुन?
सावित्री हातातल्या सुत बंडलानी वडाला फेर्या मारुन यामाला बांधाया लागते... गाववाले हे संम्द दुरुन बघतात आणि धावत येउ लागतात..
यम कशीबशी सुटका करुन घेतो आणि तिथुन धुम ठोकतो. गाववाल्यानां वाटत सावित्रीने वडाला फेर्या मारल्या म्हणुन सत्यवान सुटला. संम्द्या बाया वडाला फेर्या माराया लागतात... सावित्री कपाळावर हात मारुन घेते, आणि सत्यवान गावातला हीरो बनतो..
कळ्ळ का मंडळी? अशी हाय वटसावित्रीची स्टुरी बर.. जातु आता लय काम हयती...
मंजे काल
मंजे काल एवढं सगळं खाल्लस तर... अगं जरा काही वजनाचा तरी विचार करायचास की गं.. नको बाई तू उपास करत जाऊस. नवर्याचं दिवाळं निघेल अशानं ... दिवे घे.
~~~~~~~~~

~~~~~~~~~
मीनू, अगं
मीनू, अगं तरी दाण्याचा लाडू आणि बटाट्याची उपासाची भाजी राहिलीच बघ लिहायची.... हो, आणि रताळ्याचा किस सुद्धा.....
चाफ्या सही
चाफ्या सही जमलय...
सत्यजित् केदार मंजु तुमचे प्रसंग पण सही....
Pages