तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे

Submitted by माझिया गीतातुनी on 23 February, 2011 - 11:42

तुझ्याच साठी जगायला का ! मरायला ही तयार आहे !
तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे

उत्पत्ती अन् स्थिती लयाचा - कलीयुगाचाच खेळ सारा
"अ" कार झाला - "उ" कार झाला - महेश्वराचा "म" कार आहे

खुणावुनी सांगतो कसा बघ ! मला नभातून शुक्र तारा
कुणी नसे सोबती तरी हा अढळ पणाचा विकार आहे

मनातुनी खोल साद येते - रडू नको रे ! - रडू नको रे !
कुणीच नाही इथे कुणाचा - तुझाच तू शिल्पकार आहे

तुला कधी सांग वेळ होता ? टिपून घेण्यास गीत माझे
सुन्या सुन्या मैफलीत माझ्या , मुकाच मी गीतकार आहे

गणीत कोणा कसे सुटावे ? उगाच यावे - उगाच जावे !
पुन्हा पुन्हा या जगी मराया तशी शिदोरी चिकार आहे

मयुरेश साने..दि..२३-फेब-११

गुलमोहर: 

खुणावुनी सांगतो कसा बघ ! मला नभातून शुक्र तारा
कुणी नसे सोबती तरी हा अढळ पणाचा विकार आहे>>> वा वा! मस्त शेर! (शुक्र ऐवजी ध्रूव केले तर?)

(ध्रुवावरून अनंतरावांचा शेर आठवला! ध्रुवा सांगते खूप काही मला, तुझे एकट्यानेच तेजाळणे)

तुला कधी सांग वेळ होता ? टिपून घेण्यास गीत माझे
सुन्या सुन्या मैफलीत माझ्या , मुकाच मी गीतकार आहे>>> टिपून घेण्यास गीत माझे हा मुद्दा निराळा आहे, नाहीतर सुन्या सुन्या मैफिलींमध्ये आजवर अनेक जणांनी हजेरी लावून फक्त गीत गायलेच होते.

(काही ठिकाणी सफाई व वृत्त वगैरे थोडेसे बघता येईल.)

आपल्याला शुभेच्छा व धन्यवाद!

-'बेफिकीर'!

कुणी नसे सोबती तरी हा अढळ पणाचा विकार आहे>>>

कुणी नसे सोबती.. मला हा अढळपणाचा विकार आहे - असे एकदा वाचून पाहिले.

तुला कधी सांग वेळ होता ? टिपून घेण्यास गीत माझे
सुन्या सुन्या मैफलीत माझ्या , मुकाच मी गीतकार

मस्त