ठरेन या जगात मी महान एकदा तरी (तरही)

Submitted by सानी on 23 February, 2011 - 10:42

डॉ. कैलास यांनी सुचवलेल्या ओळीप्रमाणे गझल लिहिली आहे. एकंदरच, गझल लिहिण्याचा आयुष्यातला हा माझा पहिला वहिला प्रयत्न... कृपया, गोड मानून घ्यावा... चुकाही नक्की सांगाव्यात. धन्यवाद! Happy

************************************************************************************************************

निरभ्र आढळेल आसमान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी

सदा जगात कष्ट पेलते भुकेस साहुनी
शमेल का अतृप्त ही, तहान एकदा तरी

महान ते असूनही विचार का असा नसे
बघू जगास होऊनी, लहान एकदा तरी

असे नको तसे नको जसे असू तसे दिसू
बनून मित्र गाऊयात, गान एकदा तरी

तुलाच का मलाच का सदा असे विवाद का
जगेन विस्मरुन देहभान एकदा तरी

गरीब की अमीर तो तमा मला नसो कधी
जगात मान लाभु दे, समान एकदा तरी

लढा सुरू मनात हा कशी मिळेल शांतता
मरेन मी बनूनही, जवान एकदा तरी

करेन मी अखंड कार्य थोर व्हावया जरी
रचेन शेर मी बनून 'सान' एकदा तरी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

महान ते असूनही विचार का असा नसे
बघू जग होउनीया, लहान एकदा तरी

>>>>>

सानी ,

"बघू जगात होऊनी लहान एकदा तरी" असा बदल कर......

बाकी आता तू पण गझल रचणार....... मी वाचेन ग... Proud Wink

अरे हो! खरंच की...मस्त बदल सुचवलास... खुप खुप धन्स रे!

बाकी आता तू पण गझल रचणार....... मी वाचेन ग...>>> हे म्हणजे अत्याचार सहन करेन असं तुला म्हणायचंय असं वाटतंय... :फिदी. डोन्ट वरी रे... नेहमी नेहमी नाही करणार... Proud

बाकी, गझल कशी आहे ते पण सांग ना! Happy

असे नको तसे नको जसे असू तसे दिसू
बनून मित्र गाऊयात, गान एकदा तरी .......... नक्की Wink

तुलाच का मलाच का सदा असे विवाद का
जगेन मी विसरूनि, भान एकदा तरी
>>>>>
गफलत होतेय..... "जगेन मी झुगारूनी *** एकदा तरी" असं काहीतरी कर....
मान्यवरांची मतं येतीलच..... हा मित्राचा फुटकळ सल्ला. शब्द अजून चांगले तू शोधशीलच. Happy

बघू जगा होऊनी लहान एकदा तरी>>>> च्या ऐवजी बघू जगा होऊनी लहान एकदा तरी असा बदल केला आहे, म्हणजे माझ्या वाक्याचा भावार्थ कायम राहिल.

महान ते असूनही विचार का असा नसे
बघू जग होउनीया, लहान एकदा तरी >> हा आवडला

गरीब की अमीर तो तमा मला नसो कधी >> इथे "ती तमा" असायला हवे होते ना?

फारच छान प्रयत्न. बाकी गझलेबाबत इथले जाणकार प्रकाश टाकतीलच..

गरीब की अमीर तो तमा मला नसो कधी
जगात मान लाभु दे, समान एकदा तरी ........ मस्त

लढा सुरू मनात हा कशी जमेल शांतता
मरेन मी बनूनही, जवान एकदा तरी ...... मस्त.

पहिला प्रयत्न यशस्वी झालाय..... आवश्यक बदल कर.
बाकी उद्या "डॉक्टर" येऊन यशस्वी शस्त्रक्रिया करतीलच........ Happy
पु.ग.शु. (पुढील गझलेस शुभेच्छा).... तू लिहिणार म्हणजे "गझलेला" शुभेच्छा द्यायलाच हव्यात... Proud Wink

गफलत होतेय..... "जगेन मी झुगारूनी हे भान एकदा तरी" असं काहीतरी कर....>>> अरे हो! खरंच की... Sad धन्स रे परत एकदा Happy

सानी,तुमच्या या प्रयत्नाबद्दल अभिनंदन. आपल्या लिहीण्यात फार सफाई आहे... मात्र काही चुका झाल्या आहेत्,ज्या आपण सहजगत्या दूर कराल.

अनेक येत जीवनात ऊन वादळे परी
ठरेन या जगात मी, महान एकदा तरी.....

पहिल्या शेरात्/द्वीपदी मध्ये,दोन्ही ओळीत काफिया /रदीफ आला पाहिजे.... काफिया= महान्,समान्,लहान..वगैरे. व रदीफ्= एकदा तरी. आपण दुसर्‍या ओळीत एकदा तरी वापरला नाही,जे चूक आहे. हा शेर नव्याने असा लिहीता येईल.

निरभ्र आढळेल आसमान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी

सदा जगात कष्ट पेलते भुकेस साहूनी..........साहुनी असे हवे
शमेल का अतृप्त ही, तहान एकदा तरी..........फार छान शेर !! अतृप्त हा शब्द वर जोर न देता वाचावा Happy

महान ते असूनही विचार का असा नसे
बघू जग होउनीया, लहान एकदा तरी......... बघू जगात होवुनी,लहान एकदा तरी.... मस्त शेर आहे. Happy

असे नको तसे नको जसे असू तसे दिसू
बनून मित्र गाऊयात, गान एकदा तरी.
... व्वा..क्या बात है !!!

तुलाच का मलाच का सदा असे विवाद का..........
जगेन मी विसरूनि, भान एकदा तरी
......जगेन विस्मरुन देहभान एकदा तरी ?

गरीब की अमीर तो तमा मला नसो कधी
जगात मान लाभु दे, समान एकदा तरी
....व्वा.. चांगला शेर.

लढा सुरू मनात हा कशी जमेल शांतता.......उरेल शांतता/मिळेल शांतता ?
मरेन मी बनूनही, जवान एकदा तरी........... उत्तम शेर.

एकंदर्,अतिशय चांगल्या आशयाची गझल. Happy

डॉक... अनेक अनेक आभार!!!! एकंदर, बर्‍याच चुका आहेत.... पुढच्या वेळी नक्की काळजी घेईन... तुम्ही सांगितले, त्याप्रमाणे सगळे बदल करते आहे Happy

गरीब की अमीर तो तमा मला नसो कधी >> इथे "ती तमा" असायला हवे होते ना?>>> नितीन, तो हा प्रत्यय माणसासाठी आहे, तमा साठी नाही, तेंव्हा ती तमा असे होऊ शकत नाही... सकारात्मक प्रतिसादाबद्दल धन्यवाद! Happy

जगेन विस्मरुन देहभान एकदा तरी>>> व्वा व्वा! सानी, मस्त ओळ आणि चांगल्यापैकी सफाई! एकंदर 'सान' हे तखल्लुस घेणार बहुतेक तुम्ही! मी पाच वेळा वाचले ओपन करण्यापुर्वी, साती आहे की सानी! शेवटी भीत भीत उघडले आणि आवडली गझल! (अजून वाव बराच आहे, पण पहिला प्रयत्न म्हणजे झकासच!)

शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

तुलाच का मलाच का सदा असे विवाद का
जगेन विस्मरुन देहभान एकदा तरी

सान्ये, लई भारी!!! Happy गझलेच्या प्रांगणात स्वागत तुझं Happy

छान जमली

एकंदर 'सान' हे तखल्लुस घेणार बहुतेक तुम्ही!>>> बेफिकीरजी, असा काही विचार नव्हता... पण तुमच्या ह्या अंदाज वजा इच्छेचा मान ठेवत, ह्या गझलेपुरते गंमत म्हणून 'सान' हे तखल्लुस घेतले आहे... Happy

करेन मी अखंड कार्य थोर व्हावया जरी
रचेन शेर मी बनून 'सान' एकदा तरी
Happy

बेफिकीरजी, माझीया गीतातुनी, कणखर, मी मुक्ता, मुकु आणि क्रांती... माझ्या पहिल्या प्रयत्नाला मनापासून दाद दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानावे तितके कमीच आहेत... Happy

वेल बिगन इज हाफ डन!

असं काहीतरी वाचले होते ते खरे ठरले.

पहिला प्रयत्न म्हणजे नकाशा पोळी !

पण तुमची 'रंगीत होळी' होती !

अजून येऊ द्या

पु.ले.शु.

रामकुमार

सानी बाई तुमचा पहिला प्रयत्न आम्हांला आवडला.
काहीही सूचना नाहीत ......... फक्त मनातलं असंच लिहित चला पुढेही.