द वर्ल्ड ऑफ डिफरन्स - ८

Submitted by बेफ़िकीर on 22 February, 2011 - 08:47

मिनीच्या ओठांचा कच्चकन चावा घेऊन नवलेने आपल्या पुरुषी ताकदीचे तिला प्रत्यंतर दिल्याच्या आनंदात अभिमानाने तिच्याकडे पाहिले. जीवघेणी कळ आल्यामुळे मिनीने तोंड फिरवले होते आणि मूठ ओठांवर दाबलेली होती.

"क्या साब... आहिस्ता जरा..."

"आहिस्ता करेगा वो मर्द थोडी होता है??"

"खून आ जाता.."

"वो भी पी लेता मै.."

आज मिनी स्वतःहून कशी काय आली हे काही नवलेला समजत नव्हते. अर्थात, तो काही इतका बुळा नव्हता की त्याच्या अत्याचारांची ओढ लागून मिनी स्वतःहून येईल असे समजेल! पण आता आलीच आहे तर निदान मजा तरी करून घेऊ असा त्याचा विचार होता. तिची मागणी काय आहे त्याबाबत नंतर बघू असे त्याच्या मनात आले होते.

दोन दिवस झाले होते त्या घटनेला! मालपुरे समाधानी होऊन परत आपल्या एन्डीएपाशी असलेल्या क्वार्टरवर निघून गेला होता. त्याची फॅमिली तिथेच होती. जेलमध्ये तो पूर्णवेळ नसायचा. त्याला इतर अनेक जबाबदार्‍या होत्या. कैद्यांचे मानसशास्त्र शिकणे, विविध ठिकाणचे दौरे, हाय कमांडला रिपोर्टिंग वगैरे वगैरे! मात्र नसीम फरार झाल्याचे समजल्यावर त्याने त्याची कोअर जबाबदारी पार पाडलेली होती. अजूनही नवलेला मालपुरेच्या त्या व्हिझिटची आठवण आली तरी शहारे येत होते. 'आपल्यालाही त्याने मारले वगैरे असते' असेच नवलेला अजूनही वाटत होते. पण नसीम स्वतःच परत आला. तो कसा बाहेर गेला आणि का परत आला याबाबत त्याने दिलेले समर्थनही सगळ्यांना पटले. सुरक्षाव्यवस्थेची तीव्रता पाचपट वाढवून मालपुरे सगळ्या स्टाफला हग्यादम भरून निघून गेला. नवलेचे लेखी समर्थन अर्थातच फाडण्यात आले कारण नसीम परत आलेला होता. आणि आता नवलेची कातडी बचावली गेलेली होती. मात्र या दोन दिवसात नवले अक्षरशः डोळ्यात तेल घालून वावरत होता. इतकेच नाही तर आत जेलमध्ये सहसा न येणारा नवले आता रेग्युलरली आत येऊन व्यवस्था तपासत होता. राजासाबला तर त्याने जीव नकोसा होण्यापर्यंत ताणलेले होते. दर अर्ध्या तासाला राजासाबचे रिपोर्टिंग येत होते. आणि आजच समजले की मालपुरे आठ दिवसांसाठी मध्यप्रदेशात गेला आहे. एका सेमिनारला!

नवलेने आज रात्रीच व्हिस्कीची सोय करून ठेवलेली होती. मनात सारखे येत होते की दोन दिवसांपुर्वीचे टेन्शन कुठल्यातरी भाडोत्री बाईकडे जाऊन विसर्जीत करून टाकावे. पण ते शक्यही नव्हते कारण पुढचे पंधरा दिवस जेलमधून पाय बाहेर टाकायला मालपुरेने मज्जाव केलेला होता. बाहेरची बाई आत येणे अशक्य होते. मिनीलाही आत प्रवेश मिळणे दुरापास्त होते.

पण आज मिनीचाच नऊ वाजता फोन आला.

"साहब.. आपसे मिलने आ सकती हूं??"

गुरुत्वाकर्षण नसते तर नवलेने चंद्रापर्यंत उड्या मारल्या असत्या ते वाक्य ऐकून! पण तेवढ्यात त्याला धोक्याची जाणीव झालीच!

आजवर बाबूला हक्काने सांगायला लागायचे! 'मिनीला बोलाव' म्हणून! आणि आज ही स्वतःच??

नक्कीच! नक्कीच दालमे काला है, सच कहे तो पूरी दालही काली है!

पण हिला आत येऊ देणारच कसे मुळात?

जेलचे गेट संध्याकाळी सहाला बंद झाल्यानंतर मुंगीला प्रवेश नव्हता आतमध्ये!

पण नवलेची खाज? त्याने राजासाबला फोन लावला.

"कादिर.... नवले..."

"जी सर"

"दालमे कुछ काला है "

"क्या हुवा सर?" राजासाब हादरलाच!

"संजयबाबूकी बिवी मिलना चाहती है.."

"आपसे??"

"हं.."

"कब सर??"

"अभी.."

"अभी?? अभी कैसे मिलेगी??"

"वो तो अलगही सवाल है कादिर... पहले ये समझमे नही आता है के वो क्युं मिलना चाहरही होगी??"

आता मात्र राजासाब तिकडे भरदार मिशीतल्या मिशीत हासू लागला होता. मिनी इथे येते आणि नवलेच्या क्वार्टरवर पहाटेपर्यंत असते हे त्याला माहीत होते. पण नवलेचा वशीला दांडगा असल्यामुळे आणि स्वतःच्या बदलीची भीती असल्यामुळे तो कुठे बोलत नव्हता. आत्ता नवलेचा मानभावीपणा लक्षात आल्यामुळे राजासाब मिश्कील झाला होता.

"लेकिन.. अभी तो टायमिंगही नही है व्हिजिटर्स का??"

"कादिर.. लफडा लग रहा है मुझे.. कही... इन लोगोंका भागनेका प्लॅन तो नही??"

"मतलब??"

"मुझे लग रहा है के ये अंदर आकर बाबूसे मिलवानेको कहेगी.. और उसे प्लॅन बतायेगी.."

"हां लेकिन ये तो मिलनेका टायमिंगही नही है सर??"

"वही मैने उससे कहां.."

"फिर??"

"कहती है कुछ ऐसी बात है जो अभी बतानी है आपसे..."

राजासाबला आता अधिक हसू येऊ लागलेले होते.

"तो सीधा उससे बोल देते है सर... के कल आ.. ऑफीस टायमिंगमे.."

"मै तो कुछ औरही सोच रहा हूं कादिर..."

आता मात्र राजासाबने फोन लांब केला. काहीसे हसून त्याने 'खाकरल्याचा अभिनय' करत पुन्हा फोन जवळ घेतला..

"जी सर.."

"के उसे अंदर बुलाते है.. और समझलेते है के वो कहना क्या चाह रही है.."

"लेकिन सर.. ये इल्लीगल होगा.."

"हां.. लेकिन पाच कैदी भाग ना जाये इसलिये ये करना मुनासिब नही होगा?"

"सर.. हम उसे किस जुल्ममे अंदर करेंगे?"

"उसे अंदर थोडेही करना है?? सिर्फ पूछताछ.."

"सर.. मै समझता हूं के ये ठीक नही होगा.. अगर उसने कुछ ऐसीवैसी कंप्लेन की तो??"

आता मात्र नवलेच नखशिखांत हादरला. उद्या जर काही कारणाने खरच मिनीने मालपुरेकडे जाऊन तक्रार केली असती तर मालपुरेने नवलेला कच्चा खाऊन तृप्तीची ढेकर दिली असती. नोकरी गेली असती ते तिसरेच!

"ये बात भी सही है तुम्हारी.. मै तो कहता हूं के तुमभी आ जाओ यहां.. पूछताछ के लिये??"

नवलेला आता 'चौकशी'चा अभिनय करणे अत्यावश्यक होते.

"सर.. मै समझता हूं के पूछताछभी ऑफीस टायमिंगमेही करना ठीक रहेगा सर..."

"अंहं.. और कल वो आनेसे पहले ये पाच लोग भागगये तो?? चमडी उतारेंगे मालपुरेसाहब हमारी.."

या विधानावर मात्र राजासाबला एक सेकंद विचार करावासा वाटलाच! दोनच दिवसांपुर्वी इतके मोठे नाटक झालेले असताना नवले स्वतःहून मिनीला आत बोलावेल असे होणे अवघडच होते. त्यातच आज तो स्वतःहून आपल्यालाही सांगत आहे की ती येण्याचा प्रयत्न करतीय! तसे तर काय, नुसता पहारा बदलून त्याने त्याचे लोक लावले असते तरी ती आत आली असती. पण त्यात त्याला 'आपल्याला त्याचा डाऊट येईल' असे वाटल्यामुळे आपल्याला सांगतोय की काय? की आपल्याला विश्वासात घेण्याचे कारण हे आहे की त्याला खरोखरच संजयबाबूच्या बायकोचा संशय आला आहे?

काहीही असले तरी कर्तव्य ते कर्तव्यच होते. नवले हा साहेब होता. तो दाखवत असलेली भीती भयानक होती. काहीही कारणाने संजयबाबू किंवा पाचही कैदी पळून जाण्याची शक्यता असल्यास आवश्यक ती सर्व काळजी घेणे महत्वाचेच होते. नुकताच नसीम पळून जाऊन स्वतःच आला होता. आला होता म्हणून लाज तरी वाचली होती. नाहीतर राजासाबला तर वॉर्निंग मेमोच आला असता. सफेद कारकीर्दीवर एक काळा ठिपका लागता लागता वाचला. नसीमने परत येण्याचे कारण पटण्यासारखे असले तरी राजासाबला ते पटलेले नव्हते. पळून जाऊ शकलेला कैदी पुन्हा स्वतःच्या पायांनी जेलमध्ये येईल ही शक्यताच नव्हती. कितीही बाहेरच्या जगात भीती वाटली तरी शेवटच्या क्षणापर्यंत तो स्वातंत्र्यातच राहण्याचा प्रयत्न करणार होता. असे असताना तो परत आला कसा हा विचार राजासाबला अस्वस्थ करतच होता. त्यातच आत्ता नवलेसाहेबांचा फोन की संजयबाबूची बायको आत्ता भेटायचे म्हणतीय आणि आत्ता भेटण्याइतके तिच्याकडे महत्वाचे कारण आहे. संजयबाबू आणि नसीम एकाच बरॅकमध्ये! असे असताना ही घटना नवलेने स्वतःहून सांगणे ही बाब तितकीशी लाईटली घेण्याची नाहीच!

"सर... बात तो कुछ हजम नही हो रही है.. परसोही नसीम भागकर खुदही वापस आया है.. और आज उसी बरॅकके एक प्रिझनरकी बिवी आकर कहती है के उसे हमे अभीके अभी मिलना है.."

राजासाबने वापरलेला 'हमे' हा शब्द नवलेला जरा वैतागच आणून गेला. पण आत्ता त्याला त्याची पर्वा वाटत नव्हती.

"वही कहरहा हूं मै.. मेरे खयालसे एक स्पेशल केस बनवाके जो है.. हम उसे अंदर बुलालेते है.."

"लेडी पुलीस तो हैही अपने पास चार.."

"हं.. उन्हे लेकर तुम यहां आ जाना.. वो बाबूकी बिवी आनेके बाद.."

"जी जी.. ठीक है सर.."

आता नवलेसमोर एक वेगळाच प्रॉब्लेम निर्माण झाला. हे सगळे येणार म्हणजे दारू पिऊन बसता येणार नाही. त्याने अर्धवट घेतलेला पेग एका कपाटात तसाच ठेवला आणि बाटलीही ठेवून दिली. आणि सूचना दिल्या. 'स्पेशल केस' या नावाखाली एका मिनी बाबू नावाच्या महिलेला आत घ्यायचे आहे.

आणि अर्ध्या तासाने मिनी खरच आली.

चौकशीसाठी खरे तर ऑफीसमध्ये बसायला हवे होते. पण नवलेच्या सूचनेवरून सगळे त्याच्याच क्वार्टरमध्ये जमा झाले. महिला पोलिसांना हा प्रकार तितकासा आवडलेला नव्हताच! पण पर्यायही नव्हता आणि आरोपीची चौकशी आहे म्हंटल्यावर काही गरजही नव्हती विरोध दर्शवायची!

मात्र नवलेने एक मेख मारून ठेवलेलीच होती. मिनीला फोनवरच सांगितले होते की तुझी चौकशी अनेकजण करणार आहेत. तेव्हा 'काहीतरी खूप महत्वाचे आहे' असे दाखव! मात्र त्यावर मिनीने 'हो मग, महत्वाचे आहेच' असे सांगितले होते आणि नवले काहीसा चक्रावलेला होता.

मिनी आली ती सगळ्यांना बघून एकदम बावरली. पण तिने मनात ठरवलेले सरळ सांगून टाकले. तिचे अनुभवविश्व मर्यादीत होते. आपला नवरा निर्मल जैनचे काम करायचा आणि त्यात त्याने अनेकांचा जीव घेतला या भयावह बाबी ठाऊक असण्यापलीकडे तिला विशेष काही माहीत नव्हते. त्यामुळे तिने सांगितलेली स्टोरी ही त्याच विश्वाशी निगडीत होती.

'पाच दिवसांनी असलेल्या क्रीडास्पर्धेत अनेक पाहुणे येणार आहेत तेव्हा निर्मल जैन आपल्या सहकार्‍यांमार्फत बाबूचा मर्डर करणार आहे असे समजले' अशी स्टोरी तिने सांगितली.

अर्थातच या स्टोरीत काही दम नव्हताच! मात्र त्यातही राजासाबने नोटिस केलेली बाब म्हणजे मिनीला येथील कार्यक्रमांची यच्चयावत माहिती होती. याचाच अर्थ ती येता जाता सर्व नोटिसेस वाचत असणार! किंवा तिला हे कुणीतरी किंवा नवले स्वतःच सांगत असणार!

मात्र मिनी इतकीही भोळी नव्हतीच! तिने कथन केलेली स्टोरी सकृतदर्शनी खरी वाटण्यापुरतीच होती. त्यावर अर्धा तास चर्चाही झाली. राजासाब व नवलेचे हेही ठरले की निर्मल जैन आणि त्याच्या माणसांवर लक्ष ठेवायचे. आता पांगापांग व्हायची वेळ आलेली असतानाच मिनीने महिला पोलिसांना विचारले..

"मुझेभी जानका डर है मॅडम.. मै आज इधरच रह सकती हूं?.. सुबह चली जाऊंगी.."

नवलेला नेमके जे नको तेच झाले. मिनी राहिली तरी आता ती महिला पोलिसांच्या ताब्यात असणार होती. पटकन नवले म्हणाला..

"इधर सिर्फ प्रिझनर्स रह सकते है... तू नही रह सकती.. चल्ल.. अगर जानका डर है तो ठाणेपे रिपोर्ट लिखवा..."

नवलेला हे माहीतच नव्हते की मिनीलाही तेच हवे होते. तिलाही त्याच्याचकडे राहायचे होते. पण आता तर जेलमधूनच निघायची वेळ आलेली होती.

आता तिने अधिक तीव्रतेने विनंती केली तश्या मात्र महिला पोलिस अपेक्षेने नवलेकडे पाहू लागल्या. राजासाबने अक्कल पाझळली.

"सर.. यहा प्रिझनर्सकोही रखते है ये बात तो बिल्कुलही सही है.. पर... अगर किसीके जानको खतरा है.. तो इन्सानियतके तौरपे रख नही सकते क्या कुछ देर तक??"

नवलेला राजासाबचा राग आला तरीही त्याने स्टॅन्ड कायमच ठेवला.

त्यामुळे मिनीला जेलबाहेर काढावेच लागले आणि नवलेने त्याच्या माणसांमार्फत तिला त्याच क्षणी आतही घेऊन क्वार्टरकडे पुन्हा आणले. हा प्रकार राजासाबला समजूच शकला नाही कारण त्याला गेटवरून मिनी बाहेर गेल्याचा मेसेज आलेला होता. तो मेसेज येतो की नाही हे पाहायला तो जसा थांबलेला होता तशीच चारपैकी एक महिला पोलिसही थांबलेली होती. तिलाही तो मेसेज आल्यावर शंका उरली नाही. आणि इकडे नवलेच्याच दोन हवालदारांनी तिला गेटबाहेर काढून पुन्हा पाच मिनिटांनी आत घेतलेले होते. अंधार्‍या वाटेवरून ती धावत नवलेच्या क्वार्टरवर आली होती. यावेळेस तर तिला एस्कॉर्ट करायला हवालदारही नव्हता. हे आश्चर्य कसे काय घडले की हवालदारही आला नाही हे नवलेला समजेना! त्याने इन्टरकॉमवरून आपल्या माणसांना शिव्या घातल्या. त्यावर त्यांनी सूज्ञ उत्तर दिले. कुणी तिला चुकून पाहिलेच ती आमच्या हातातून सुटून पळत पुन्हा आत आली आहे असे सांगता तरी येईल. शिस्तीत आम्हीच आत आणतोय हे पाहिले तर मोठाच प्रॉब्लेम होईल.

आता मात्र नवले खुष झाला. त्याने पहिल्यांदा उरलेला पेग संपवला आणि मिनीला आवळली.

"मिनी... तेरे तो खयालसे भी कुछ कुछ होता है.."

"साब.. बात करनी है..."

"अबे रात गयी बात गयी.. काहेकी बात?? चल्ल... "

मिनीला समर्पण करावे लागणार हे माहीत होतेच! किंबहुना त्याशिवाय मनातली इच्छा पूर्ण होणार नाही हेही माहीत होते.

तिने सरळ उभे राहून स्वतःचे कपडे बिनदिक्कत काढायला सुरुवात केली. नवले हबकून हपापल्यासारखा मिनीच्या अंगप्रत्यंगांकडे पाहात होता. आता तर त्याला तिला स्वतःच्या जवळ ओढायचा विचारही स्मरणात येऊ नये इतकी नशा होत होती तिची!

मिनीच्या चेहर्‍यावर एकही भाव नव्हता. जणू ठरलेला व्यवहार असावा तसे ती आपले शरीर तास दोन तास नवलेच्या हवाली करणार होती आणि त्याच दरम्यान स्वत:च्या मनातील विषय काढणार होती. तिच्या चेहर्‍यावर शरमेचा लवलेष नव्हता. करायचंय काय लाजून? हा माणूस राक्षसासारखा झेपावणारच आहे, त्याला आपल्या चेहर्‍यावरच्या भावांशी कर्तव्यच नाही आहे तर लाजत बसण्यात कोणता हेतू आहे?

मात्र एका क्षणी नवले चमकला. मिनीच्या ब्लाऊझमधून एक कागद घरंगळून खाली पडला. नवलेमधील जेलर जागा झाला. त्याने तिच्याहीपेक्षा चपळाईने तो कागद उचलला. मिनी लाचार असल्याप्रमाणे नवलेच्या जवळ बसून त्याचे मन आपल्याबाबत कनवाळू असावे याचा प्रयत्न करू लागली.

"क्या है रे ये???"

"साहब... इतना देनेका था बाबूको..."

नवलेने कागद वाचला.

निर्मल जैनचा माणूस लालू छेडतो म्हणून मिनी आधी निर्मल जैनकडे तक्रार करायला गेलेली होती. पण तो भेटूच न शकल्यामुळे शेवटी ती नवलेकडेच आली. बाबूला विचारत होती की काय करू? बाकी बाबूला वाढदिवसाच्या शुभेच्छा होत्या आणि चक्क त्यात नवलेच्याही वाढदिवसाचा उल्लेख होता. कोणत्यातरी जमीनीचे काम झालेले नाही हेही लिहीलेले होते.

"मेरे जनमदिनकीभी मुबारक बात?? ** है क्या तू??"

"साहब... हमलोगोंके जनमदिनमे क्या होनेवाला है?? इसलिये मैने बाबूको लिखा के साहबके जनमदिनपर उन्हे ढेर मुबारक बाते और तोहफे मिलेंगे..."

"मेरा जनमदिन इस महिनेमे नही है.... बकवास करती है... लेकिन चल्ल.. गिफ्ट तो दे ही दे मुझे..."

नवले खदाखदा हासू लागला आणि क्षणात त्याला जाणवले की आपल्या रूममधले लाईटही लागलेले आहेत आणि आपण हासतोयही जोरात! याकडे कुणाचे लक्ष गेल्यास वेगळाच प्रॉब्लेम होऊ शकतो, अर्थात, माणूस मोबाईल फोनवर बोलू किंवा हसू शकतोच म्हणा, पण काळजी घेतलेली बरी!

मात्र या चिठ्ठीसाठी मिनीने इतका घनघोर प्रयत्न करावा याचा नवलेला राग येत होता. तसेच, ती चिठ्ठी तिने स्वतःहून न देता ती तिच्या कपड्यांमधून पडावी हे त्याला आणखीनच संतापदायक वाटत होते. तिला अद्दल घडवायलाच पाहिजे होती. नवलेने एक मंद दिवा सोडला तर सर्व लाईट बंद केले. राजासाबसारख्याला आपण फसवले याचा आनंद नव्याने मानत तो पुन्हा बेडपाशी आला आणि त्याने खण्णकन मिनीच्या कानफडात वाजवली.

याची अजिबात म्हणजे अजिबात कल्पना नव्हती मिनीला! पाचही बोटे उठली तिच्या गालावर! हेलपाटत ती आडवीच झाली होती बेडवर! दोन्ही हात आपल्या डाव्या गालावर दाबून धरत अत्यंत घाबरून तिने जवळच उभ्या राहिलेल्या राक्षसी देहाच्या नवलेकडे पाहिले. तिच्या डोळ्यातून त्या फटक्यामुळे आपसूकच पाणी आलेले होते. वास्तविक तिच्या मनात आत्ता नवलेबद्दल इतका पराकोटीचा संताप भरलेला होता की शक्य असते तर तिने त्याला खलासच केले असते. पण आत्ता तिचा हात अडकलेला होता. बाबूला इथून सोडवायलाच हवे होते. सोडवल्यानंतर कुठे जायचे याचा प्लॅनही तिने केलेला होता. बाबूशिवाय बाहेरच्या जगात एकटीने जगण्यात तिला राम वाटत नव्हता. अफाट प्रेम होते तिचे बाबूवर!

"** समझती है मुझे???"

नवलेने बेल्ट काढत हातात घेतला तशी घाबरलेली मिनी त्याच्या पोटाला बिलगली आणि म्हणाली..

"मत मारिये साहब.. बहुत सतारहा है लालू.. कमसेकम आप तो देखलीजिये एक बार उसे..."

"तू खुद दस लोगोंके साथ सोती है... आ???.... और सतीसावित्री बनके चिठ्ठी लाती है?? छुपाके??"

"छुपाके नही लायी साहब.. आपको वो चिठ्ठी दिलवानेके लियेही आयी थी.. वो गिरगयी..."

नवलेने बसून चिठ्ठी पुन्हा वाचायला घेतली मंद प्रकाशात!

मिनी डोळे विस्फारून नवलेकडे पाहात होती.

नवलेने किमान दहा ते बारा मिनिटे विविध प्रकारांनी ती चिठ्ठी वाचली. उलट सुलट करून पाहिली. काही अक्षरांमधून काही इतरच मेसेज निघतोय का हे तपासायला घेतले. प्रकाशात तो कागद धरून पाहिला.

"इसके वास्ते चिठ्ठी देनेकी क्या गरज?? मुझे ऐसेही बतासकती है??"

"साहब.. आपको कई बार बतायी... आपका ध्यान नही गया.. "

"*****... बकबक नही करनेकी... समझी??"

"साहब... इतनी चिठ्ठी दिलवादो ना उसे??"

नवलेने पुन्हा क्रोधाने तिच्याकडे पाहिले.

"क्या करेगी नही दुंगा तो??"

मिनीला माहीत होते काय करायचे ते! तिने नवलेच्या अंगावरून आपला नाजूक हात फिरवायला सुरुवात केली. पण आज नवले बधणार्‍यातला वाटत नव्हता. अजूनही त्याला संशय येतच होता. इतक्या किरकोळ गोष्टीसाठी ही चिठ्ठी कशाला देईल? साधा निरोप तर आपणही सांगू शकतो. आणि मुख्य म्हणजे हिने ही गोष्ट आपल्याला सांगून जर बंडगार्डन चौकीत लालूविरुद्ध कंप्लेन्ट केली तर आपण लालूला चांगलाच धडा शिकवू हे हिलाही माहीत आहे. मग अगदी आपल्याकडे इतक्या रात्री येऊन महत्वाचे बोलायचे आहे असे सांगून ही चिठ्ठी आपल्याला का देतीय ही बाई??

सगळाच प्रकार बोगस निघाला. हिने जे कारण सगळ्यांसमोर सांगितले त्याच्याहीपेक्षा फालतू बाब आपल्याला आता एकांतात सांगतीय!

"एक बात बता... ये निर्मल जैन उस दिन बाबूको उडानेवाला है... ये सच है या झूठ??"

"वो तो झूठ है साहब.."

नवलेला जाणीव झाली. मिनी सगळ्यांसमोर वेगळेच, दिशाभूल करणारे बोलली होती. आत्ता जर ती असे म्हणाली असती की 'तेही खरे आहे' तर नवलेला समजले असते की ती एक नंबरची बनेल आहे. पण तिने प्रामाणिकपणे ते खोटे असल्याचे सांगितलेले होते.

"ये चिठ्ठी देनेसे अच्छा मैही बाबूको ये बात बोलदू तो??"

मिनीने आपले ओठ नवलेच्या छातीवर टेकवले अन कुजबुजत म्हणाली..

"साहब.. चिठ्ठी देना जरूरी है.."

"क्यूं???"

"आप ठीकसे चिठ्ठी पढेंगे तो समजजायेंगे सरजी..."

ही वेळ मात्र नवलेच्या दचकण्याची होती. तिने मिनीला आणि तिच्या स्पर्शामुळे निर्माण होऊ पाहणार्‍या स्वतःच्या मनातील विचारांना बाजूला सारून पुन्हा चिठ्ठी हातात घेतली.

आता मिनी नवलेला चिकटून त्याच्या डोळ्यांकडे मिश्कीलपणे बघू लागली. नवलेची पंचाईत होऊ लागलेली होती. एक तर चिठ्ठीत काय गोची आहे हे कोडे उकलणे टॉप प्रायॉरिटी होती तर तिच्या स्पर्शाने त्याचे हात शिवशिवू लागलेले होते.

"क्या है इसमे??"

"देखिये आपही साहब"

नवलेने संतापाने तिला दूर ढकलले तरीही ती मिश्कीलपणेच पाहात होती.

"चेंबरमे उल्टी लटकाकर फटके लगवाउंगा बीस..."

"आप तो मारामारीके अलावा कुछ जानतेही नही है"

"जल्दी बक इस चिठ्ठी मे क्या है???"

"इक बार पढके तो देखिये ना साहब..."

नवले पुन्हा बारकाईने चिठ्ठी वाचू लागला उभ्यानेच!

मिनीने त्याच्या पोटाला मिठी मारत मिश्कीलपणे सांगितले.

"जोरसे पढिये सर... मनमे नही..."

नवलेने संशयाने मिनीकडे पाहात चिठ्ठी मोठ्याने वाचायला घेतली.

"बाबू, लालू बहुत छेड रहा था आज! मै कहींकी नही रहुंगी! निर्मल जैन साहबसे कहना चाहती थी! पचास बार ऑफीसमे गयी उनके! भगवानका लाख शुकर है के हमे नवले साहब जैसे साहब मिले! क्युंकी जैन साहब तो हरामी आदमी है! वो मिलेगा कहा? जनमदिन है ना इस महिनेमे? वही खयाल रखनेके लिये ये चिठ्ठी भेजी है! जल्दी बता, क्या करू? जमीनका सातबाराभी नही हुवा! तेरा हाल कैसा है? चौदा तारीख है जनमदिनकी के अठरा के चोबीस? भूलभी गयी! तिरालीस साल का होगा तू अब! और मै तैतीस की! नवलेसाहबको इक्यावनवा साल लगेगा शायद, बीचमे इक बार कहरहे थे, पर उनको तो क्या पच्चीस गिफ्ट मिलंगे! हम गरीबोंको क्या? और फिर बाकी सब ठीक!

"क्या है इसमे??"

मिनी अजून हासतच होती. नवलेने पुन्हा हात उगारला तशी ती दचकून बाजूला झाली. आत्ताच खाल्लेल्या थपडीच्या वेदना अजून तश्याच होत्या.

"अब एक सेकंदके अंदर अगर नही बताया के इसमे क्या है... तो बुरी हालत करुंगा तेरी..."

मिनी आता बेडवर उताणी पडलेली होती तर नवले बेडपाशी कर्दनकाळासारखा उभ होता. जेलमध्ये चिठ्ठी वाचू शकणारा, म्हणजे कोड मेसेज डिकोड करू शकणारा एक तज्ञ होता खरा, पण तो दिवसा यायचा! पण तसेही मिनीला दोन थपडा दिल्यावर तिने सांगितलेच असते.

मिनीने मिश्कीलपणे हासत स्वतःच्याच ओठांवरून स्वतःची जीभ फिरवली आणि नवलेला आणखीनच चिडवले.

नवलेलाही क्षणभर वाटले की हिच्याशी दंगामस्ती झाल्यानंतरच हिला फोडून काढावी. पण दोन दिवसांपुर्वी झालेल्या नसीमच्या प्रकरणाच्या स्मरणामुळे मनातील जेलर मनातील पुरुषावर सुपिरियर ठरत होता. नवलेच्या नजरेत पुन्हा हिंसक भाव तरळले तशी मिनी हासत हासत उठली आणि तिने नवलेला स्वतःच्या शेजारी ओढून बसवले. अजूनही खाऊ की गिळू अशा नजरेने बघणार्‍या नवलेला ती म्हणाली..

"सातबाराके बारेमे लिख्खा है ना उसमे??"

नवले पुन्हा चिठ्ठीत डोके घालून 'हं' असे म्हणाला..

"और सातवा शब्द क्या है चिठ्ठीमे???"

नवले हतबुद्ध होऊन मिनीकडे पाहू लागला तशी मिनी अगदी मादकपणे हासली.

नवलेने चिठ्ठीत पाहिले तर सातवा शब्द होता 'आज'!

मग नवलेने पटकन बारावा शब्द पाहिला तो होता 'निर्मल'!

नवलेने मिनीकडे पुन्हा पाहिले.

"तेरा हाल कैसा है ऐसा लिख्खा होगा ना आगे??"

नवलेने तेरावा शब्द पाहिला! 'जैन'!

"आज निर्मल जैन..." नवले म्हणाला..

"हं.. और क्या लिख्खा है?? जनमदिनकी तारीख चौदा है या अठरा या चोबीस?? भूलभी गयी..."

"चौदा.. साहबसे.. अठरा.. पचास... चोबीस.. लाख... मिनी??? निर्मल जैनसे तुझे पचास लाख मिले????"

मिनीने लाडात येऊन नवलेच्या कानात जिभेने गुदगुल्या केल्या. नवले मात्र हादरलेला होता. पन्नास लाख ही किंमत बरीच होती त्याच्या दृष्टीने!

"किसलिये दिये???"

"लालूसे मन भरगया उनका.."

"तो???"

"तो क्या?? बाबू चाहिये अब उन्हे..."

"उसकी मां की.."

"आगे तो पढिये साहब.. तिरालीस साल का होगा तू.. और मै तैतीस की.. और नवलेसाहबको इक्यावनवा साल लगेगा शायद..."

"सव्वीस, सत्तावीस, अठ्ठावीस, एकोणतीस, तीस, एकतीस, बत्तीस, तेहतीस.. कहां.. चौतीस.. पस्तीस............ त्रेचाळीस.. रखनेके .... अठ्ठेचाळीस.. पन्नास... एक्कावन्न... है... कहां रखनेके है???"

"हं... "

"तू तो गयी अब अंदर..."

मिनीला अपेक्षित तोच संवाद होता हा! तिने लगेच अधिकच लाडीकपणा सुरू केला. नवलेला आता मात्र तिच्याशी काहीही संबंध ठेवावासा वाटत नव्हता. कारण या प्रकरणाचा त्याला सुगावा लागलेला होता. त्याने तिला दूर ढकलले आणि म्हणाला..

"बाबू छुटेगा कब यहांसे जो निर्मल जैनके हाथ लगेगा..."

"क्या साहब... आप भी... इतना तो कीजिये गरीबके लिये..."

"अच्छा.. तो अब मुझसे प्रिझनर भगवायेगी... अं??"

"अंहं.. आजादी खरीदना चाहती हूं सर... गव्हर्नमेन्टसे... "

"मतलब???"

"आधीअधुरी चिठ्ठी पढते है आप... नवलेसाहबकि गिफ्ट कितने मिलेंगे वो भी तो पढिये??"

नवलेने चिठ्ठी वाचली आणि चमकूनच मिनीकडे पाहू लागला. मिनी अजूनही स्वतःच्या गळ्यातल्याशी चाळा करत होती.

"मतलब... पच्चीस लाख मुझे??"

"और साथ मे मै... "

"मतलब??"

"आप जब कहेंगे.. हाजीर होजाउंगी.."

"** समझके रख्खा है??"

नवलेने केलेला तो आणखीन एक प्रहार मात्र जीवघेणा होता. स्त्री आरोपीला मारायचे नाही हा नियम धुडकावत नवलेने दुसरा प्रहार केलेला होता. घुसमटत्या आवाजात किंचाळून मिनी पलंगाखाली जमीनीवर पडली. नवलेने पुढचे मागचे काहीही न बघता आणखीन एक सणसणीत लाथ घातली तिला! धिस वॉज टू मच! मिनी याचा सूड घेणारच होती. मात्र आत्ताची वेळ नाटक करण्याची होती. तिने नवलेच्या पायांना हातांची जुडी घालून न मारण्याची विनंती केली. नवलेने तिला धुडकावले आणि कपाटापाशी जाऊन त्याने बाटलीतले चार पाच घोट ड्रायच मारले. एक ब्रिस्टॉल शिलगावून तो सोफ्याशेजारच्या खुर्चीत धाडकन बसला.

विचार, विचार, विचार! फक्त विचार! वेदनांनी तळमळणारी मिनी कशीबशी उठत पलंगाला धरून त्यावरच बसू पाहात होती. तिचा एक हात तिच्या पोटावर तर दुसरा उजव्या गुडघ्यावर दाबलेला होता. नवलेचे तिच्या अर्धावृत्त शरीराकडे आत्ता लक्षच नव्हते. त्याच्या मनातले विचार वेगळेच होते. एक बाबू आणि एक मिनी! केवळ एक बाबू आणि एक मिनी! असले अनेक बाबू आणि अनेक मिन्या आयुष्यात येऊ शकल्या असत्या. कदाचित हीच मिनी म्हणतीय त्याप्रमाणे हीसुद्धा परत आलीच असती. नसती आली तरी अनेक इतर मिन्या मिलाल्या असत्या. करायचंय काय? तर फक्त बनाव करून बाबूला इथून सोडवायचा. दॅट्स ऑल! नथिंग एल्स! त्या बदल्यात पंचवीस लाख!

पंचवीस लाख! ही रक्कम काही दुर्लक्षनीय नव्हती. आपल्या टुकार गावाकडे एक अवाढव्य फार्म हाऊस बांधता आले असते. नोकर चाकर ठेवता आले असते. पैसा कुठून आला याचे उत्तर द्यावे लागावे इतकाही तो पैसा नव्हता.

दहा मिनिटे! दहा मिनिटे आढ्याकडे बघत नवले फक्त आणि फक्त विचार करत होता. मिनी भकास नजरेने त्या राक्षसाकडे पाहात होती. जसजसा वेळ जात होता तसतशी तिची आशा अधिकाधिक पल्लवीत होत होती. कारण आज रात्री उपभोगून नवलेने तिला उद्या पुन्हा ताब्यात घेऊन अटकही करवली असती. पण ज्या अर्थी तो विचार करत होता त्या अर्थी पंचवीस लाखांची उब त्याला आत्ताच जाणवू लागलेली दिसत होती.

आणि एका क्षणी अचानक ताडकन मान फिरवून त्याने मिनीकडे पाहिले. दचकलीच मिनी!

"कैसे छुडानेका है उस *****को??????"

दचकलेली मिनी फस्सकन हासली.

"फिर हसेगी तो सारे दात हाथमे देदुंगा.."

"आप जैसा ठीक समझे वैसेही छुडवाना है सर... हम क्या छुडवायेंगे उसे..??"

"कितने दिन मे??"

"वो भी आपहीपर है सर.. जैसा आप चाहे.."

"पैसा अ‍ॅडव्हान्स??"

"आप कहे तो लादुंगी सर.. तीन चार दिनमे.."

"कलही क्युं नही??"

"आजही पैसा मिला है... आजही मै यहां आयी भी हूं... कुछ इन्तझार अच्छा रहता है..."

"बकती बहुत है तू..."

"लडतीभी बहुत हूं वैसे... लेकिन आपके सामने हिम्मत नही होती..."

नवलेला आपल्या नालायक पुरुषार्थाचा अभिमान वाटला.

"और अगर पैसे लेकर मैने उसे नही छोडा तो??"

"तोभी मै क्या करसकती हूं??"

"ये बचे हुवे कपडे उतारती क्युं नही??"

मिनीने पलंगावर उताणे पडून दोन्ही हात डोक्याखाली घेऊन नवलेकडे पाहात वाक्य उच्चारले..

"क्या करना है?? आप तो मारही रहे है.. प्यार कहां कर रहे है???"

निर्लज्जपणे हासत नवले बेडकडे सरकला.

एक तासाने त्याचा कामदाह शांत झाल्यानंतर त्याला पुन्हा कंठ फुटला.

"ये सब... ये सब करना जरूरी है क्या?? मेरी बनके रह.. बाबू अब मर्दभी नही रहा होगा.."

"जैसा आप कहे साहब.. उसकी बनकरभी तो मै आपहीकी रहुंगी ना??"

"हं... आया करेगी ना?? बुलानेपर??"

"आज आपने बुलाया था???"

नवले हासला. आज त्याने न बोलवताच मिनी आली होती.

"आज तो तेरा काम था रानी मेरे पास??"

"तो बिना कामके आती हूं एक दो दिनमे.. फिर सोचलीजिये.."

"अच्छा चल... फिर तैय्यार होकर आ..."

"सॉरी सर... अब जाना पडेगा... "

"क्युं??"

"जैनसाबके लोग ध्यान रखरहे है मै कहा कहा जाती हूं.. पैसा बाबूकोही दे रही हूं या नही.."

"उस जैनकी ऐसी की तैसी..."

म्हणेपर्यंत मिनी उठून गेलीही बाथरूममध्ये!

नवले पुन्हा विचारात गढला. प्रस्ताव वाईट नव्हता. स्वतःच्या अधिकारात बाबूला कसाही घालवता आला असता. पळूनच गेला असे दाखवता आले असते. तेही आत्ता नाही, नसीमचे प्रकरण सगळे विसरून गेल्यानंतर कधीतरी सहा महिन्यांनी! एकदा हातात पंचवीस लाख आल्यावर घाई कशाला करायला हवी आहे? खरे तर बाबू आणि मिनीचा तसा तर संबंधही येऊ न देणे आपल्याला शक्य आहे. पंचवीस लाख घेतले आणि मिनीला कारणे सांगत सांगत भोगत बसलो तरी ती आपले वाकडे करू शकतच नाही. इथली सत्ता आहे आपल्याकडे! आत्तापर्यंत आपण भ्रष्ट झालो नाहीत असे नाही. पण इतका मोठा आकडा कुणी ऑफर केलेला नव्हता. अगदी त्यातले पाच लाख इथल्या स्टाफला देण्यात गेले तरी चालेल. आणि मी म्हणतो आपले बाबूशी शत्रूत्वच काय? काहीच नाही! उलट तो आपल्याला त्याची बायकोही देतो. चांगले जोडपे आहे. त्याला सोडून दिला तर काय बिघडले? नाहीतरी साले सात सात मर्डर केलेल्याला न्यायालय सहाच वर्षांची शिक्षा देते. त्यातली दोन तर झालीही! मग आपण सोडले तर बिघडले काय समाजाचे?

मिनीबाहेर येईपर्यंत नवलेचा लबाड विचार पक्काही झालेला होता. ती बाहेर आली आणि नवलेपाशी बसली.

"निकलती हूं साब.."

"हं.."

"काम... करनेका है ना??"

"देखता हूं..."

'देखता हूं'चा अर्थ काम होणार, फार तर पंचवीस लाखाऐवजी चाळीस मागेल हे मिनीला समजले. मुळात पैसे द्यायचेच नसल्यामुळे एक कोटी मागीतले तरी प्रॉब्लेम नव्हताच. नवलेसमोरच स्वतःच्या पर्समधील पावडर आणि लिपस्टिक बाहेर काढत तिने उघडी पर्स तशीच ठेवली. नवलेचे लक्ष पर्सकडे गेले..

"अरे??? ये क्या??? तू पीने लग गयी??"

"अरे?? ..ओह... याद आया... सर.. ये... ये इतना तो पहुंचादीजिये ना बाबूतक.."

नवलेने हासत हासत मॅक्डोवेलची क्वार्टर हातात घेतली. साधी दारूने भरलेली, हाताच्या पंजात मावणारी काचेची बाटली!

तरी त्याने एक दोनदा तपासलीच! चांगली सील्ड होती.

आणि मग हासत हासत म्हणाला..

"एक बार मुझे भी पिला अपने हाथोंसे??"

"जरूर सर... जब मर्झी..इतना.. देदेंगे ना उसे???"

"एक क्वार्टर?? वहां स्साले पाच पाच हरामी बैठे है.. एक बोतल तो लाती.."

"लायेगी साहब.. नेक्स्ट टाईम.. चलूं मै???..."

"हं... "

नवलेचा मनापासून किस घेऊन मिनी चोरट्या पावलांनी बाहेर पडली तेव्हा मात्र तिला एस्कॉर्ट करायला दोन हवालदार पन्नास एक फुटांवर गस्त घालण्याचे काम करत होते.

मिनी सहीसलामत जेलबाहेर पडली तेव्हा नवले अस्ताव्यस्तपणे बेडवर पडून स्वतःच्या फळफळलेल्या भाग्याबाबत विचार करत होता.

आणि त्याच्या हातातली मॅक्डोवेलची क्वार्टर....

... दुसर्‍याच दिवशी दुपारी जशीच्या तशी बाबूच्या हातात गेली होती...

दारू देणे हे जणू पुनर्जन्म देण्यासारखे मोठे कार्य आहे असा लाचार चेहरा करत बाबू जेव्हा नवलेकडे बघून हासून बरॅकमध्ये आला....

.... आकाशने झडप घालून ती बाटली हातात घेतली... खूप वेळ तपासली...

अन म्हणाला...

"हे काय???? काहीच लिहीलेले नाहीये....."

आकाशच्या आणि नसीमच्या नावाने सगळे शिव्या देणार तेवढ्यात नसीम म्हणाला..

"कोई तस्वीर उतारी है क्या पेनसे??? कहरही थी... प्लॅन बता तो नही सकी... क्युंकी टाईमही नही मिला"

लेबल जपून काढले आकाशने!

हो! होते खरे एक चित्र! पण त्याचा अर्थ समजतच नव्हता. आकाश गोंधळलेला पाहून वाघने कागदावर झडप घातली अन सगळेच डोके घालून ते पाहू लागले..

"स्साला.... क्या दिमाग है.... "

वाघचे ते वाक्य ऐकून चक्रावून सगळे त्याच्याकडे पाहात होते...

"क्या हुवा वाघ????"

"दारूचा एक थेंबही कुणी प्यायचा नाही..."

"का??"

"बुधवार कधी आहे??"

"अं?? .. परवाय बुधवार .... का??"

"ब्लॅन्केट ट्रक..."

"..... तिच्यायला...."

आ वासून बाबू वाघकडे पाहात होता. दर बुधवारी संध्याकाळी ब्लॅन्केट बदलण्यासाठी नवी घेऊन येणारा आणि जुनी घेऊन जाणारा ट्रक यायचा. मिनीने अगदी संधीप्रकाश कळावा म्हणून अस्ताला जाणारा सूर्य वगैरेही दाखवलेले होते चित्रात! त्या ट्रकमध्ये बसणे शक्य होते. कारण इन्टर्नल चेकिंग काय करणार? कैदीच लावले जायचे त्या कामाला! सगळी ब्लॅन्केट्स वाटायची आणि जुनी कलेक्ट करायची. तो ट्रक तिथून आतच असलेल्या एका भट्टीपाशी जायचा! तिथेच थांबायचा. कैदी ज्यातून बाहेर जाणारच नाही त्या ट्रकचे चेकिंग कोण कशाला करेल?? आणि रात्री ट्रकमधून बाहेर यायचे. पुढचे चित्र अनेक क्वार्टर्सचे होते आणि एका क्वार्टरवर एक खुण होती. ते काही कळेना! तेवढ्यात आकाश म्हणाला..

"नवलेची क्वार्टर असणार ती... तीन चांदण्या आहेत ना त्या????"

अवाक होऊन आणि वरचा श्वास वर आणि खालचा खाली असे सगळे आकाशकडे पाहात असतानाच बाबू म्हणाला..

"हां... और ये मिनी आकर सबके सामने किसीकी कंप्लेन कररहेली है..."

"किसीकी क्या?? वो भी नवलेच है... वहां भी चांदनी है.."

मुल्लाला शोध लागला.

नसीम तर उड्याच मारू लागला. त्याच्या वाघने एक कानाखाली ठेवून दिली. तेव्हा नसीमला समजले की गंभीर दिसायला हवे आपण!

"और ये... स्साला ये क्या है??? "

ते चित्र मात्र सुधरतच नव्हतं! नवलेच्या क्वार्टरमध्येच लपल्यावर तिथे शोध कुणीच घेणार नव्हतं हे एक गृहीत होतं, पण बरचसं खरं गृहीत वाटत होतं ते! आणि आत्ताच नसीम जाऊन पुन्हा आल्यामुळे या पाचजणांचा त्या नसीमच्या पलायनाशी संबंध जोडून सगळे बाहेरच जास्त शोध घेणार हे नक्की होतं!

नवलेच्या क्वार्टरपासूनच एक लाईन होती नुसती. ती लाईन पार अगदी लांबवर जाऊन वगैरे एका बिल्डिंगपाशी निघत होती. आणि त्या बिल्डिंगच्यावर एक क्रॉसही होता आणि शेजारी उगवता सूर्यही!

आकाशच्या डोक्यात प्रकाश पडला. नवलेच्या घराजवळ काहीतरी मार्ग नक्कीच आहे बाहेर जायचा! ड्रेनेजच असणार! पण सूर्य मावळल्यापासून उगवेपर्यंत त्या रूममध्ये?? माय गॉड!

पण हळूहळू ती कल्पना पटू लागली. वाघने वर अ‍ॅड केले. ब्लॅन्केट ट्रकवाल्याला दारूचा मोह दाखवून काही वेळ गुंतवायचे. तेवढ्यात बाकीच्यांनी आत चढायचे. मग शेवटी राहिलेल्याने ड्रायव्हर आणि हेल्पर आत चढल्यावर हळूच चढायचे. मात्र, हे सगळे इतर कैद्यांना दिसू नये याचा उपाय काय?

त्याच मुद्यावर चर्चा करण्यात त्या दिवशीची संध्याकाळही उगवली. इकडे नवलेने अर्थातच ती चिठ्ठी बाबूल दिलीच नव्हती. कारण त्या चिठ्ठीचा आता काही उपयोगच राहिलेला नव्हता.

आणि .... रात्री झोपण्यापुर्वी आकाशने खूप वेळ ती चित्रे पाहिली... अन शेवटी म्हणाला.....

....

"आदमी तो.... एकही दिखाया है भागते हुवे....??????"

सगळ्यांचे चेहरे हिंस्त्र झाले... सगळेच चक्रावून एकमेकाकडे पाहू लागले...

"भागेगा कौन??... बाबू?????"

पाचपैकी आकाश आणि बाबू यांचे दोन चेहरे सोडले तर बाकी तीनही चेहरे....

...... संजयबाबूकडे अत्यंत हिंस्त्र नजरेने पाहात होते...

गुलमोहर: 

मस्त ...

छान होता .....मी तुमच्या सगल्या कथा वाचल्या आहेत्...खुप मस्त लिहीता तुम्ही

वाव.....
काय सहि आयडिया आहे, मात्र मिनिला झालेला त्रास... मनाला त्रास देऊन गेला. पण एक म्हण आहे ना कुछ पाने के लिये कुछ.....,

अगोदर च्या भागात वाचलेले आठवतय बाबु जेल म्धुन सुटल्यावर मिनिला काहि तरि कारण काढुन आपल्या पासुन दुर करणार.... हाय रे नशिब, ति बिचारि ज्याच्या साठि सगळ करते त्याच्या मनात हे अस्ले विचार....
होप सगळ चांगल व्हावे.
भुषणराव सलाम तुम्हाला......