केल्याने भाषांतर - प्रवेशिका ६ (स्वाती_आंबोळे)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 22 February, 2011 - 05:45

मायबोली आयडी : स्वाती_आंबोळे

मूळ (इंग्रजी) कविता :

The Gardener LI: Then Finish the Last Song

Then finish the last song and let us leave.
Forget this night when the night is no more.
Whom do I try to clasp in my arms? Dreams can never be made captive.
My eager hands press emptiness to my heart and it bruises my breast.

- Rabindranath Tagore

भाषांतर :

सूर विरता भैरवीचे दूर जाऊ येथुनी
रात्र ही संपेल तेव्हा रात्र जाऊ विसरुनी!
काय घेशी बाहुपाशी? स्वप्न का हाती ठरे?
पोकळी कवळू पहाता काळजा पडती चरे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम. स्वातीताई, तुम्ही जर मनावर घेऊन टागोरांच्या सगळ्या कवितांचा भावानुवाद केलात तर मराठी भाषेतला तो एक अमूल्य ठेवा ठरेल.

स्वाती,खूप सुंदर.भावानुवाद आवडला.
मला तर अनुवादातलीच शब्दरचना जास्त परिणामकारक वाटली !! (उदा. भैरवी, पोकळी, 'काळजा पडती चरे')>>अनुमोदन Happy

सर्वांचे मनापासून धन्यवाद. Happy

रैना म्हणते त्याप्रमाणे The Gardener या संग्रहातील कविता मूळ बंगालीतून इंग्रजीत अनुवादित केल्या गेल्या आहेत. आणि ते भाषांतर खुद्द टागोरांनीच केलं आहे. Happy

केवळ म हा न ! ! !!!!!
अनुवाद प्रचंड आवडला. पण ४च ओळींची कविता का निवडली? PLEASE अजुन येवूदेत ना!
वाचकांची भूक भागलेली नाही.

स्वातीताई,
कविता छान आणि अनुवाद पण सुंदर.

मला पण थोडी स्फूर्ती मिळाली तुमचा अनुवाद पाहून. रागावू नका हं.

मग संपवून टाक शेवटचं गाणं
आणि चल निघूया आता
विसरून जा ही रात्र
रात्र विरता विरता
कुणाला जखडू बाहूंच्या विळख्यात?
स्वप्नांना का कुठे बांधता येतं?
माझे अधिर हात चाचपतात हृदयाचं रितेपण
आणि उराला पडती हजार क्षतं

मोजक्या आणि नेमक्या शब्दात भाषांतर झालं आहे कवितेतं. कमी शब्दात खूप काही हे चांगल्या कवितेचं एक लक्षण आहे. मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद!

देवयानी, चांगला आहे प्रयत्न पण कविता म्हंटली की शब्द फार जपून वापरावे लागतात.

!

Pages