Submitted by गणेश कुलकर्णी on 16 June, 2008 - 09:47
कबर मी माझी काल खोदली होती
कसे सांगु सखे मला, तुझी किती याद आली होती
लावली होती कुणीतरी एक पणती शेजारी
तुला भेटण्यास ती ही किती तडफडत होती
तुला मी आवडतो इतुका किती कसा ?
म्हणे यमाची छातीही तेव्हा धडधडत होती
ठेऊन गेला होता माझा शेष नदीतीरी कुणी
कावळेही तुझ्या आंसवांची वाट पाहात होती
पवित्र्य गंगेवरी सोडल्या होत्या माझ्या अस्थी
तुझ्या नावाचीच बघ नेमकी पाण्यावरी तंरगत होती.
: गणेश कुलकणीं (समीप)
गुलमोहर:
शेअर करा
सुंदर
सुंदर आवडली
नाही
नाही पोहचली तितकी.. शेवटचा शेर मात्र सुंदर.
खुप वेळ
खुप वेळ देउन सुद्धा ग़झल नीट जुळली नाही असे वाटले. पण विचारातले भाव आवडले.
नरेन्द्र
गणेश, वरील
गणेश,
वरील रचनेत गझल ची तांत्रिक बाजू सांभाळलेली नाही. गझलेच्या आकृतीबंधाचा अजून अभ्यास करावा असे सुचवावेसे वाटते.
चू. भू. दे. घे.
- नचिकेत
नचिकेत शी
नचिकेत शी सहमत.....
धन्यवाद! मी
धन्यवाद!
मी आत्ताच कुठे गझल लिहायला सुरुवात केली आहे, मी माझ्या पुढ्च्या गझलेत नक्किच तांत्रिक बाजू सांभाळेन.