मला आवडलेले चित्रपट : To Kill a Mockingbird

Submitted by नेतिरी on 15 February, 2011 - 16:55

हार्पर ली च्या पुलित्झर विजेत्या कादंबरीवर आधारीत हा नितांत सुंदर चित्रपट.आता जवळपास नामषेश झालेल अमेरिकन खेडेगावातल संथ जीवन, टीव्ही इंटरनेट च्या पूर्वी असलेले रस्त्यावर चाक फिरवणे, झाडावर चढणे संध्याकाळी घरातून हाका ऐकू येइ पर्यंत चालणारे खेळ. दाहक वर्णभेद आणी त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत घडलेल्या काही प्रसंगा मूळे छोटी स्काउट एक महत्वाचा धडा आपल्या वडीलांच्या मदतीने कसा शिकते याच अप्रतिम चित्रण यात आहे.

चित्रपट अलाबामातल्या मेकाँब या काल्पनिक गावात घडतो (लीच बालपण मन्रोव्हील या अलाबामातल्या लहान गावत गेल,ही कथा तिने लहानपणी अनूभवलेल्या सत्यघटनांवर अधारीत आहे).जॉर्जीया, अलबामा, साउथ कॅरोलाइना, लुइझियाना, मिसीसिपी या राज्यात पूर्वी मोठ्या प्रमाणात गुलामगिरी अस्तित्वात होती.अमेरिकन सिव्हील वॉर नंतर कायद्याने त्यावर आळा बसला असला तरी आफ्रीकन अमेरीकनविषयी तिरस्कार आणी वर्णभेदाची तिव्र दरी समाजात अगदी साठच्या दशकात येऊन सिव्हील राइट चळवळ सुरु होउपर्यंत होती (काही प्रमाणात अजूनही आहे).

चित्रपटाची कथा तीसच्या दशकात आलेल्या ग्रेट डीप्रेशन च्या काळात घडते.जीन लुइस "स्काउट" फींच (Mary Badham) आणी जेरेमी अ‍ॅटीकस "जेम" फींच (Phillip Alford) ही भावंड मेकाँब मधे आपल्या विधूर वडीलांबरोबर राहतात.यांचे वडील अ‍ॅटीकस फींच (Gregory Peck) हे काउंटी कोर्टात वकील आहेत.शेजारी मावशी कडे रहायला आलेला डील (John Megna) हा यांचा नवीन मीत्र (हे पात्र ली चा लहानपणीचा खेळगडी ट्रूमन कपोती वर आधारीत होत).या तिन्ही मूलांचा दीवस गावभर भटकण्यात आणी "बू रॅडली " या शेजार्‍याच्या सूरस कथा एकमेकांना सांगण्यात आणी त्याच्या घरात डोकावून पाहण्यात जातो.बू घरातून कधीच बाहेर येत नाही, गावात त्याच्या विषयी बर्‍याच अफवा आहेत.तो नेहमी कात्री घेउन कागद कापत असतो, त्याने आपल्या वडीलांच्या पायात कशी कात्री भोसकली होती, रात्री तो खीडकीत कसा येतो यावर बरीच चर्चा ही मूले करतात.अ‍ॅटीकस ने दोघांना बू ला आजीबात त्रास न देण्याविषयी बजावून ठेवलय पण मूलांची उत्सुकता काही त्यांना स्वस्थ बसू देत नाही.एकदा त्याच्या घरात डोकावण्याच्या नादात जेम ची पँट तारेत अडकून फाटते, ती तिथेच सोडून तिघे पळत घरी येतात.पँट परत आणण्यासाठी जेम जातो तेंव्हा त्याला ती शीवून व्यवस्थीत घडी केलेली सापडते पण ते कोण केल असाव हे काही त्यांना उमजत नाही.घराजवळच्या झाडाच्या बूंध्यात कोणीतरी नेहमी छोट्या वस्तू ठेवत.कधी घड्याळ कधी खेळणी तर कधी सोप मधे कोरलेली दोन मूलांची आकृती जी हुबेहूब जेम आणी स्काउट सारखी दिसते.जेम ला गन हविये कारण त्याच्या मित्रांकडे ती आहे, वडीलांकडे त्याने बर्‍याच दीवसांपासून हट्ट धरलाय.अ‍ॅटीकस ने त्यांना सांगीतलय की तूम्ही कर्कश आवाज करणार्‍या ब्लू जे पक्षांना मारलत तर एकवेळ चालेल पण मॉकींगबर्डस ना कधीच मारायच नाही, it is a sin to kill a mockingbird (हे यातल सर्वात महत्वाच वाक्य).याच दरम्यान स्काउटची शाळा सुरु होते, ती बर्‍यापैकी गुंड आहे आणी अनेकांशी मरामारी करते.टॉम रॉबिनसन या गरीब निग्रो माणसाची केस अ‍ॅटीकस घेतो.टॉमला "मेएला एवेल" या गोर्‍या तरूणीला मारहाण करून बलात्कार केल्याच्या आरोपा खाली अटक झालिये. गावात अ‍ॅटीकस विषयी बराच निषेध व्यक्त केला जातोय.शाळेत सुद्धा मूलांना तुमचे वडील nigger lover आहेत अस ऐकून घ्यावं लागतय.जेम तसा शांत आहे पण स्काउटने मात्र यावरून जोरदार भांडण केलियेत.केस जशी हळूहळू उलगडत जाते तशी टॉम निर्दोष आहे हे कळत पण शेवटी ज्यूरी त्याला दोषी ठरवतात.या संपूर्ण खटल्या दरम्यान मूल खाली जागा नसल्याने कोर्टात वरच्या मजल्यावर काळ्यांसाठी राखीव असलेल्या जागेत बसून राहतात.तुरुंगात घेऊन जात असताना टॉम निसटून जाण्याच्या प्रयत्नात गोळी लागून मरतो.शेवटी शाळेतून उशीरा परतत असताना केसमूळे बदनाम झालेला बॉब एवेल ( मेएला चे वडील) जेम आणी स्काउट वर हल्ला करतो. बू रॅडली त्यानां यातून वाचवतो.शेरिफ ला जेंव्हा बॉब च प्रेत सापडत तेंव्हा तो अजून एका निष्पाप माणसाला शीक्षा होऊनये म्हणून दारूच्या नशेत पडून बॉब मेला अस जाहीर करतो.

"To Kill a Mockingbird" या चित्रपटाच्या शिर्षकात संपूर्ण कथेचा अर्थ सामावलेला आहे.मॉकींगबर्डस ना स्वतःचा आवाज नसतो, दुसर्‍या पक्षांची नक्कल करून ते आपल्यासाठी फक्त सुरेल गाणी गातात.इथे बू रॅडली आणी टॉम हे दोघही मॉकींगबर्डसची प्रतीक आहेत.यांना स्वतःचा आवाज नसल्यामूळे हे नेहमी लोकांच्या नजरेतून दिसतात.बू चित्रपटात कधीच काही बोलत नाही, त्याची भयंकर प्रतीमा फक्त लोकांनी अफवा पसरवून बनवलिये कारण तो लाजाळू आहे आणी कोणात मिसळत नाही.प्रत्यक्षात तो नेहमीच मूलांसाठी काही ना काही करत असतो.टॉम रॉबिन्सन या सरळमार्गी माणसाला मेएला छोट्या कामांसाठी नेहमी बोलावते आणी त्याला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते पण टॉम बधत नाही.एकदा बॉब जेंव्हा हे पाहतो तेंव्हा तोच मेएलाला झोडपून काढतो आणी टॉम वर आळ आणतो.शेवटी टॉमलाच दोषी ठरवल जात.कारण तो एक काळा आहे आणी सर्व निग्रो हे खोटारडे, असभ्य आणी जंगली असतात ही समाजात असलेली त्यांची प्रतीमा.शेरीफ जेंव्हा बॉबच्या खूनाची चौकशी करण्यासाठी स्काउटला प्रश्न विचरतो तेंव्हा ती गोंधळलेली आहे.टॉमच्या मरण्याने अस्वस्थ शेरिफ जेंव्हा बू सारख्या निष्पाप माणसाला शीक्षा करण्याच आणखी एक "sin" करणार नाही म्हणतो.तेंव्हा मात्र स्काउट, अ‍ॅटीकसला बॉब दारूच्या नशेत पडून मेला त्याला बूनी मारल नाही असच आपण म्हणूया कारण जर बूला शिक्षा झाली तर it will be like killing a mockingbird म्हणते.ऐकीव माहीती वरून निष्पाप आणी दुबळ्या लोकांना शिक्षा देण्याच "sin" कधीच करूनये हा खूप मोठा धडा स्काउट यातून शिकते.बूला घरी पोचवायला निघालेली स्काउट शेवटी म्हणते One time Atticus said you never really knew a man until you stood in his shoes and walked around in them; just standin' on the Radley porch was enough.

चित्रपटाची नॅरेटर आहे सहा वर्षांची स्काउट, Mary Badham या बाल अभीनेत्रीने ही भूमिका अतिशय सहजतेने वठवली आहे.वयाच्या दहाव्या वर्षी ऑस्कर नॉमिनेशन मिळवलेली तेंव्हा ती सर्वात छोटी अभिनेत्री होती. आईविना वाढलेली ही मुलगी टॉमबॉय आहे.शाळेत जाण्यासठी म्हणून तीने पहिलेंदा फ्रॉक घातलाय आणी तो काही तिला फारसा आवडत नाहीये. ही नेहमी जेमच्या मागे मागे असते.आपल्या आईबद्दल प्रश्न विचरत राहणे हीचा आवडता उद्योग.जेमला जेंव्हा मोठेपणी अ‍ॅटीकसच घड्याळ मिळेल हे कळत तेंव्हा तू मला काय देणार हे ती बापाला विचारते, आईचा मोत्याचा हार आणी अंगठी मी तुझ्यासाठी काढून ठेवलिये अस कळल्यावर मात्र तीची कळी खुलते.एका प्रसंगात खटला सुरू होण्याआधी टॉमला गावात आणल जात तेंव्हा त्याला गाववाले कदाचीत इजा करतील म्हणून अ‍ॅटीकस तुरुंगासमोर खुर्ची टाकून बसतो, रात्री तो तिथे काय करतोय हे पाहण्यासाठी मुल तुरुंगासमोर पोचतात.टॉमला मारण्यासाठी मॉब तिथे येतो, प्रसंगाच गांभिर्य न कळालेली स्काउट घरी येणार्‍या कनिंगहॅमला ओळखते आणी त्याच्याशी बोलू लागते.आपण त्याच्या मूलाशी शाळेत उगाचच भांडण केल होत त्याबद्दल माफीही मागते.तिच्या निरागसपणाकडे पाहून शेवटी मॉब पांगतो.शेवटच्या प्रसंगात जेंव्हा "हॅम" चा पोशाख घातलेली स्काउट घरी परततिये तेंव्हा फक्त तिचे डोळे दिसण्या साठी एक पट्टी उघडी आहे बाकी अंगभर तो पेहराव.बॉब जेंव्हा यांच्यावर हल्ला करतो तेंव्हा सुद्धा फक्त तिचे बावरलेले डोळे आणी हलणार्‍या सावल्या दिसत राहतात. शेवटी बू ला उद्देशून ती म्हणते "Neighbors bring food with death, and flowers with sickness, and little things in between. Boo was our neighbor. He gave us two soap dolls, a broken watch and chain, a knife, and our lives".

Gregory Peck ला त्याच्या अ‍ॅटीकस फींच च्या भूमिकेसाठी १९६२ च ऑस्कर मिळाल होत.हा अ‍ॅटीकस प्रामाणीक आहे.त्याची काही ठाम तत्व आहेत आणी कोणत्याही परिस्थीत तो त्यांचा पाठपूरावा करतो.तो मध्यमवयीन आहे आणी त्याच व्यक्तीमत्व भारदस्त आहे.मूल त्याला डॅडी किंवा पपा न म्हणता नावानेच बोलावतात.कनिंगहॅम फीचे पैसे परवडत नसल्या मूळे शेतातील भाजी घरी आणून देतो, तो आला की स्काउट त्याला हाका मारून बोलावते.पुढच्या वेळेला मला बोलावू नकोस कारण कनिंगहॅम ओशाळवाणा होतो अस तो स्काउटला समजावतोय.आपणही गरीब आहोत का या स्काउटच्या प्रश्नावर हो अस उत्तर तीला मिळत, पण आपण गरीब आहोत कारण लोक आपल्याला पैसे न देता कनिंगहॅमसारख वस्तू आणून देतात म्हणून हे तो तीला उलगडून सांगतो.जेम त्याला नेहमी फूटबॉल खेळ चल किंवा गन दे म्हणून मागे लागतो, आता मी जोरात पळू शकत नाही आणी एकूलता एक बाप हाड मोडून पडलेला तूला चालेल का अस तो विचारतो.अ‍ॅटीकस ला कदाचीत गन वापरता येत नसावी वाटणार्‍या मूलांसमोर तो एकदा पिसाळलेल कुत्र मारतो, दोनीही मूल अगदी अभिमानाने बापाकडे पाहत राहतात.शाळेत अ‍ॅटीकस बद्दल बरच काही बोलल जात, तरीही तू मारामारी करायची नाहीस, कारण जगात लोक बरेचदा आपल्याला न आवडणार बोलत असतात आणी म्हणून काही सगळ्यांशी आपण भांडू नये अस त्याने स्काउटला सांगून ठेवलय.टॉमची केस कदाचीत हरू ही शक्यता त्याला आधीच माहितिये पण कोणत्याही परिस्थीत सत्याची कास सोडायची नाही हे त्याच तत्व.मूलांचा बापाबद्दलचा आदर कोर्टात चाललेल्या केस मधून हळूहळू वाढत जातो.एका बाजूला प्रेमळ बाप आणी दुसरीकडे निर्भय वकील Gregory Peck ने अतीशय ताकदीने उभा केलाय.

उत्कंठा वाढवणारे अनेक प्रसंग असलेली कोर्ट केस हा सुद्धा चित्रपटाचा अतिशय वेधक भाग.२००३ मधे अमेरिकन फील्म इन्स्टीट्यूटन अ‍ॅटीकस फींचला २०व्या शतकातला greatest movie hero हा किताब दीला.या चित्रपटाला दिग्दर्शन होत Robert Mulligan च .१९६२ चे तीन ऑस्कर या चित्रपटाला मिळाले.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा सिनेमा मी खूप पूर्वी पाहिला होता व ग्रेगरी पेकच्या अभिनयाने [व विशेषतः अ‍ॅटीकस व त्याच्या मुलांमधील खुल्या वातावरणाने]भलताच भारावला होतो [मला वाटतं एका पिसाळलेल्या कुत्र्याला मारण्याचा प्रसंगही यातच होता]. पुस्तक मात्र वाचायचं ठरवूनसुद्धा राहून गेलं. मुख्य कथानक तेंव्हा कळलं तरी बरेचसे बारकावे मात्र आता तुमच्या अप्रतिम परिक्षणामुळेच लक्षात आले. धन्यवाद.
<<२००३ मधे अमेरिकन फील्म इन्स्टीट्यूटन अ‍ॅटीकस फींचला २०व्या शतकातला greatest movie hero हा किताब दीला.>> २०वं शतक म्हणजे एकाहून एक सरस अशा हॉलीवूड सिनेमांचं व हीरोजचं सुवर्णयुग होतं. अशा कालखंडासाठी अ‍ॅटीकसला हा बहुमान देणं, हे अमेरिकन फिल्म इन्स्टीट्यूटलाही कौतुकास्पद आहे.

यस्स. माझ्या दहा फेवरिटमधला एक. याबद्दल कितीही बोललं तरी कमीच.
Boo was our neighbor. He gave us two soap dolls, a broken watch and chain, a knife, and our lives. प्रत्येक वेळी हा क्लायमॅक्स पाहिला की घशात हुंदका दाटून आल्याचे जाणवते.

राजकाशाना , अगणित मोदक.... Happy
कितीही बोललं तरी कमीच!!

नेतिरी, आणखी येऊदेत.. तुझी माझी आवड बरोब्बर जुळतेय.. Wink