विजय

Submitted by सुशिल गणोरे on 10 February, 2011 - 10:06

सोनेरी तो सूर्य उगवला
पारतंत्र्याचा हिम पिघळला
मातीचा पण रंग उजळला
विजयाचा तो गुलाल उधळला

बघा विजय कसा मिळवला
देहाचा हा डोंगर सांगतो
रक्ताची तर चारी वाहिली
पारतंत्र्याची तेव्हा रेघ पुसली

विजय साजरा करावा कसा
आश्रुंनीच विहीर भरली
क्रांतीची ज्यांनी मशाल पेटविली
जीवनाची त्यांच्या ज्योत विजली

सुशिल गणोरे

गुलमोहर: 
शब्दखुणा: