*कोलाज:- Political Science Paper - II (section A)

Submitted by संदीपसमीप on 10 February, 2011 - 09:47

*कोलाज:- Political Science Paper - II (section A)
Political Science Paper - II (section A) *

When you are young you think possibilities are endless १
पहिल्या प्रश्नाला पर्याय नसतात
तसे कुठल्याच प्रश्नाला पर्याय नसतात
काही सोडून द्यावे लागतात वेळेअभावी maybe...
अविर्भाव मात्र,
मी रात टाकली, मी कात टाकली वाला २
डोळ्यातली झोप खाजवत तिस-या जगातल्या समस्या उगळायच्या
सूर्य उगवतो, प्रकाश पडतो
सोलोमन व्हॅंडीचा मुलगा कॅलॅशनिकोव्हच्या गजराने जागा होतो ३
पास व्हायच्या भीतीने मी त्याबद्दल लिहित नाही.

पहिल्या प्रश्नाचा गळा दाबल्यावर
लगेचच दुसरा खून करू वाटत नाही
मग शेजारच्या खिडकीबाहेर लक्ष द्यायचे
सूर्य क्षितिजापासून हातभर ऊंच
कही दूर जब दिन ढल जाये ४
च्यामारी उगवती-मावळतीत फरकच काय?

तिसरा प्रश्न सुरू करतानाच शेजारी ती येऊन बसते
ती... वो जो दूध धुली मासूम कली ५
सरळ रेषेत घरंगळत जाणारे पेन... इतक्यात
रेडिओ बंद मनिषाच्या चेह-यावरची घुसमट ६
पुढे सुचत नाहिये... please someone turn on the radio...
तरी... ऐ अजनबीला तुकड्या तुकड्यात समोर आणायला दम लागतो बॉस!
मी बाकीचं liberal internationalism क्रिटीक तावातावाने करतो

Autocracy आणि Democracy तले तुलनात्मक फायदे...
चौथ्या प्रश्नावर आपल्यासारखे सावली शोधणारे पेद्रू काय लिहिणार?
(with all respect to proper humans clinging on to region, nation, society) ७
तयार असतात त्या सावलीसाठी
रक्ताच्या नद्या वहायला
राष्ट्रं सर्वनाशाला सामोरं जायला ८
या तीन ओळी लिहितानाच
पेनातली शाई, वेळ, संयम आणि section-A संपतो

section-B...
उद्या... तिच्याबरोबरचे Psychological analysis संपल्यावर
ती माझ्या मेंदूचे डिसेक्शन करू शकेल का?
रक्ताच्या थेंबांनी ह्र्दय न बाटवता? ९

ऋणनिर्देश :-
१) दिल.. दोस्ती etc.
२) ना. धो. महानोर, पानांआडून दिसणारा स्मिताचा शुद्ध चेहरा
३) Blood Diamond
४) आनंद
५) गुलजार, रेहमान
६) दिलसे
७) Noam Chomsky
८) कोलटकर
९) संदीप

* Frame
सौजन्य :- Unique Academy

*कोलाज
-संदीप

गुलमोहर: 

Happy nice, but ..

with all respect to proper humans clinging on to region, nation, society>> हे भारी. यात ऑल आणि रिस्पेक्टच्या मध्ये ड्यु हा शब्द टाकायला हवा होता चॉम्स्कीने. जरा अजून धार. Happy

अजुन धार? हळूहळू एकदम विश्वासात घेऊन सगळे रस्ते बंद करत करत आपले विचार गळी उतरवण्याचा प्रकार आवडतो मला... love Chomsky for that... couldn't imitate though Proud

चॉम्स्की हे एक वेगळंच रसायन आहे.. मला ही कविता वाचून जड सुस्तावलेल्या सुखवस्तू मनाने लिहिलेले पॉल्सीचे पेपर आठवले..
>> . ऐ अजनबीला तुकड्या तुकड्यात समोर आणायला दम लागतो बॉस!
मी बाकीचं liberal internationalism क्रिटीक तावातावाने करतो >>> हे तर फार भारी Happy

राज्यशास्त्र शिकताना आपण (दुसर्‍यांच्या ) (उसन्या) थिअर्‍यांच्या आणि (दुसर्‍यांच्या) (उसन्या)आवेशाच्या जोरावर दुनिया बदलू शकतो असे कैकवेळा वाटते हे तंतोतंत खरं. डोंबल !
इतिहासात नाही म्हणले तरी रक्तपात असतो, क्रांत्या असतात, क्रौर्य असतं, धगीची झळ बसते
आणि जॉनमेनर्डकिन्सच्या NCT, ceteris paribus वर आधारलेलं शास्त्र आणि मारलेल्या डिंगा
मध्येमध्ये सिनेमातील गीतं तोंडीलावणीला हवीतच बाई. ती अभिजात किंवा कसे याचा काथ्याकूट करावाच.
साहित्यात मात्र या सर्वांच मिळुन प्रतिबिंब पडतं नाही ?

आपण मला या सर्वांची सरसरून आठवण करुन दिलीत.

मला तर कुठल्याही बाजूने बोलताना रिअरव्ह्यू सारखी उलटी बाजू दिसतच राहते. दळभद्री शाप आहे हा.
त्यामुळे मग एकदम टुकटुकीत आणि तुकतुकीत माज दाखवून, मांजरासारखे गुरगटुन (अंतिम) सत्याच्या गुर्मीत बोलताच येत नाही कधी. श्या.. the joys of righteous indignation. Proud

the joys of righteous indignation

hmm... Wink

btw indignation is always righteous... पचकायचा मूड आला... पचकलो... Lol

अल्लगीच फॉर्मॅट है भई तुम्हारा. सगळी नाही कळली पण एकंदरित विषय आणि काही प्यारे कळले. आवडले. Happy

ऐ अजनबीला तुकड्या तुकड्यात समोर आणायला दम लागतो बॉस!>>>>>

आणि रैनाचा पहीला प्रतिसाद.......... !! सगळं भन्नाटच ....

काही समजल नाही Sad
समजायला काही होत का????
पण काहीतरी आवडलं.
may be आतापर्यन्त दिलेल्या प्रत्येक paper ला relate झाल्यामुळे..