कुठला कॅमेरा घ्यावा????

Submitted by आशुचँप on 8 February, 2011 - 10:04

माझ्याकडे सध्या कॅननचा ३५०डी रिबेल एक्सटी हा कॅमेरा आहे. हा कॅमेरा मी साधारण चार वर्षांपूर्वी एका प्रोफेशनल फोटोग्राफरकडून सेकंडहँड खरेदी केला होता. (त्यावेळी १५ हजारला). त्याने तो भरपूर वापरला असूनही मला कॅमेराचा अजिबात त्रास झाला नाही. आणि मलाही ताबडायला जुनाच कॅमेरा हवा होता.
आता मला कॅमेरा अपग्रेड करायचा आहे. ते ही शक्य तितक्या तातडीने. कारण माझ्या १८-५५ लेन्सला एकदा एरर-९९ येऊन गेला आहे. एकतर ती लेन्स आमच्या प्रेस फोटोग्राफरची आहे. त्यामुळे होता होईतो त्यांना ती लेन्स लवकर देऊन टाकायची आहे. (माझी १८-५५ बॅगेतून कॅमेरा काढताना पडून फुटली :().
आता माझ्यापुढे प्रश्न आहे की मी १०००डी घ्यावा का ५००डी?????
बजेट टाईट असल्याने हा प्रश्न आहे. १०००डी साधारण २१ हजारला तर ५००डी ३४-३५ हजारला आहे. माझा प्रश्न आहे की जास्तीचे १२-१३ हजार खर्च करण्याईतका ५००डी वर्थ आहे का??????
व्हिडीओ शूटींगचे फार कौतुक नाही, कारण मी ते किती वापरीन माहीती नाही. आयएसओ रेंज मोठी आहे आणि सेन्सरपण एडव्हान्स आहे. मला हे दोन्ही कॅमरे वापरून पाहिले असतील तर सल्ला हवाय.
दुसरे असे की कॅनन २०००डी बाजार आणणार असल्याच्या खबरा आहेत. त्यात कितपत तथ्य आहे आणि त्यासाठी थांबणे कितपत योग्य आहे?
कृपया जाणकारांनी योग्य ते मार्गदर्शन करावे...

ऐडमिन...मला कुठला कॅमेरा घ्यावा असा धागा न सापडल्याने मी इथे टाकले आहे...कृपया तसा धागा असल्यास ही पोस्ट तिकडे हलवावी ही विनंती...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आस्चिग नक्कीच देते. येताना तुमचं डेबिट / क्रेडीट कार्ड/ कॅश आणा म्हणजे झालं.
आशुचँपच्या विपु मधे एरर ९९ ची माहिती सकाळी लिहिली आहे.

कुठला लेख लिहू म्हणतोस?

सर्व लोक्स धन्यवाद...मी इंटरनेटवर सर्च करून माझे ऑप्शन्स केवळ १०००डी किंवा ५००डी एवढेच मर्यादित केले आहेत. (मुख्य कारण म्हणजे माझ्याकडे ५५-२५० टेलीफोटो लेन्स आहे..त्यामुळे मी इच्छा असूनही निकॉन किंवा अन्य कुठल्या ब्रँडला शिफ्ट होऊ शकत नाही, किंवा कॅननच्याच सेमी-एसएलआर कडे पण)...
माझा प्रश्न आहे की जास्तीचे १२-१३ हजार खर्च करण्याईतका ५००डी वर्थ आहे का??????

एडमिन धन्यवाद...मी हे लेख याआधीच वाचले आहेत..परंतु माझे प्रश्न अगदीच स्पेसिफिक असल्यामुळे वेगळा धागा काढावा असे वाटले...

निकॉन ३१०० पण बघ, कॅनन ५०० डी प्रमाणेच स्पेक्स आहेत शिवाय किंमत ३१ हजार (+/-) आहे. ३१०० डीचे रिपोर्टस पण चांगले आहेत.