नॉक्ड आउट !!

Submitted by maitreyee on 6 February, 2011 - 08:42

काल नॉक आउट नामक चित्रपट पाहिला. तुफान करमणूक झाली म्हणून वाटले की इथे शेअर करावीच.
तर सुरुवातीला बरा थ्रिलर असावा असे वाटले. सुरुवात अशी की एका बिल्डिंग मधे लपलेला एक शूटर शिनेमाचा हिरो(?) ला लांबून कॅमेराज, सि सिटिव्ही ,टेलिस्कोपिक लेन्स असलेली गन इ. च्या सहायाने एका टेलिफोन बूथ मधे होल्ड अप करतो. थोड्या ड्रामा अन थोडा गोळीबार इ.नंतर बाहेर तोबा गर्दी, पोलिस, मिडिया वगैरे ऑडियन्स जमल्यानंतर हे सगळे कोण, का अन मुख्य म्हण्जे कशासाठी करत आहे हे हळू हळू आपल्याला कळते अन तस तसा शिनुमा महान म्हणजे महानच विनोदी होत जातो !
*********** स्पॉयलर अलर्ट*************************************

काय तर बर का हा फोनबूथ मधे अडकलेला हिरो - इर्फान खान म्हणजे खर तर करप्ट पोलिटिशियन्स चा 'ब्रेन' कम पैसा वसुली एजन्ट असतो!! त्यला त्यांची स्विस बॅकातली अकाउन्ट्स अन त्याचे नंबर, पासवर्ड सगळे पाठ असते! मग आता ओळखा पाहू तो शूटर कोण असेल ?? तो - संजय दत्त - असतो एक देशभक्त शूर कर्नल!!! काय झालं ? अ वेन्स्डे ची आठवण येतीय का? असु दे. ती बाजूला ठेवा. इथे फार फार मोठे स्टेक्स आहेत हो.
मग व्हायचे तेच होते, फारेन्डाच्या बॉलिवुड सिनेमा रुल्स ना धरुनच अर्थात . (इथे पहा नियम http://www.maayboli.com/node/11010)
शूर देशभक्त कर्नल ला देशाचे सगळे पैसे स्विस बॅकेतून परत हवे असतात. तो आधी धमकावून अन नंतर हृदयद्रावक भाषणाद्वारे त्या बूथमधल्या हिरो चे मन वळवण्यात यशस्वी होतो. दरम्यान पोलिस नुस्ते बघत उभे असतात. मिडिया ची बाई मात्र हातात कॅमकॉर्डर घेऊन काय का कसे चाललेय हे शोधून काढते, कहीतरी करून शूटर कुठे लपलाय हेही शोधून काढून पार संजय दत्त ला भेटून पण येते, वर आणि त्याची देशभक्ती बघून इम्प्रेस झाल्याने त्याचा ठावठिकाणा कळू न देण्ञाची ग्यारेन्टी पण घेते. तरी इकडे पोलिस अजून बघेच . त्यांचा इन चार्ज एक प्रामाणिक ऑफिसर. तो काही कारणाने स्वतः काहीच न करता प्रत्येक बाबतीत मिडिया वाल्या सुंदरीशी फक्त सल्ला मसलत करत रहातो, बाकी काही म्हणजे काहीच करत नाही ! इकडे सगळा देश अन पोलिटिशियन हे टिव्ही वर बघत असतात. पोलिटिशियन ना अर्थात कमिशनर अन बहुतेक पोलिस सामील . मग इअरफान ला गोळ्या घालायची ऑर्डर निघते . प्रामाणिक ऑफिसर प्रामाणिक असल्याने आणि मुळातच तो काही करण्याच्या विरुद्ध असल्याने ती ऑरडर न पाळण्याचे ठरवतो !!
इकडे इरफान हृदयपरिवर्तन झाल्यामुळे देश के पैसे परत देण्याचे ठरवतो. पण आता द्यायचे म्हणजे ते द्यायचे तरी कसे ? असा प्रश्न तुम्हा आम्हाला , त्याला नाही. तो सरळ फोन बूथ मधून डोके काढून गर्दीला उद्देशून ओरडतो,
इरफान - " हल्लो !! कोई रेवेन्यू डिपार्ट्मेन्ट का आदमी है क्या इधर ?" Lol
लगेच गर्दीतून एक सुटाबुटातला मानूस पुढे येतो "मै हू"
मग (आईशप्पत, काही अतिशयोक्ती नाही, खर्रच असं दाखवलंय)
इरफान - " मुझे देश के पैसे लौटाने है, आरबिआय का अकाउन्ट नंबर दिजिये, मेरे पास टाइम कम है"
लगेच तो माणूस कागदावर (त्याला पाठ असलेला) देश की तिजोरी असलेल्या अकाउन्ट चा नंबर लिहून त्याला देतो.
इकडे इरफान ला मारू पहाणारे लोक, त्यांना मारणारा संजय दत्त , नुस्ती बघ्याची भूमिका घ्तलेले पोलिस यांच्यात गोळिबाराची जुगलबंदी सुरु होते.प्रामाणिक ऑफिसर पण सस्त्यात हकनाक मारला जातो.
अन इथे भर चौकात ट्रान्स्परन्ट फोन बूथ मधे लॅपटॉप घेऊन बसून इरफान आजू बाजूला हा तुफान गोळीबार वगैरे चालू असतना हे पैसे देशाच्या तिजोरीत (?) 'ट्रान्स्फर' करतोय आपला. मधेच आप्ल्याला हाय टेक मनी ट्रान्स्फर कशी होते ते लॅपटॉप वर दिसते. मोठे बटबटित आयकॉन्स, मोठे प्रोग्रेस बार . अन त्याखाली एक काउन्टर वाढत जाताना दिसतो एक दोन दहा, हजार, लाख, कोटी असे आकडे येतात. (म्हणजे बहुधा तितके पैसे ट्रान्स्फर झाले असा अर्थ!!) परत एक्दा फारेन्डाचे नियम वाचा.
तिकडे रस्त्याच्या पलिकडे तो रेवेन्यूका आदमी पण आपला लॅपटॉप उघडून काहीतरी करतो अन मोठा कर्णा घेऊन "अभी अभी देश की अकाउन्ट मे पाच हजार करोड रुपये ट्रान्सफर हो गये है " असा ऐलान करतो!! अन गर्दी तसेच देश भर टिव्ही बघणारे लोक जल्लोष करतात !! इरफान परत "क्या और पैसे चाहिये ? पाच हजार करोड ? या आठ हजार करोड?" सगळी गर्दी लगेच उत्साहात ओरडत असते 'और पाच" " और दस" असे हिस्टेरिक ओरडत असते !! गोळीबार चालूच. गोळ्या चुकवत इरफान आपला नविन नविन अकाउन्ट नंबर टाकून पैसे ट्रान्सफर करतोच आहे!! लगेच कर्ण्यावर ऐलान "अब तक दस हजार करोड जमा हुए " परत जल्लोष , काही लोक टिव्ही वर हे पाहून डोळे पण टिपतात (का? का?) देश भर बहुतांश लोक ये ऐतिहासिक क्षण देख के नुस्ते नाचत असतात (हे काही कळले नाही! जसे काही यांच्याच अकाउन्ट मधे पैसे येतायत!!) असे बत्तीस हजार कोटी रुपये आल्यानंतर स्विस अकाउन्ट रिकामी होतात. अन विजयी हिरो बाहेर येतो! आनंदि आनंद चालू असताना मिडिया वाली बाई म्हणते "आशा है की इस घटना से हिन्दुस्तान जाग जायेगा" हेही मला कळले नाही नीट!! तुम्हाला कळले का काही ?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Rofl

>>निगोशिएटरचा "स्वैर" रिमेक वाटतोय>>>> 'फोनबूथ' ची सही सही नक्कल आहे.

आणखी एका चांगल्या परकीय कल्पनेचं/चित्रपटाचं मातेरं झालं Sad

एव्हढे पैसे एकदम काढुन घेतल्यावर स्विस बँकेची कराड बँक बनुन ती बुडते असे नाही दाखवीले का ? Happy

माझ्या हुकलेल्या पिक्चरचं खुमासदार वर्णन केल्याबद्दल थँक्स! आता चुकून दिसला तरी पाहणार नाही >> अकु.. पाहीजेत तेवढी मोदकं... मैत्रेयी Rofl
'जरा जरा टच मी' मधला इरफान चा नाच खुपच आवडला >> टीना अगदी अगदी Lol तेव्हढंच फक्त प्रोमोज मधे पाहीलेलं!!!

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.... पार वाटच लावलीये की.. फोनबूथ फारच चांगला आहे ह्याच्या पेक्षा..

अशक्य हसले वाचून. सुरवात खरच जरा बरी वाटली पण नंतर जो काय आचरटपणा चालू झाला. हाईट म्हण्जे ती इर्फान ची नाच गाणी प्रकार..

इरफान - " हल्लो !! कोई रेवेन्यू डिपार्ट्मेन्ट का आदमी है क्या इधर ?"
लगेच गर्दीतून एक सुटाबुटातला मानूस पुढे येतो "मै हू"

इरफान - " मुझे देश के पैसे लौटाने है, आरबिआय का अकाउन्ट नंबर दिजिये, मेरे पास टाइम कम है"
>>
Rofl एक नंबर..

अक्षरशः तुफान!!!!!!!!
Rofl
चित्रपट डोळ्यासमोर उभा राहिला...........
हिंदी चित्रपटांना काहीही अशक्य नाही.

महान! Lol धमाल लिहीलंय! देखनाच पडेगा.
प्रामाणिक ऑफिसर प्रामाणिक असल्याने आणि मुळातच तो काही करण्याच्या विरुद्ध असल्याने ती ऑरडर न पाळण्याचे ठरवतो !!>>>
कोई रेवेन्यू डिपार्ट्मेन्ट का आदमी है क्या इधर>>>
मधेच आप्ल्याला हाय टेक मनी ट्रान्स्फर कशी होते ते लॅपटॉप वर दिसते. मोठे बटबटित आयकॉन्स, मोठे प्रोग्रेस बार >>> हे सर्वात आवडले Happy

त्या बूथवरची लाईन बंद करून ही ट्रान्स्फर रो़खण्याचा अहिंसक मार्ग सुचत नाही का कोणाला?

मजा आली परीक्षण वाचायला.

त्या बूथवरची लाईन बंद करून ही ट्रान्स्फर रो़खण्याचा अहिंसक मार्ग सुचत नाही का कोणाला?

फारएण्ड, Happy

Rofl

एव्हढे पैसे एकदम काढुन घेतल्यावर स्विस बँकेची कराड बँक बनुन ती बुडते असे नाही दाखवीले का >> Lol

एव्हढे पैसे एकदम काढुन घेतल्यावर स्विस बँकेची कराड बँक बनुन ती बुडते असे नाही दाखवीले का >>> Lol बरे झाले असले काही सुचले नाही. नेहमीचे यशस्वी बॉब क्रिस्टो अन टॉम आलटर हे 'स्विस बैकेचे हायकमांड' हिन्दीत बोलताना दाखवले असते बहुधा त्यांनी! Happy
थँक्स सगळ्यांना!!

Rofl जबरी
फारेंडा Happy
दळण वळण मंत्री/लाईनमन एक्दम स्वच्छ चारित्याचा दाखवला असेल त्यांनी Proud