मैत्र जिवांचे : मायबोलीकरांची समाजसेवा!!!

Submitted by विशाल कुलकर्णी on 2 February, 2011 - 02:38

प्रिय मायबोलीकर,

पत्रास कारण की मायबोलीकरानी मिळून सुरू केलेल्या एका स्तुत्य कार्याचा शुभारंभ नजीक आला आहे.

काही दिवसांपुर्वी हबा यांनी लिहीलेल्या एचआयव्ही विषयीच्या लेखाच्या अनुशंगाने बरीच चर्चा झाली. त्या लेखाचा हा दुवा...
लग्नाच्या तारखेपुर्वीचा एचआयव्ही...

तिथे प्रत्येकाने सामाजिक जागृतीचे महत्व, प्रत्यक्ष कार्य करण्याची इच्छा तसेच आप-आपल्या वैयक्तिक पण विविध क्षेत्रातील ज्ञानाचा फायदा समाजाला कसा होईल इ. बाबत आपली मते मांडली. या सगळ्या सुसंवादातून एखाद्या सामाजिक कार्य करणार्‍या संस्थेची स्थापना करण्याचा विचार येथे मांडला गेला.

अशी काही विधायक कल्पना समोर येताच 'शुभस्य शिघ्रम' असा विचार करुन या संस्थेसाठी काम करण्याचे आवाहन करताच बर्‍याच मायबोलीकरांनी उत्स्फुर्तपणे काम करण्याची, मदत करण्याची तयारी दाखवली. त्यात चनस, पंत, विजयजी, हबा, मी स्वतः, कैलासजी, कोमल कुंभार, मी आर्या यांसोबत इतरांचाही सहभाग होता.

आपापसातील चर्चा आणि संवादातून हबाने मांडलेली संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकते असा विश्वास वाटला आणि इच्छुक मायबोलीकरांची पहिली मिटींग डॉ. कैलास गायकवाड यांच्या घरी मुंबईला झाली. या मिटींगला जे हजर नव्हते त्याना फोनवरून मिटींगचा हेतू व कार्यकारी मंडळाची निवड याविषयी मते मागण्यात आली.

सर्वांचे एकमत झाल्यावर असे एक कार्यकरी मंडळ तयार झाले. ज्याचे प्राथमिक सदस्य खालीलप्रमाणे आहेत.

हबा उर्फ हणमंत शिंदे - अध्य़क्ष
डॉ. कैलासजी गायकवाड - उपाध्यक्ष
विशाल कुलकर्णी - सचिव
पंत उर्फ प्रसाद गोडबोले - खजीनदार

सदस्य -

विजय पाटील
चनस
मी आर्या
चैताली सावंत
दत्ता गायवाड
मनोज यादव

(नियोजित वेळेत कागदपत्रे न आल्यास पदांमधील बदल अपरिहार्य आहेत)

ज्यानी कसलीही अट, अडचण, किंतू परंतू समोर न आणता " चांगल्या कामाला हात घालताय तर विलंब कशाला, चलो शुरू करो यार...! " अशी भुमिका घेतली अशाच लोकांचे कार्यकारी मंडळ व्हावे याची द़क्षता घेण्यात आली. यात काही बदल अपेक्षीत आहेत का ते पाहण्यासाठी पुण्यातही कोथरूडला पुण्यातील सदस्यांची मिटींग झाली.

यानंतर सर्वांकडून संस्थेचे नाव काय असावे याबद्दल पर्याय मागविण्यात आले. त्यावर सर्वांचे खुले मतदान घेण्यात आले आणि सर्वाधिक मते मिळवून पंतानी सुचविलेले "मैत्र जिवांचे" हे नाव नक्की झाले.

आता फक्त नोंदणी व शुभारंभाचा भाग उरला आहे. बर्‍याच जणांची कागदपत्रे मिळाली आहेत उरलेले लवकरच देतील व मायबोलीकरांच्या समाजकार्याचा नारळ फुटेल. माबोवरच्या सर्व सदस्यांची साथ, मदत, आशिर्वाद आम्हास सर्वतोपरी लाभतील याची खात्री आणि विश्वास आहेच.

संस्थेची ध्येय, धोरणे व कामाच्या रुपरेषेची माहिती आम्ही लवकरच आपल्यासमोर मांडणार आहोत. बदल, मार्गदर्शन, कायदेविषयक मार्गदर्शन इ. बाबतीत संबंधीत क्षेत्रातील तज्ञ, जाणकार मंडळींनी स्वतःहून पुढे यावे व सहभागी व्हावे ही विनंती.

हे शिवधनुष्य पेलण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आणि मदतीची आवश्यकता आहे आणि ती मिळेलच याची खात्रीही आहे.

प्रिय मायबोलीकर,

एक महत्वाची बातमी देताना विलक्षण आनंद होतो आहे. संस्थेच्या नोंदणीचे काम ९० % झालेले आहे. ९० % एवढ्यासाठी की अजुन आपल्या हातात प्रमाणपत्र पडलेले नाही. येत्या १५-२० दिवसात संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र आपल्या हातात येइल. त्यानंतर साधारण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पुणे किंवा मुंबई इथे एक छोटासा कार्यक्रम करुन "मैत्र जिवांचे" या सामाजिक संस्थेचे जाहीर उद्घाटन करायचा मानस आहे. त्या आधी इथे तशी सुचना दिली जाईलच. काही इच्छुकांची कागदपत्रे वेळेत न मिळाल्याने कार्यकारी मंडळात काही बदल करावे लागले आहेत. लवकरच अंतीम कार्यकारी मंडळाचीही घोषणा करुच.
कुणाला सहभागी व्हायची इच्छा असल्यास कृपया maitrajivanche.ngo@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा. तसेच आपल्या काही सुचना, मार्गदर्शन, अनुभव शेअर करायचे असल्यास देखिल इथे खाली प्रतिसादात किंवा वरील पत्त्यावर कळवू शकता.

धन्यवाद.

कळावे,

आपला,

विशाल कुलकर्णी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

मेरा कायको अभिनंदन रे हबा? मैने तो कुछभी काम नही किया

>>> ही संस्था सर्व मायबोलीकरांची आहे. ज्याना शक्य होते त्यानी सहभाग घेतला नाही ते नंतर सहभागी होतील मदत करतील. कुणी कुणाचे अभिनंदन करून आपण यातून बाहेर आहोत किंवा वेगळे आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न करू नये!!!

ही संस्था सर्व मायबोलीकरांची आहे. ज्याना शक्य होते त्यानी सहभाग घेतला नाही ते नंतर सहभागी होतील मदत करतील. कुणी कुणाचे अभिनंदन करून आपण यातून बाहेर आहोत किंवा वेगळे आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न करू नये!!!>>>>>>>

१०००००००००००००० मोदक रे हबा तूला ! मला खात्री आहे मायबोलीकर कायमच कुठल्या ना कुठल्या मार्गाने मदतीला सिद्ध असतील !!!

मी पण भाग घेणार.. कसली कागदपत्रे द्यायची? आणि नेमका गिओग्रफिकल एरिअया कोणता फिक्स आहे का? नेमक्या कोणत्या क्षेत्रात काम करणार? फक्त एच आय व्ही की आणखीही काही? अशी संस्था काढताना आधी एक अपेक्षित कामाचा मसुदा तिथे दाखल करावा लागतो.. त्याची प्रत / त्यातील माहिती इथे टाकली तर बर्‍याच गोष्टी आपोआपच समजतील सर्वाना

अभिनंदन हब्या..
परवाच्या चर्चेतून उपक्रमाबद्दल नेमकं समजलं. मनापासून शुभेच्छा आणि होईल तेवढी मदत करीनच.. Happy

मी हे ह.बां. च्या लेखाच्या लिंक वर पण माझे मत दिले आहे.. इथेहि देत आहे...

मला असे वाटते कि - एकदा का लग्न ठरवतांना एखादा HIV +ve रुग्ण मिळाला तर त्याचे फक्त तेच लग्न मोडुन न थांबता त्याच्यावर लक्ष ठेउन तो नंतर अजुन कोणाला फसवत तर नाहि ना? हे पण बघणे आवश्यक आहे... कारण जसे ह्.बा नी सांगितले कि त्यांच्या मैत्रिणीच्या सा.बा - सा.बु. ना माहित होते कि त्यांच्या मुलाला HIV आहे... तरिहि त्यांनी तसे केले

Pages