शाळा पहिलीमधे प्रवेश - किमान वय? आणि ठाणा, मुलुंड मधल्या शाळा

Submitted by सावली on 30 January, 2011 - 21:24

भारतात पहिलीमधे प्रवेश घेण्यासाठी मुलांचे किमान वय किती असावे लागते ५ पुर्ण की ६ पुर्ण?

आणि ठाणा, मुलुंड मधल्या सेमीइंग्लिश / इंग्लिश माध्यमातल्या चांगल्या शाळा सुचवणार का?
- घोडबंदररोडवरच्या नको. (ट्रॅफिक प्रॉब्लेम मुळे)
- शाळेत मराठी मुलांची टक्केवारी साधारण जास्त हवी.
- शाळेला ग्राउंड हवं.
या माझ्या अपेक्षा आहेत.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण गोम अशी की मुला/मुलीच्या पालकांच्या नावे ही रीसीट देत नाहीत तर त्यांच्या कोणा जवळच्या नातेवाईकाच्या ( आजोबा/आजी, ई.) नावे देतात.
>>> आणि ती रीसिटसुद्धा संपूर्ण रकमेची नसते, तर दिलेल्या रकमेच्या काहीच टक्के रकमेची रीसिट देतात.

एकीकडे सरकार सगळ्यांना प्राथमिक शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून ओरडतय आणि दुसरीकडे ह्या प्रायव्हेट शाळा एव्हढी भली मोठी डोनेशन्स घेतायेत.. कसं व्हायचं शिक्षणाचं Sad

सिंघानीयाचा अनुभव कसा आहे? हल्ली मी बरेच काही एकत आहे. म्हणजे तेथील मुलेच काय पण मुलीपण रेग्युलर स्मोक करतात इ. त्या भागात रहाणारे यावर प्रकाश टाकतिल काय?

हो, ए.के. चा मी पण ७०००० चा आकडा एकला आहे. नालंदा ३५०००, ज्ञानसाधना २००००, बिलेबॉन्ग ६०००० पण ३ टप्प्यात. एरोलीला बरेच ऑप्शन आहेत पण Sad २ टोल नाके (आपल्याला कधी जायचे झाले तर, स्वताची गाडी मस्ट) आणि मुलांना रोज हाय - वे ने पाठवायचे नको वाटते.

संस्कार निकेतन चा कोणाला अनुभव आहे का?>>>> ही ऊर्जीता जॅन वाल्यांची शाळा आहे. फोनवर तरी माहिती चांगली मिळाली होती.

मुलुंडला होली एंजेल स्कूल पण चांगली आहे.
आमची वामुमावि आत्ताची विद्याप्रबोधिनी पण चांगली आहे की. आणि आता तिथे ईंग्लिश माध्यम पण चालू केलय. Happy
हे बघा
http://www.parentree.in/groupdiscussion-1536/Good-Schools-in-around-Mulu...

मोनालीपी सिंघानीयाबद्दल वाचुन धक्काच बसला! खरच आहे का तसं?
आणि बाकी डोनेशन बघुन पण!!! देणारे पालक असतात म्हणुन मागणारे मागतात असं आहे का हे?
बित्तु तुझी शाळा ठाण्यात आणुन देतोस का? मी लग्गेच जते तिथे अ‍ॅडमिशन घ्यायला Happy

बाप्रे, डोनेशनचे आकडे ऐकून धक्काच बसला. असं चालू आहे देशात ? मलापण तयारीला लागलं पाहिजे लेकाच्या अ‍ॅडमिशनसाठी.
मला एक प्रश्न आहे. समजा ६ व्या-७ व्या वर्षी देशातल्या शाळेत घालायचं म्हटलं तर २ री- ३री त घेतात की पहिलीपासूनच सुरूवात करावी लागते ??

बेडेकर विद्यामंदिर , श्रीरंग विद्यालय, एम एच हायस्कुल वगरे नावं खुप मागे ऐकलेली त्यांचे काय स्टेटस आहे?

मी एक लिस्ट केलीये अजुन जास्त नावे, माहिती मिळाली तर टाकते.
s_image.JPG

मोनालीपी सिंघानीयाबद्दल वाचुन धक्काच बसला! खरच आहे का तसं?>>> मी देखील ऐकुन आहे. नक्की माहिती नाही. पण ती शाळा आता जरा Higher Middle Class or Higher Class झाल्यात जमा आहे बहुतेक.
नीलू - विद्याप्रबोधिनी पण चांगली आहे की. >>> अजुन माहिती मिळेल का?

सिंघानीयाचा अनुभव कसा आहे? हल्ली मी बरेच काही एकत आहे. म्हणजे तेथील मुलेच काय पण मुलीपण रेग्युलर स्मोक करतात इ. त्या भागात रहाणारे यावर प्रकाश टाकतिल काय?

मोनालीपी सिंघानीयाबद्दल वाचुन धक्काच बसला! खरच आहे का तसं?>>>>>>>>

कुठल्याही शाळेत सिगरेटी ओढायला शिकवत नाहीत. सिंघानियाची जास्तीत जास्त मुलं-मुली शाळेच्या बसनेच घरी जातात. त्यामुळे मुलं शाळेत आणि शाळेभोवतालच्या परीसरात सिगरेट ओढणं अशक्य आहे. याबाबतीतला धोका सगळ्याच शाळांना लागू होतो. अशा सवयी लागण्याबाबतीत पालकांनी सजग राहणे, पाल्याशी सतत संवाद साधणे महत्वाचे आहे.

मंजूडी १दम मान्य पालकांचा रोल. पण अग हल्ली इतकी प्रलोभने आहेत या मुलांसमोर की काय द्यायचे आणि काय नाही, हे ठरवणे कठीण होत आहे. आजकाल मुलांना कुठुन काय शोध लागेल हे सांगणे कठीण झाले आहे. कुठवर पालकांनी नियंत्रण ठेवायचे? जास्त केले तर उद्या मुले आपल्याला overprotect करतात असे म्हणतील, नाही पाहीले तर बाकीच्या गोष्टीचा बागुलबुवा. ही सीमारेषा मिळणे खरच कठीण आहे.
आणि मी असे आजिबात नाही म्हटले की शाळेत मुले हे शिकतात, (बाकिच्या शाळातिल मुलेहि करत असतिलच कि ग, पण ... पण तेथील रोडवर ही मुले, युनिफोर्म मधिल दिसतात असे कळाले म्हणुन लिहिले, just to think and check b4 any decision) माझा शाळेवर आक्शेप नाही. पण खरे सांगु लोकल ट्रेन मधे तर मी कोणालातरी बोलताना त्या शाळेचा डोनेशन चा आकडा ३ लाख ऐकला होता. जास्त शहाणपणा होइल म्हणुन आधीच्या पोस्ट मधे लिहिले नव्हते. नंतर मुलांबद्दल असे कळाले, मग वाटले जे लोक ३ लाख देतात त्याना मुलांनी काहिही केलेले चालत असेल्. त्यामुळे मी त्या शाळेचा विचारच सोडला (नाही म्हणजे विषाची परिक्शा का घ्या?) - पण सगळी माहिती मात्र ऐकीव.

रुणुझुणू, माझ्या मते वयाप्रमाणे admission मिळायला काही हरकत नाही. हो पण बहुतेक entrance test द्यावी लागत असेल (for that particular standard). Mostly before shifting you should check the syllabus, and get your kids prepared for the same, for easy admission.

.

डोनेशनची रिसित नाहीच मिळत. मागितल्यास आदरपूर्वक अपमान करण्यात येतो.

मो. ह. विद्यालयात आठवीपासून सायन्स गणित ईंग्रजीतून आहे. तरीही शाळा मराठीच Happy

श्रीरंग विषयी बोलायला धजावत नाही. अ‍ॅव्हरेज पेक्षा कमीच रेटींग देईन मी तरी.

मला वसंत विहारने डोनेशनची पावती दिली आहेत. वर शाळा सोडताना व्याजासकट रक्कम देऊ असेही सांगितले आहेत. खरे/खोटे कळायला अजून वेळ आहे. Happy

सिंघानियाचा रिपोर्ट अजून तरी माझ्या माहितीप्रमाणे चांगलाच आहे. मुले सिगरेट वगैरे शाळेच्या आसपास तरी ओढताना दिसलेली नाहीत (सेंट जॉन सारखी).

मी सुद्धा M.H. (मो.ह.वि. ठाणे) चा विद्यार्थी.. हल्लीच काही वर्षांपुर्वी मुंबै विभागातुन मो.ह.वि. ठाणेचा विध्यार्थी पहीला आला होता.. तब्बल १२० वर्षांचा इतिहास असलेली शाळा .. Happy असो मात्र मला से वाटते की SSC ऐवजी CBSE चाच अभ्यासक्रम चांगला आहे. SSC साठी वसंत विहार चांगला पर्याय आहे तिथे jolly phonics वै. स्विकारले आहे.

जर नोकरी बदलीची असेल भारतात, middle east etc. तर cbse चा पर्याय चांगला. पण डोनेशन चे आकडे बघुन मला दिल्ली NCR बरे वाटतय. येथील शाळा पण चांगल्या आहेत आणि without receipt पैसे पण मागत नाहीत (म्हणजे मला नाही मागीतले).

धन्यवाद असुदे.
८०के फारच आहेत Sad
शाळाप्रवेशाबद्दल विचारताना सिगारेट हा विषय येऊ शकेल हे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. मंजूडी म्हणते बरोबर वाटतेय. पण आधीच फार खराब रिपोर्ट असतील तर ते ही माहीत असलेले बरे.

मध्यमवर्गीयांसाठी शाळा नाहीत का काय फारशा? सगळ्या हाय्फाय आणि महागच आहेत. सर्वसाधारण किती फी असते शाळेमधे आणि वर्षभरात काय काय खर्च एक्पेक्टेड असतात?

मंदार, तुमचा मुलगा कोणत्या शाळेत जातो? दिल्लीत नोयडा, गुडगाव आणि द्वारका भागात बर्‍याच नविन आणि चांगल्या शाळा उघडल्या आहेत असं ऐकलय.
आम्ही पण शोधतोय शाळा. हे वर्षभर शाळांची माहिती काढून ठेवावी लागेल, पुढच्या वर्षी प्रवेश घ्यायचा तर. मी मागे माझ्या बॉसकडून संस्कृती या शाळेचं खूप कौतुक ऐकलं होतं. काल कळालं की त्या शाळेची मासिक फी १२-१५ हजार आहे. एवढी तर माझी चारी वर्षांची मिळून इंजिनिअरींगची फी पण नव्हती. Sad

तो khaitan Public School, Noida ला जातो. Admission Fee 36000/- (incl first quareter fee) monthly fee 3990/- (incl trasporation) CBSE.

Pages