आठवणींच्या हिंदोळ्यावर — "राजमाची बाईक ट्रेक"

Submitted by जिप्सी on 29 January, 2011 - 01:35

राजमाची पाहायची खुप दिवसांपासुन इच्छा होती, पण मुहूर्त काही मिळत नव्हता. लवकरच तो योग जुळुन आला आणि राजमाचीचे दर्शन झाले ते बालदिनी (१४ नोव्हेंबर, २०१०). मायबोलीकर कविता नवरे यांनी आयोजित केलेल्या "लहान मुलांसोबत राजमाची ट्रेक"च्या निमित्ताने. मी पाहताक्षणी राजमाचीच्या प्रेमात पडलो आणि त्याचवेळी पुन्हा एकदा हा ट्रेक करायचाच हा विचार आला. बालदिनानिमित्त केलेला हा ट्रेक उत्तम संयोजनामुळे कायमचा स्मरणात राहिला. हा ट्रेक संपवून घरी निघताना राजमाची मला परत येण्यास खुणावत होता. त्याच्या हाकेला उत्तर म्हणुन आणि राजमाचीच्या प्रेमापोटी परत दोनच महिन्यात त्याला भेटण्याचा घाट घातला.

"परबतोंसे आज मैं टकरा गया, तुमने दि आवाज लो मैं आ गया...."

खरंतर ८ जानेवारीला आम्ही बाईकवरून "तुंग"चा प्लान केला होता. यो रॉक्सकडुन माहितीहि घेऊन झाली होती, पण अचानक आदल्यादिवशी काही कारणांमुळे बेत रद्द झाला Sad आणि त्याच्याबदल्यात २२/२३ जानेवारी राजमाची बाईक ट्रेक ठरला. मित्रांना ईमेल गेले. राजमाचीचा बेत ठरल्यानंतर काहि दिवसातच मायबोलीवर २२/२३ तोरणा राजगडचा प्लान ठरवला गेला :(. इकडे राजमाची आणि तिकडे तोरणा-राजगड. खरंतर तोरणा-राजगड हा ट्रेक अविस्मरणीय असणार"" हे तेंव्हाच लक्षात आले, पण राजमाचीचा प्लान आधीच केला असल्याने, सह्याद्री गिरिभ्रमणचे आमचे कॅप्टन शैलेंद्र सोनटक्के यांच्याकडुन फोन नंबर घेऊन राजमाचीला येण्याचे आधीच कन्फर्म केल्यामुळे आणि माझ्यामुळेच "तुंग" ट्रेक रद्द झाल्याने मला राजमाचीला जाणे भाग होते. आमच्यापैकी मी एकटाच याआधी राजमाचीला गेलो असल्याने बाकि माझ्यावरच अवलंबुन होते. ठरल्याप्रमाणे १०जण जाण्यासाठी तयार झाले होते. ५ बाईक्स आणि १० जण. पण आयत्यावेळी टांग देणारे "टांगारू" यांनी "नकाराचा नारळ" फोडल्याशिवाय कुठलेही ट्रेक/आउटिंग्स कसे सुरू होणार? अर्थात आम्हीही याला अपवाद नव्हतो. जाण्याच्या दिवशी १० पैकी मी, अनिल (LBकर्स), प्रसाद, विजय (Pataniकर्स) प्रशांत (Capegeminiकर) आणि अभिषेक (DataMatcisकर) असे सहा ITकर्स, Trekकर्स तयार झालो. :-). फायनली ३ बाईक्स आणि ६ जण.

चौघेजण डोंबिवली-टिटवाळ्यवरून येणारे असल्याने ठिक ७:३० वाजता पळस्पे फाट्याला (दत्त स्नॅक्स) भेटण्याचे ठरले. थंडी चिक्कार असणार याची कल्पना असल्याने सॅक बरोबर स्वतःलाही पॅक करून प्रवासाला सुरुवात केली. ठरल्याप्रमाणे मी आणि अनिल ठिक ७:२९ ला पळस्पेला पोहचलो आणि बाकीचे लेट कमर्स फक्त पाऊण तास उशिरा आले. नाश्ता करून परत बोचर्‍या थंडीत प्रवासाला सुरुवात झाली.. "धुंद हवा बहर नवा झोंबतो गारवा......" असेच काहि वातावरण होते. पळस्पेवरून निघाल्यावर थेट खंडाळा घाटात "शिंग्रोबाच्या" मंदिराजवळ भेटायचे ठरले. मी, अनिल, प्रशांत, विजय असे चौघे एकत्र तेथेच भेटलो पण अभिषेक आणि प्रसाद मात्र शिंग्रोबाच्या मंदिराजवळचा उजवा रस्ता सोडुन सरळ गेले आणि मंदिरात "अभिषेक" न करता, "प्रसाद" न घेता थेट कामत हॉटेल जवळ जाऊन पोहचले. Proud

पुढे लोणावळा शहरात जाण्याआधी एक रस्ता कुणेगावात (समर हिल्स रिसॉर्ट, डेल्ला अ‍ॅडव्हेंचर क्लब हे लॅण्डमार्क)जातो त्याच रस्त्याने राजमाचीला जाणार होतो. अर्थात आतापर्यंतचा प्रवास हा अगदी सुरळीत
आणि मस्त झाला होता. मात्र पुढे जाणारा रस्ता हा खडतर असणार हे मात्र त्यावळणावरच समजले. (आधीच्या राजमाची ट्रेकमध्ये मिनी बसमधुन अर्ध्या रस्त्यापर्यंत थेट गेल्याने हे जाणवले नव्हते. :)).

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

लोणावळ्यापासुन राजमाचीला जाणारा रस्ता बराच खडकाळ आहे. हि वाट स्वप्नातली नक्कीच नव्हती, कुठेतरी संपवावी असेच वाटत होते. पण खडतर तपश्चर्या केल्याशिवाय देवाचे दर्शन होतच नाही ना. Happy
काहि ठिकाणी तर चक्क मागे बसलेल्यांना उतरून चालावे लागत होते(त्यात अनिल सोबत बसलेल्या विजयचा क्रमांक बराच वरचा होता :फिदी:), काहि ठिकाणी बाईक्सला जोडीने नमस्कार करावा लागत होता, तर काहि ठिकाणी तिला कुरवाळत पुढे ढकलावी लागत होते. Happy प्रसाद आणि अभिषेकने तर भुसभुशीत मातीत चक्क लोटांगण घातले. Happy संपूर्ण प्रवासात धडपडीपासुन वाचलो ते फक्त मी आणि प्रशांत ;-).

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७
गावच्या वेशीवरील वीरगळ
गावाचे रक्षण करताना वीरगती प्राप्त झाली कि त्याला दैवत्व प्राप्त होते आणि गावच्या वेशीवर त्यांची स्थापना केली असता गावावर येणारे संकट सीमेवरूनच परत जाते या विश्वासातुन हे वीरगळ उभारले जातात. (संदर्भ: "डिस्कव्हर महाराष्ट्र")

अशीच हि खडतर वाट एका वळणावर संपली आणि राजमाचीच्या अनेक आकर्षणांपैकी एक असलेल्या "मिनी कोकणकड्याचे" व श्रीवर्धन किल्ल्याच्या बुरूजाचे दर्शन झाले. त्याच्या दर्शनाने त्या खडकाळ वाटेचा विसर पडला आणि "याच्यासाठी केला होता अट्टाहास..." याचा प्रत्यय आला. Happy

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

थोड्यावेळातच उधेवाडी गावात पोहचलो. बाईक्स पार्क करून, सॅक घरात ठेवून फ्रेश होऊन मस्तपैकी जेवलो आणि शंकराचे पुरातन मंदिर व तलाव पाहण्यासाठी निघालो. अतिशय सुंदर आणि शांत अशी ती जागा आहे. शंकराच्या मंदिरात कितीतरी वेळ केवळ शांत बसुन राहिलो.

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६
गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या.... Happy

प्रचि १७
हे मासे पाहता मला छोटे मालक (श्रेयस) आणि बूमर/श्रीखंड आठवले. Happy

प्रचि १८

प्रचि १९

सूर्यास्त मनरंजन गडावरून पाहयचा होता म्हणुन नाईलाजाने आम्ही तेथुन निघालो. घरी जाऊन मस्तपैकी चहा पिऊन मनरंजनकडे कूच केली. आजुबाजुचा निसर्ग पाहत, फोटोसेशन करत साधारण अर्ध्यातासात गडाच्या माथ्यावर पोहचलो. वातावरण धूसर असल्याने आजुबाजुचे किल्ले, खंडाळ्याच्या घाटातुन धावणारी झुकझुक गाडी काहि दिसली नाही, पण सूर्यास्ताचे काहि फोटो मात्र छान मिळाले. भैरोबा मंदिराच्या डावीकडची वाट मनरंजन गडावर तर उजवीकडची वाट श्रीवर्धन गडावर घेऊन जाते.

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२
मनरंजन माचीवरून दिसणारी श्रीवर्धनाची तटबंदी

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

मनरंजन किल्ला मनसोक्त पाहुन परत खाली गावात परतलो. रात्रीचे जेवण झाल्यावर घराच्या मागेच असलेल्या शेताजवळ "कॅम्प फायर" करण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे तयारी केली आणि कॅम्प फायरसाठी
लाकडे/गवत गोळा करत असताना टॉर्चच्या उजेडात अर्ध्या बिळात घुसलेला "हा" दिसला ;-), पण नंतर कळले कि ती "कात" आहे, त्यामुळे निर्धास्तपणे कॅम्पफायर "एन्जॉय" केला. सकाळी परत जाऊन त्याचे व्यवस्थित फोटो काढला. Happy

प्रचि २७

रात्री मस्तपैकी गप्पा मारत कधी झोप लागली ते कळलेच नाही, जाग आली ती मोबाईलच्या गजराने. फ्रेश होऊन सूर्योदयाचे फोटो काढण्यासाठी मी बाहेर पडलो. सूर्योदयाचे फोटो काही मिळाले नाही पण आपली
नाईट शिफ्ट संपवून आणि पुढच्या शिफ्टचे काम सूर्यदेवाला हॅन्डओव्हर करून घरी परतणार्‍या चांदोबामामांनी मात्र मस्त पोझ देऊन माझ्याकडुन फोटोसेशन करून घेतले.

प्रचि २८

प्रचि २९
एक प्रयत्न

मामींनी दिलेले गरमागरम कांदेपोहे व चहा संपवून श्रीवर्धनमाचीकडे कूच केली. श्रीवर्धनमाची मनरंजनपेक्षा तुलनेने मोठी आहे. साधारण पाऊण तासात आपण गडाच्या माथ्यावर पोहचतो. या गडाला दुहेरी तटबंदी
आहे. गडाचा मुख्यदरवाजा, धान्याची कोठारे, पाण्याच्या टाक्या बर्‍यापैकी शाबुत आहे. साधारण दिड दोन तासात पूर्ण गड पाहुन होतो.

प्रचि ३०
गडावरून दिसणारी गर्द हिरवाईतील भैरोबाचे मंदिर

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८
राजमाचीच्या वाटेवरची रानफुले
प्रचि ३९

प्रचि ४०

प्रचि ४१

साधारण २ तासात संपूर्ण किल्ला बघुन आम्ही खाली गावात परतलो. परत तलावावर जाऊन मस्तपैकी आंघोळ करून, दुपारचे जेवून परतीच्या वाटेवर लागलो. पण जाताना "तुला परत भेटायला नक्की आवडेल" हे मात्र राजमाचीला सांगायला विसरलो नाही.

राजमाची ट्रेक नंतर प्रसादने लिहिलेली चारोळी. Happy

परवाच्या दिवशी राजमाची पहिला....
कडेवर मज घेऊन खूप काही बोलला
राजांच्या खुणा अभिमानाने मिरवताना...
अनावर आठवणींने मधेच गहिवरला.

गुलमोहर: 

लई भारी फोटो! प्रचि मिनी कोकणकडा, सूर्यास्त, भैरोबा मंदिर आणि शेवटचा निळ्या फुलांचा फोटो फार आवडला! Happy (सर्वात आवडला तो बेडकाचा फोटो... काय मस्त तंगड्या पसरुन तरंगतय बेणं!! :P)

मस्तच योगेश!!!!
बालदिनाच्या आठवणी ताज्या झाल्या, राजमाचि पुन्हा एकदा फोटो सफर करवुन आणल्या बद्दल धन्स.......................

७:२९ ला पळस्पेला पोहचलो
>>:) Happy ७:२९???
अभिषेक आणि प्रसाद मात्र शिंग्रोबाच्या मंदिराजवळचा उजवा रस्ता सोडुन सरळ गेले आणि मंदिरात "अभिषेक" न करता, "प्रसाद" न घेता थेट कामत हॉटेल जवळ जाऊन पोहचले.
>> Happy :):) उलट तो रस्ता फार सोपा होता ट्रफ्फिक नसल्याने आम्हि लवकर पोचलो.

काहि ठिकाणी तर चक्क मागे बसलेल्यांना उतरून चालावे लागत होते(त्यात अनिल सोबत बसलेल्या विजयचा क्रमांक बराच वरचा होता फिदीफिदी), काहि ठिकाणी बाईक्सला जोडीने नमस्कार करावा लागत होता, तर काहि ठिकाणी तिला कुरवाळत पुढे ढकलावी लागत होते. स्मित प्रसाद आणि अभिषेकने तर भुसभुशीत मातीत चक्क लोटांगण घातले. स्मित संपूर्ण प्रवासात धडपडीपासुन वाचलो ते फक्त मी आणि प्रशांत

भुसभुशीत शोधतच होतो मी.
बाकि लेखन आणि फोटोज तर अप्रतिम!!!!!!!! लाईक्स लाईक्स लाईक्स :):):)

जिप्सी.. मस्त फोटुग्राफी नि आता वर्णन पण छानच लिहीतोयस... अजून येउ दे आता Happy मला बेडकाचा नि चंद्राचा फोटो खूप आवडला..

धन्यवाद योगेश!!! एक अणखीन अवीस्मर्णिय ट्रेक!! आणि तुझ्या शिवाय ही ईतकी सुन्दर होने अशक्यच! कोटि कोटि धन्स. अप्रतिम प्रचि. अणि वर्णन. आणि हो तु केलेला प्रयत्न प्रचि. २९ तर खरच सुरेख अलाय.

"अभिषेक आणि प्रसाद मात्र शिंग्रोबाच्या मंदिराजवळचा उजवा रस्ता सोडुन सरळ गेले आणि मंदिरात "अभिषेक" न करता, "प्रसाद" न घेता थेट कामत हॉटेल जवळ जाऊन पोहचले. "==> खुपच छान.

आप्रतिम प्रचि: ५, ८, १६, २६, २९, ३६...

छान वर्णन व प्र. चि. दोन्हिही. आवडले. विनोद चांगले पेरलेत. Happy

सगळ्या सापांनी, फॅशन आल्यासारखी कात टाकायला सुरवात केलीय का ? सगळ्यांनाच दिसतेय ती.

काही जातीच्या खारी, सापाची कात चूरडून अंगाला फासतात. म्हणजे त्यांच्या अंगाला पण सापासारखा वास येतो आणि बाकीचे प्राणी, त्यांच्या वाटेला जात नाहीत. (आधार - सर अटेन्बरो )

दिनेशदा, ती कात आहे हे आधी रात्रीच्या अंधारात कळलेच नाही, विजेर्‍यांच्या प्रकाशात नीट बघितल्यावर बिळात अर्धी घुसलेली ती सापाची "कात" असल्याचे कळले. Happy

खारीची माहिती नविन. Happy

तुझा लेख नेहमी प्रमाणे अतिशय अप्रतिम आहे....आमच्या नावाचा अगदी योग्य उपयोग केला आहेस..:-)....आणि योगेश तुझ्या अप्रतिम लेखाला माझी शेवटची चारोळीची फोडणी मिळाल्याने लेख खरच खमंग आणि खुस खुशीत झाला आहे...हा...हा...:-) Happy

तुझा लेख नेहमी प्रमाणे अतिशय अप्रतिम आहे....आमच्या नावाचा अगदी योग्य उपयोग केला आहेस..:-)....आणि योगेश तुझ्या अप्रतिम लेखाला माझी शेवटची चारोळीची फोडणी मिळाल्याने लेख खरच खमंग आणि खुस खुशीत झाला आहे...हा...हा...:-) Happy

बहोत खूब..!

तुझ्या प्रचिंना आता एक काळी छोटी तिटुकली लावत जा योगेश..!
अगदी दृष्ट लागण्यासारखे फोटो टाकतोस म्हणून म्हटलं हो.. Happy

माझ्या माहिती प्रमाणे ती वीरगळ नव्हे. वीरगळ म्हणजे त्या गावातील कुठल्या तरी योध्याची आठवण काढण्यासाठी बनवलेले मानचिन्ह.. त्यात लहानपणापासूनचा ते मरेपर्यंत प्रवास (ठळक घडामोडी) दाखवलेला असतो.. पण आपण पाहतो त्यात ३-४ प्रसंग असतात. मधल्यात लढाई असते तर शेवटी शिवलिंग असते..म्हणजे लढाईत मरण पावला.. जर नैसर्गीक रित्या मरण पावला तर दुसरे काहीतरी असते...
आताशी धबधब्याचे नावही लोक बदलतात् (मध्यंतरी नाणे घाटातील धबधब्याचे नाव पुस्तकात आपल्या मित्राच्या नावाने लिहीले होते)...तर असे पण सांगत असतील..
बाकी वेशीवरचा देव संकटांना घालवतो हे बरोबर आहे पण वीरगळ ती नाही आणी वीरगळ ते काम करत नाही..

जिप्सी,
तुम्ही केलेले वर्णन आणि प्रची. नेहमिप्रमानेच अवर्णनीय.
यावर प्रतिक्रिया द्यायला माझ्याकडे शब्दच नाहीत. त्यामुळे नेहमीचेच शब्द वापरते. छान, मस्त, अप्रतिम, लई भारी. त्या बेडकीचा फोटो पण मस्तच आलाय. कालच शिवनेरीला जाऊन आले. त्याची आठवण झाली.
तुमच्या फोटो आणि वर्णन यामुळे आम्हाला प्रत्यक्ष जाऊन आल्याचा अनुभव मिळतो. मी कोकणकन्या असल्यामुळे हे सर्व सर्व अनुभवलय. त्यामुळे मला हे पहायला फार फार आवडत.
तुमची मी फार फार आभरी आहे.

Pages