भारतातील एक पिढी ज्या विफल स्वप्नासाठी जगली त्याच प्रतीक म्हणून हा चित्रपट पाहता येइल.रिलीजच्या वेळी हा पॉलिटीकल मूव्ही आहे असा बराच बोलावा होता पण खर पाहता ही भीन्न ideology असलेल्या त्या तिघांची गोष्ट आहे ज्यांच्या आयुष्यातली उलथापालथ ही देशातल्या अतिशय turbulent period च्या पार्श्वभूमीवर घडते.आणीबाणी आणी नक्षलवाद यावर भाष्य करताना खूप थोडे चित्रपट खर बोलतात.बरेचदा ते मूग गीळुन गप्प बसतात कींवा फारच loud होतात.यात कोणतही उत्तर शोधायचा प्रयत्न केलेला नाही आहे, नाही कोणताही संदेश दिलाय.तीन व्यक्ती एकाच टप्प्यावर प्रवास सुरु करून वेगवेगळ्या मार्गाने जातात आणी आपण केलेल्या choices नुसार त्यांना त्यांचा end मिळतो.गुंतागुंतीची कथा, अगदी brutally brutal शेवट, बर्याच त्रुटी खूप सारे निसटलेले क्षण यातुन शेवटी या चित्रपटात जे काही उरत ते प्रचंड intensely मनाला भिडत.
दील्लीच्या सेंट स्टीफन कॉलेज मधे कथा सुरु होते.देशात नक्षलवादी चळवळ मूळ धरु लागलिये.(साठच्या दशकात पोचुपर्यंत स्वातंत्र्यसंग्राम आणी नंतरच उज्ज्वल भवितव्य याभोवती गुंफलेल रॉमँटीक नेहरुवियन स्वप्न संपल होत.बेकारी, भ्रष्टाचार, गरीबी, शोषण याने हताश झालेला भारतिय बुद्धीजीवी तरुण वर्ग मोठ्या संख्येने नक्षलवादा कडे वळला.चित्रपटात सुरुवातिला नेहरुंच tryst with destiny तले काही उतारे येतात आणी पुढचा उपहासात्मक सुर लक्षात येतो).सिद्धार्थ तय्यबजी (के के) हा श्रिमंत घरात जन्मलेला मुलगा, कम्युनिझम आणी त्यायोगे बंगाल मधे चाललेल्या नक्षलवादी चळवळी कडे ओढला गेलाय.गीता राव (चित्रांगदा सींग) ही ईंग्लड मधे वाढलेली मुलगी सिद्धार्थच्या प्रेमात आहे, तीला या राजकीय चळवळीशी फारस देणघेण नाहिये, फक्त सिद्धार्थ साठी म्हणून ती या ग्रूपमधे थोडीफार मिसळते.विक्रम मल्होत्रा (शायनी अहुजा) हा गांधीवादी वडीलांचा मुलगा आपल्या कनीष्ठमध्यमवर्गीय परीस्थीतितुन बाहेर पडायच्या प्रयत्नात आहे, यासाठी तो कोणत्याही मार्गाचा वापर करायला तयार आहे.याच गीतावर निरातीशय प्रेम आहे पण ती याला फक्त एक मित्र म्हणुनच पाहते.कॉलेजच्या शेवटच्या दिवसात सिद्धार्थ बिहारमधील भोजपुर मधे बरोबरीच्या मित्रांना घेउन जाण्याच्या तयारीत आहे.गीतासह बरेच जण शेवटी जाण्यास नकार देतात.सहा महीन्यांसाठी म्हणुन गेलेला सिद्धार्थ परतत नाही.गीताला तो पत्रातुन त्याच आयुष्य आता कीती वेगळ आहे आणी ते दोघ एकत्र येण शक्य नाही हे कळवतो.मोडून पडलेली गीता पुढच्या शिक्षणासाठी परदेशी निघुन जाते.विक्रम तीला पत्र पाठवत राहतो पण ती फारसा संबंध ठेवत नाही.दोन वर्षं निघुन जातात या दरम्यान विक्रम उच्चपदस्थ लोकांशी लागेबंधे बनवून एक "फिक्सर" बनतो.एका पार्टीमधे त्याला पुन्हा गीता दिसते.तीच अरुण या IAS ऑफीसरशी लग्न झालेल असत.विक्रम गीताला विसरला नाहिये.तो पुन्हा तिला भेटत राहतो.इकडे गीता अजूनही सिद्धार्थशी पत्राद्वरे संबंध ठेउन आहे आणी त्याला चोरुन भेटते हे विक्रमला कळत.शेवटी गीता नवर्याला सोडुन सिद्धार्थ बरोबर भोजपूरला येते.यादरम्यान तिचा विक्रमशी पत्रव्यवहार चालू राहतो.विक्रम एका well connected मुलीशी लग्न करतो.गीता महिलांसाठी एक शाळा चलवण्यास सुरु करते, ती आणी सिद्धार्थ लग्न करतात त्यांना एक मुलगाही होतो.इकडे सिद्धार्थ च्या मागे पोलिसांचा ससेमिरा सुरुच राहतो.देशात आणीबाणी जाहीर होते.गीता,सिद्धार्थ आणी बर्याच कार्यकर्त्यांना पोलिस पकडतात. तुरुंगात यांच्यावर बरेच अत्याचार होतात. विक्रमला जेंव्हा हे कळत तेंव्हा तो गीताला अरुणच्या मदतिने सोडवतो.तुरुंगातून पळून जात असताना सिद्धार्थला गोळी लागते त्याला गावातल्या हॉस्पीटल मधे दाखल केल जात.आपल्याला नंतर मारुन टाकल जाणार आहे हे कळल्यावर घाबरलेला सिद्धार्थ डॉक्टरांना आपल्या वडीलांना कळवण्यास सांगतो. ही बातमी कळाल्यावर विक्रम गीतासाठी म्हणून सिद्धार्थला आणण्यास निघतो.वाटेत त्याच्या गाडीचा अपघात होउन तो त्याच हॉस्पीटल मधे येतो जिथे सिद्धार्थ आहे.रात्री कार्यकर्ते सिद्धार्थला सोडवतात.सकाळी सिद्धार्थ गायब झालेला बघून पोलिस शेवटी कोणाला तरी मारायच म्हणुन विक्रमला जबरी मारहाण करतात, मदत मिळेपर्यंत त्याला खूपमोठी इजा होते.चित्रपटाच्या शेवटी घाबरलेला आणी ideology वरचा विश्वास उडालेला सिद्धार्थ परदेशी निघुन जातो.जवळपास पॅरॅलॅटीक बनलेल्या विक्रमला बरोबर घेउन गीता गावी परतते आणी आपल काम चालू ठेवते.
सुरुवातीला चित्रपटाचा सर्व फोकस सिद्धार्थ आणी राजकीय चळवळ यावर आहे.जसाजसा तो पुढे सरकतो तशी कथा वेगवेगळी वळण घेते आणी इतर पात्र जोमाने उभारतात.
के के मेनन हा एक उत्तम अभीनेता आहे, सुरुवातिचा बंडखोर सर्व जग बदलायला निघालेला आणी नंतर आपण नक्की काय करतोय यामुळे गोंधळलेला आणी शेवटी आपल्या एकंदर तत्वांवरचा विश्वास उडालेला सिद्धार्थ याने छानच व्यक्त केलाय.परदेशातुन गीताला पाठवलेल्या पत्रात तो म्हणतोय मी आता मेडीसिन शिकतोय आणी आशा करतोय की मानवी शरिराचा अभ्यास तरी कमी गुंतागुंतीचा असेल.
गीता आधी फक्त सिद्धार्थ च्या प्रेमात आहे, तीला नाही कोणत्या चळवळीत पडायच आहे नाही तिची काही खास तत्व आहेत्.चित्रांगदा सिंगची गीता बघणे हे या चित्रपटाच सर्वात मोठ आकर्षण.ती यात अप्रतीम सुंदर दिसते आणी त्याही पेक्षा जास्त प्रभावी पणे गीताची घालमेल, तिच आपल चुकतय हे समजुन सुद्धा सिद्धार्थकडे ओढल जाण, हळूहळू आपण करतोय त्या कामावरचा विश्वास द्रुढ होत जाण
समोर येत. हे या चित्रपटातल सर्वात जास्त कणखर पात्र.जीथे हळूहळू सिद्धार्थ confuse होत जातो तितकीच गीता अधीक अधीक डोळस पणे या कामाकडे पाहते.विक्रमच्या तिच्यावरील प्रेमाची तीला पूर्ण कल्पना आहे.खरे पाहता शेवट पर्यंत ती त्याचा उपयोग करुन घेत राहते.ह्या एकंदर व्यक्तीरेखेमधे इतकी जादू आहे की तिच्या संपर्कात आलेले सर्वजण तिच्याकडे ओढले जातात.
विक्रम हे सिद्धार्थच्या अगदी विरुद्ध टोक.आपल्या वडीलांच्या गांधीवादी विचारांचा त्याला तिटकारा आहे.गीताला लिहीलेल्या सुरुवातिच्या एका पत्रात तो म्हणतो when you all are trying to find a way out, i am finding a way in.अंगीच्या धूर्तपणामूळे आणी एकंदर मिट्ठास वागण्या बोलण्याने तो social ladder चांगलीच वर चढलाय.शायनी अहूजा हे चित्रपटाच सर्वात pleasant surprise.सुरुवातीला सिद्धार्थचा असणारा हा चित्रपट नंतर पूर्णपणे विक्रमचा बनतो.शायनीच्या डोळ्यातून त्याच्या गीताबद्दलच्या भावना खूप तीव्रपणे व्यक्त होत राहतात्.चित्रपटाच्या शेवटी या पात्रच जे काही होत त्याबद्दल बरच दुमत असल तरीही विक्रम ही खूपच वेगळी व्यक्तीरेखा आहे.
२००४ साली प्रदर्शीत झालेल्या या चित्रपटाची कथा आणी दिग्दर्शन होत सुधीर मिश्रांच.संगीत होत शंतनू मोइत्राच आणी स्वर स्वानंद कीरकीरेचे.भारताबाहेर चित्रपटाला जास्त प्रसीद्धी मिळाली.आपल्याकडे हा चित्रपट तमाम "खादीवाल्या" आणी "झोलावाल्यांच्या" गळयातला ताइत बनला असला तरी इतर लोकांना याबद्दल फारच कमी माहीती आहे.चित्रपट पाहताना एक खूप multi layered कादंबरी वचतो आहे अस जाणवत.मिश्रांच्या सर्व चित्रपटात हरलेली/गोंधळलेली पात्र असतात तशी यात ही आहेत.या तीनही पात्रांची भावनीक गुंतागुंत अतीशय ताकदीने मांडली आहे पण एकंदर राजकीय धामधूम दाखवताना चित्रपट बर्याच ठीकाणी घरंगळतो.तरीही हा चित्रपट खूप खूप वेगळा आहे, भारतात अशा तर्हेचे प्रयत्न आजीबात होत नाहीत.चित्रपट संपल्यावर तो डोक्यात नंतर कित्येक दिवस घोळत राहतो.कुठे मिळाल्यास हा चित्रपट जरुर पहावा.
हा पाहिला आहे. आवडला होता.
हा पाहिला आहे. आवडला होता. चित्रांगदा सिंग मस्तच दिसली आहे !!
रसग्रहण आवडलं!!
मस्त लिहिले आहे! कुठेही
मस्त लिहिले आहे!
कुठेही डॉक्युमेंट्री न होउ देता, ६०च्या दशकातील कॉलेज,राजकारण, नोकरशाही याचे उत्तम 'इनसाईडर्स व्ह्यू' चित्रिकरण आहे.
चित्रांगदा सिंग बेस्ट, 'इंटेलेक्चुअल मॅन्स सेक्स सिंबल' इ.इ.
"बावरा मन देखने चला इक
"बावरा मन देखने चला इक सपना,
बावरेसे मनकी देखो बावरी है बातें,
बावरीसी धडकने हैं, बावरी हैं सांसे..."
या चित्रपटातले हे एक अप्रतिम गाणे...महान स्वानंद किरकिरे!
@आगाऊ.. अगदी अगदी.. छान
@आगाऊ.. अगदी अगदी..
छान लिहिलयेत नेतिरीजी..
बावरा मन वर स्वतंत्र लेख होइल इतकं सुंदर गाणं आहे..
अगदी गुलजारच्या तोडीचं...
@ mukta बावरा मन वर स्वतंत्र
@ mukta
बावरा मन वर स्वतंत्र लेख होइल हे अगदी मान्य, म्हणूनच यात काही लिहील नाही.
thanks all
छान लिहल आहे , मी पाहिलाय हा
छान लिहल आहे :), मी पाहिलाय हा सीनेमा मला पण आवडलेला, के. के., चित्रगंधा, शायनी मस्तच चित्रपटाचा शेवट पण अजबच ....