बोलगाणी

Submitted by संयोजक_संयुक्ता on 27 January, 2011 - 18:41

बालगीत/बडबडगीत स्पर्धा

mbs_bolagani.jpg

गेल्या वर्षीचा हा लोकप्रिय कार्यक्रम(स्पर्धा) यंदाही ठेवणार आहोत. मागच्या वर्षी भाग घेतलेल्या सगळ्या छोट्यांच्या बडबडगीतांनी मायबोलीकरांना भरभरुन आनंद दिला. यावर्षीही भरपूर सुंदर, गोड गाणी ऐकायला मिळोत. चला तर मग लागा तयारीला..

१. ही स्पर्धा एकाच वयोगटात घेण्यात येणार आहे: वय वर्षे ० ते ५

२. स्पर्धेसाठी प्रवेशिका marathibhasha@maayboli.com वर पाठवावी. सोबत पालकाने आपला मायबोलीवरचा आयडी कळवावा. पाल्याचे नाव व वय लिहावे तसेच पाल्याचे नाव जाहीर व्हायला नको असल्यास तसे नमूद करावे.

३. प्रवेशिका पाठवताना ई-पत्राच्या विषयामधे Marathi Bhasha : Bolgani असे नमूद करावे.

४. स्पर्धेसाठी माध्यम: व्हिडीओ, ऑडिओ

५. स्पर्धकांनां एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठवण्याची मुभा आहे

६. साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख: २० फेब्रुवारी, २०११

अधिक माहितीसाठी संयोजक समितीशी marathibhasha@maayboli.com इथे संपर्क साधावा अथवा ह्याच पानावर आपला प्रश्न विचारावा.

मराठी भाषा दिवस २०११ च्या इतर कार्यक्रमांसाठी इथे बघा.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झालंय आमचं धक्कागीत रेकॉर्ड. नाकी नऊ आणले पोरीने. फ्रॉकशी खेळत आवाजाच्या पट्ट्या बदलत अपनीही धुनमें..बघू आज परत एक प्रयत्न करीन. नाहीतर आहे तेच पोस्ट करीन.

रुणूझुणू, तुमच्या प्रवेशिका मिळाल्या आहेत आणि सगळ्या फाइल्स व्यवस्थित चालतायत Happy

प्राजक्ता, तुम्ही पाठवलेली फाइलही व्यवस्थित चालत्ये. तुम्हाला तसं इमेल नी कळवलं आहे Happy

जयु, कृपया परत एकदा प्रवेशिका पाठवणार का?

-धन्यवाद!

धन्यवाद संयोजक.
तीन गाण्यांमधून कुठलं पाठवायचं हे काही लेकाचं निश्चित होईना. म्हणून तिन्ही पाठवल्या आहेत. Happy

मंजूडी,
तुम्ही पाठवलेली प्रवेशिका मिळाली. फाईल व्यवस्थित प्ल्ये होत्ये.

धन्यवाद!

फ्रॉकशी खेळत आवाजाच्या पट्ट्या बदलत अपनीही धुनमें..बघू आज परत एक प्रयत्न करीन. नाहीतर आहे तेच पोस्ट करीन>>>> Happy
अगदी हीच परिक्षा आमच्याकडेपण, परत रेकॉर्ड करायचा प्रयत्न तर पुर्ण फसला. आहे तसेच पोस्टले, पट्ट्या बदलत आणि थोडे मधिल म्युझिक सकट हाहाहा.

संयोजक_संयुक्ता, दिसते / ऐकु येते का ते १दा सांगा म्हणजे मी सुटेन आणि पोराला पण सोडुन देईन. कसाबसा मुडात आणुन रेकॉर्ड करुन घेत्लेये ना Happy

मदत मदत, साईझ जास्त आहे फाईलची, ५८ एम. बी., जात नाहीये. काय करु? झीप करुनही फायदा होत नाहीये. कोणता फॉरमॅट वापरु?

मोनाली, आपण कुठल्या फॉरमॅट मधे गाणे पाठवत आहात? बर्‍याच जणांनी .amr किंवा .wma मधे ऑडियो गाणी पाठवली आहेत.
तुमची व्हिडीयो फाईल आहे का?
गुगल किंवा याहू यावरुन तुम्ही इमेल करत असाल तर जास्तीत जास्त २५ एम्बी इतकी फाईल तुम्ही अ‍ॅटॅच करुन पाठवू शकता. शक्य असेल तर फाईल छोटी करुन पाठवता येते का ते पहा.
इतर काही पर्याय सुचल्यास संयोजक इथे पुन्हा लिहितील.

धन्यवाद.

संयोजक_संयुक्ता,
हो हो व्हिडीयो फाईल आहे. .mov आहे. फॉरमॅट कसा बदलु? yousendit / wetransfer वरुन पाठ्वु शकेल पण ऊद्या :(. चालेल क? आणि तशी पाठवल्यास आपण डाऊनलोड करु शकाल का?

मोनाली
तुम्ही आज रात्री किंवा उद्या सकाळी लवकर तुमची प्रवेशिका पाठवलीत तर ती २० तारखेच्या वेळेत बसेल आणि आम्हाला घेता येईल.

धन्यवाद.

१ कल्पना आहे. गुगल डॉक्स वरुन मी शेअर करु शकेन बहुतेक. कारण तेथे फाईल शेअर झाली आहे. करुन पाहते. बघा तुम्हाला मिळते का?

संयोजक_संयुक्ता,

गुगल डॉक्स धन्स. झा लीये फाईल शेअर. मला दिसतेय पण तुम्ही पण बघाल का १दा चेक करुन?

धन्यवाद.

संयोजक, कळवण्यास आनंद होतो की, आमच्या हिरोकडून चॉकलेट, चिप्स, गाडीतून चक्कर आणि अनेक कार असलेला ट्रक मिळण्याचे आमिष मिळाल्यामुळे पूर्ण सहकार्य मिळाले व गाणं रेकॉर्ड झालं आहे आणि ते मी पाठवलेलं आहे. कृपया पोच मिळावी....

याहूSSSSSSSS sorry sorry गुगल डॉक्सस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स!!!
धन्स संयोजक.

सगळी गाणी ऐकली. फार फार गोड गायलीत सगळ्या बच्चे कंपनीने. त्यांना शाबासकी आणि रेकॉर्डिंगचे अवघड काम पार पाडणार्‍या पालकांना पण Happy

सगळ्या बच्चे कम्पनी ला शाबासकी आणि मराठी भाषा दिवसाच्या खूप शुभेच्छा ! मराठी चा सार्थ अभिमान बाळगा.

Pages